Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या टीम फुल थ्रोटलची राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी (राष्ट्रीय स्तरावर उपविजेतेपद

 आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविदयालयाच्या टीम फुल थ्रोटलने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धा गाजवली आहेनुकत्याच बेंगळूरु येथे पार पडलेल्या गो कार्ट डीझाइन चॅलेंज स्पर्धे चमकदार कामगिरी केली आहे.  इसनी मोटारस्पोर्ट फॉर्मुला गो कार्ट डीझाइन चॅलेंज सिझन नऊ  मध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या विविध शाखेतील २५ सदस्यीय टीमने एकूण तीन किताब पटकावून पुन्हा एकदा महाविद्यालायाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

बेंगळूरु (कर्नाटकयेथे झालेल्या सर्वात प्रतिष्ठीत अशा स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या या टीमची निवड झाली होतीविविध शैक्षणिक संस्थामधील तब्बल ६५ हून अधिक टीम या स्पर्धेत उतरल्या होत्यागोकार्ट  डीझाइन चॅलेंजस्पर्धेमध्ये दरवर्षी शेकडो दिग्गज शैक्षणिक संस्थाच्या विद्यार्थी टीम सहभागी होतातही स्पर्धा जनरल मोटर्सटाटा मोटर्सहोंडाफोर्ड यासारख्या ऑटोमोबाइल डिझाईन  उत्पादन क्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जातेया स्पर्धेत निवड होण्यासाठी सुरुवातीला तांत्रिक तपासणीडिझाईन प्लानखर्च मूल्यमापनब्रेक टेस्ट यासारख्या विशेष चाचण्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातातविशेष म्हणजे सर्व चाचण्यांमध्ये प्रथम पाच मध्ये स्थान मिळवत या टीमने अंतिम राष्ट्रीय  स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केलेया फेरीदरम्यान ३५  टीम पुढील डायनॅमिक इव्हेंटसाठी पात्र ठरल्या.

ऑगस्ट २०२२ मध्ये बेंगळूरु येथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभानंतर रेसऑटोक्रॉसस्किडपॅड यासारखे डायनॅमिक इव्हेंट घेतले गेलेटीमची गुणवत्तातंत्रज्ञान  सर्व टेस्टच्या आधारे टीमला एकूण तीन प्रकारच्या स्टॅटीक  डायनॅमिक इव्हेंट ट्रॉफी बहाल करण्यात आल्यात्यामध्ये ऑटोक्रॉस विनर ऑल ओवर इंडीयाऑल ओवर इंडीया रनर अपऑल ओवर मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम यांचा समावेश आहे.

देशभरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी स्पर्धा परीक्षण केलेटीम चा कप्तान महिप सावंत तसेच रामचंद्र रेगेअश्विन टिकेअमोल सावंत  इतर विद्यार्थी सदस्यांचे परीक्षकानी विशेष कौतुक केलेअभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन या विद्यार्थ्यांनी जिद्दचिकाटी  मेहनतीच्या बळावर  टीम अॅडवायझर प्रासुमित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या गो कार्टची निर्मिती केली आहे.

संस्थेचे संस्थापक  माजी राज्यमंत्री मारविंद्रजी मानेकार्यकारी अध्यक्ष सौनेहा मानेसर्व संस्था पदाधिकारीप्राचार्य डॉमहेश भागवत तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुखप्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी टीममधील सर्व सदस्यांचे स्वागत करून अभिनंदन केलेटीमच्या या उत्तुंग यशामुळे विवध स्तरातील मान्यवरांकडून महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फोटो:




No comments:

Post a Comment