Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. मोहन गोसावी यांना शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान

 राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रामोहन गोसावी यांना शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान....

आंबव येथील प्रबोधन शिक्षण संस्थेच्या राजेंद्र माने महाविद्यालयाचे एमबीए विभाग प्रमुख  ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.मोहन गोसावी यांना शिक्षा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेशिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांना महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स असोसिएशन  कंपनी एच आर यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो22 डिसेंबर रोजी झालेल्या समारंभामध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाशिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबाबत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

 गेल्या 25 वर्षात शिक्षण क्षेत्रातील विविध कार्यक्षेत्रात त्यांचे योगदान असंख्य विद्यार्थ्यांना या संबंधित मार्गदर्शन आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न यामुळे त्यांची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड झालीप्रागोसावी यांनी सुरुवातीच्या काही काळात तासिका तत्वावर आपल्या अध्यापनाची सुरुवात केलीशिक्षण क्षेत्रात अध्यापन कार्याला प्राथमिकता मानुन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनविण्याचे त्यांनी काम केलेविविध पदांवर कार्यरत असताना विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर चांगली नोकरी कशी मिळेल यासाठीही त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. काही विद्यार्थ्यांना उद्योगधंदा सुरू करण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी उपलब्ध करून दिले. सध्या ते राजेंद्र माने महाविद्यालयात एमबीए विभाग प्रमुख तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत.

पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक श्रीरविंद्रजी मानेप्राचार्य डॉमहेश भागवत  प्राध्यापकानी त्यांचे अभिनंदन केलेया कार्यक्रमप्रसंगी प्रागोसावी यांनी हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या तसेच प्राध्यापकांच्याही विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे आणि त्यामुळेच इथे सर्वाना उत्तम काम करण्याची संधी मिळते असे सांगितलेराजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयासारखी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना विविध कार्यक्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी कायम प्रोत्साहित करते याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. आपल्या यशामध्ये महाविद्यालयाचा मोठा वाट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले त्यांनी याप्रसंगी संस्थेचे संस्थापकप्राचार्य तसेच सर्व सहकारी प्राध्यापक यांचे विशेष आभार मानले.

फोटोशिक्षा गौरव पुरस्कार स्वीकारताना प्रामोहन गोसावी


No comments:

Post a Comment