Tuesday, April 25, 2017

राजेंद्र माने महाविद्यालयाचा (RMCET) सुवर्ण श्रेणीमध्ये समावेश ‼


   आंबव येथील  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (RMCET) ‘सुवर्ण’ श्रेणीमध्ये समावेश झाल्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई),नवी दिल्ली व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये व त्यांची औद्योगिक जगताबरोबर असणारी संलग्नता याविषयी सर्व्हे (आढावा) घेण्यात आला.या सर्व्हेमध्ये भाग घेण्यासाठी मे २०१६ ते ऑगस्ट २०१६ या दरम्यान एआयसीटीईच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. २०१६ वर्षासाठी संपूर्ण भारतातून १८२९ अभियांत्रिकी संस्थांनी या सर्व्हेसाठी नाव नोंदणी केली परंतु ८९० संस्थांनीच यशस्वीरीत्या सर्व माहिती भरून सहभाग नोंदवला.
  या सर्व्हेमध्ये ६ वेगवेगळ्या परिमाणाद्वारे महाविद्यालयाचे औद्योगिक विश्वाशी असणारे संबंध तपासण्यात आले.यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा महाविद्यालयातील विविध समित्यांमधील सहभाग, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांचा औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकल्प,मार्गदर्शन, औद्योगिक प्रशिक्षण, औद्योगिक सहल यासारख्या प्रकारामध्ये सहभाग, विद्यार्थ्यांचे नोकरी लागण्याचे अथवा स्वत:चा व्यवसाय चालू करण्याचे प्रमाण, महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा अशा अनेक परिमाणांचा समावेश होता.सहभागी झालेल्या ८९० संस्थांना प्लॅटीनम,गोल्ड व सिल्वर या तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले.
  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय हे कोकणातील एकमेव महाविद्यालय सुवर्ण(गोल्ड) श्रेणींमध्ये मानांकन मिळवण्यात यशस्वी झाले आहे. राजेंद्र माने महाविद्यालयाने औद्योगिक जगताबरोबर परस्पर संबंध वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. महाविद्यालयातील प्रत्येक विभागाच्या शैक्षणिक सल्लागार समितीमध्ये उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला आहे. विविध नामांकित उद्योगसमूहांमधील तज्ञ व्यक्तींना प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्याना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करून त्यात मार्गदर्शनासाठी बोलावले जाते.तृतीय वर्षाची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर किमान दोन आठवड्याचे औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य करण्याचा निर्णय महाविद्यालयाने आमलात आणला आहे.शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलांचे प्रकल्प हे जास्तीतजास्त औद्योगिक क्षेत्राशी संबंधित असण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्याना औद्योगिक क्षेत्राची तोंडओळख व्हावी यासाठी विविध नामांकित उद्योगसमूहांमध्ये शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात.
  या सर्वांमुळे यावर्षी पहिल्यांदाच या सर्व्हेमध्ये सहभागी होऊनही  महाविद्यालयाने ‘सुवर्ण’ श्रेणीमध्ये स्थान मिळविले आहे. या सर्व्हेमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरअॅक्शन सेलचे प्रमुख प्रा. राहुल दंडगे व सदस्य प्रा.विकास मोरे, प्रा.इसाक शिकलगार, प्रा. सुमित सुर्वे व प्रा. स्नेहल मांगले यांनी परिश्रम घेतले. यासाठी लागणारी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुमोल सहकार्य केले. महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ.नेहा माने व प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळेच या सर्व्हेत यशस्वीरीत्या सहभागी होता आले अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन विभागातर्फे “ परदेशी पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न ‼!

फोटो:- डावीकडून प्राचार्य डॉ. महेश भागवत ,मार्गदर्शक श्री. सुनीत देव,वॉटर रेसोर्सेस इंजिनीअर,एचडीआर,यूएसए समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे व विद्यार्थी
विद्यार्थ्यांना संबोधित करताना मार्गदर्शक श्री. सुनीत देव
 आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅंड टेक्नॉलॉजी मध्ये करिअर मार्गदर्शन विभागातर्फे परदेशी पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाच्या  उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी मार्गदर्शक श्री. सुनीत देव, वॉटर रेसोर्सेस इंजिनीअर,एचडीआर,यूएसए यांची ओळख करून दिली. मार्गदर्शक श्री. सुनीत देव हे गेली १५ वर्षे एचडीआर या फर्ममध्ये कार्यरत असून हि फर्म अमेरिकेतील पहिल्या १० नामांकित फर्मपैकी एक आहे. श्री. सुनीत देव हे देवरुख मधील आठल्ये सप्रे कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक डॉ.रमेश देव तसेच देवरुख हायस्कूलच्या माजी शिक्षिका सौ.वृषाली देव यांचे सुपुत्र आहेत.हे व्याख्यान महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन विभागातर्फे अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकाम्युनिकेशन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचा सुमारे ७५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

   विद्यार्थ्यांना संबोधित करताना मार्गदर्शक श्री. सुनीत देव यांनी परदेशी पदव्युत्तर शिक्षणाच्या संधींविषयी सखोल मार्गदर्शन केले. आपल्या अनुभवातून त्यांनी सांगितले की,परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रथमत: परदेशातील वेगवेगळ्या विद्यापीठांचा आढावा इंटरनेट अथवा आपल्या ओळखीच्या माध्यमातून करून घ्यावा. GRE TOEFL यासारख्या परदेशी पदव्युत्तर शिक्षणासाठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी याविषयी त्यांनी विवेचन केले.त्याचबरोबर त्यांनी परदेशामध्ये शिक्षण घेताना संशोधनपर निधी कसा उपलब्ध करून घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.या निधीमुळे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीमध्ये सवलत मिळते असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांनाही त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

  याप्रसंगी बोलताना समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे  यांनी विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर शिक्षणाकडे कल असावा व त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. समारोप प्रसंगी समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी मार्गदर्शक श्री. सुनीत देव तसेच इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकाम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा.सुनिल अडूरे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . महेश भागवत व संस्थाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी माने यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.


Wednesday, April 12, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकीमध्ये संगणक विभागातर्फे कोअर व ऍडव्हान्स जावा या विषयावर कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
फोटो:- कोअर  व ऍडव्हान्स जावा विषयावरील कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शक व पुणे येतील तज्ज्ञ प्रशिक्षक श्री संजय देगावकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत , विभागप्रमुख प्रा.मुश्ताक गडकरी व समन्वयक प्रा. मंगेश गोसावी तसेच उपस्थित विद्यार्थी

देवरुख –
  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागामध्ये १३ दिवसांची  “कोअर  व ऍडव्हान्स जावा  या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. उदघाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर पुणे येतील तज्ज्ञ प्रशिक्षक श्री संजय देगावकर  यांचेसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत , विभागप्रमुख प्रा.मुश्ताक गडकरी व समन्वयक प्रा. मंगेश गोसावी उपस्थित होते.सदर कार्यशाळेमध्ये कोअर जावाया विषयावर मार्गदर्शन महाविद्यालयातील संगणक  विभागातील  प्रा. मंगेश गोसावी यांनी केले असून ऍडव्हान्स जावा”  या विषयासाठी श्री संजय देगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा. मुश्ताक गडकरी यांनी कार्यशाळेची उपयुक्तता विशद केली .याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून घेणे हि काळाची गरज आहे असे सांगत सदर कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले तसेच विदयार्थांसाठी अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल संगणक विभागप्रमुख प्रा .मुश्ताक गडकरी व समन्वयक प्रा. मंगेश गोसावी यांचे अभिनंदन केले.
  या कार्यशाळेमध्ये जावा हि प्रोग्रामिंग लँग्वेज विस्तृतपणे शिकवण्यात आली.तसेच जावा सेर्व्हलेट ,जेसपी,स्प्रिंग,एक्समैल,टीडीडी यांमधून कॉम्पुटर प्रोग्रॅम कसे केले जातात यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या कार्यशाळेचा लाभ द्वितीय व तृतीय वर्षाच्या ३६ विष्यार्थानी घेतला.विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातर्फे नेहमीच करण्यात येते.

  सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. मंगेश गोसावी,प्रा.मुश्ताक गडकरी,प्रा. विकास मोरे यांचे सहकार्य लाभले . सूत्रसंचालन श्रेयस सप्रे व आभार प्रदर्शन कार्यशाळेचे समन्वयक प्रा. मंगेश गोसावी यांनी केले .

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “इंजिन व गिअरबॉक्स दुरुस्ती” या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन ‼

  

  प्रात्यक्षिक कौशल्याचा विकास ही विद्यार्थ्यांच्या यशस्वी ज्ञान संपादनाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थी जीवनात वाटचाल करत असताना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच प्रात्यक्षिक कौशल्यालाही महत्त्व प्राप्त व्हावयास हवे असे मत आंबव देवरुख स्थित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी व्यक्त केले.महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या इंजिन व गिअरबॉक्स दुरुस्ती या एकदिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
  याप्रसंगी व्यासपीठावर विभागप्रमुख प्रा.संजय भंडारी,तज्ञ मार्गदर्शक मार्लेश्वर ऑटो सर्विसचे श्री.संतोष गोपाळ तसेच कार्यक्रम आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले समन्वयक डॉ.सचिन वाघमारे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना विभागप्रमुख प्रा. संजय भंडारी यांनी अशा कार्यशाळांची गरज अधोरेखित करताना विद्द्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणा होतानाच आत्मविश्वास वाढण्यामध्येही उपयोग असल्याचे नमूद केले.
  कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.सचिन वाघमारे यांनी विद्द्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि विद्द्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानाच्या पाठीमागे न लागता शंका समाधान करून घेऊन स्वत:चे प्रात्यक्षिक ज्ञान वाढवावयास हवे. या एकदिवशीय कार्यशाळेमध्ये दिवसभर दुचाकी वाहनामधील इंजिन तसेच गिअरबॉक्स संपूर्णपणे खोलून परत जोडण्यात आला.दुपारच्या सत्रात ऑटोमोबाईल विभागातील प्रा.आर.डी.वाटेगावकर यांनी विद्द्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  या कार्यशाळेचा लाभ तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकीच्या ६१ विद्द्यार्थ्यांनी घेतला. सदर कार्यशाळा अतिशय उपयुक्त असल्याचा अभिप्राय अभिजित मोहिते,राहुल साळुंखे,करिष्मा टोणे,अक्षय करंग यांनी दिला. विद्द्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन अशाच प्रकारची फ्युएल इंजेक्शन पंप वरती भविष्यात कार्यशाळा घेण्याचा मनोदय समन्वयक डॉ.सचिन वाघमारे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. 

राजेंद्र माने महाविद्यालयाचा (RMCET) सुवर्ण श्रेणीमध्ये समावेश ‼

  आंबव येथील  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (RMCET) ‘सुवर्ण’ श्रेणीमध्ये समावेश झाल्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई),नवी दिल्ली व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये व त्यांची औद्योगिक जगताबरोबर असणारी संलग्नता याविषयी सर्व्हे (आढावा) घेण्यात आला.या सर्व्हेमध्ये भाग घेण्यासाठी मे २०१६ ते ऑगस्ट २०१६ या दरम्यान एआयसीटीईच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. २०१६ वर्षासाठी संपूर्ण भारतातून १८२९ अभियांत्रिकी संस्थांनी या सर्व्हेसाठी नाव नोंदणी केली परंतु ८९० संस्थांनीच यशस्वीरीत्या सर्व माहिती भरून सहभाग नोंदवला.
  या सर्व्हेमध्ये ६ वेगवेगळ्या परिमाणाद्वारे महाविद्यालयाचे औद्योगिक विश्वाशी असणारे संबंध तपासण्यात आले.यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा महाविद्यालयातील विविध समित्यांमधील सहभाग, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांचा औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकल्प,मार्गदर्शन, औद्योगिक प्रशिक्षण, औद्योगिक सहल यासारख्या प्रकारामध्ये सहभाग, विद्यार्थ्यांचे नोकरी लागण्याचे अथवा स्वत:चा व्यवसाय चालू करण्याचे प्रमाण, महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा अशा अनेक परिमाणांचा समावेश होता.सहभागी झालेल्या ८९० संस्थांना प्लॅटीनम,गोल्ड व सिल्वर या तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले.
  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय हे कोकणातील एकमेव महाविद्यालय सुवर्ण(गोल्ड) श्रेणींमध्ये मानांकन मिळवण्यात यशस्वी झाले आहे. राजेंद्र माने महाविद्यालयाने औद्योगिक जगताबरोबर परस्पर संबंध वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. महाविद्यालयातील प्रत्येक विभागाच्या शैक्षणिक सल्लागार समितीमध्ये उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला आहे. विविध नामांकित उद्योगसमूहांमधील तज्ञ व्यक्तींना प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्याना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करून त्यात मार्गदर्शनासाठी बोलावले जाते.तृतीय वर्षाची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर किमान दोन आठवड्याचे औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य करण्याचा निर्णय महाविद्यालयाने आमलात आणला आहे.शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलांचे प्रकल्प हे जास्तीतजास्त औद्योगिक क्षेत्राशी संबंधित असण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्याना औद्योगिक क्षेत्राची तोंडओळख व्हावी यासाठी विविध नामांकित
उद्योगसमूहांमध्ये शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात.

  या सर्वांमुळे यावर्षी पहिल्यांदाच या सर्व्हेमध्ये सहभागी होऊनही  महाविद्यालयाने ‘सुवर्ण’ श्रेणीमध्ये स्थान मिळविले आहे. या सर्व्हेमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरअॅक्शन सेलचे प्रमुख प्रा. राहुल दंडगे व सदस्य प्रा.विकास मोरे, प्रा.इसाक शिकलगार, प्रा. सुमित सुर्वे व प्रा. स्नेहल मांगले यांनी परिश्रम घेतले. यासाठी लागणारी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुमोल सहकार्य केले. महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ.नेहा माने व प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळेच या सर्व्हेत यशस्वीरीत्या सहभागी होता आले अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. 

Saturday, April 1, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागामध्ये “बिग डेटा अँड हडूप” वर कार्यशाळा संपन्न!


फोटो:- कार्यशाळेतील तज्ञ प्रशिक्षक श्री. रविश रजपूत यांचेसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,विभागप्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी, समन्वयक प्रा.मनीष प्रभू व संगणक अभियांत्रिकीचे विद्यार्थी

  देवरुख: राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागामध्ये नुकतीच तीन दिवसांची बिग डेटा अँड हडूप वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर मुंबई येथील दलविक अँप्सचे तज्ञ प्रशिक्षक श्री. रविश रजपूत यांचेसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,विभागप्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी, समन्वयक प्रा.मनीष प्रभू,सह समन्वयक प्रा.मिथुन माने उपस्थित होते.

   कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा.मुश्ताक गडकरी यांनी कार्यशाळेची उपयुक्तता विषद केली. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी दलविक अँप्स  बरोबर महाविद्यालयाने केलेल्या सामंजस्य कराराची माहिती देऊन विद्यार्थ्यांना या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

  या कार्यशाळेमध्ये बिग डेटा हि संकल्पना विस्तृतपणे मांडण्यात आली. हडुप, मॅप रीड्युस या द्वारे प्रोग्रॅम कसे केले जातात याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच पिग, हाइव्ह यासारखे डेटाबेसेस कसे काम करतात हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले.या कार्याशाळेचा लाभ चतुर्थ वर्षाच्या ४१ विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन महाविद्यालयातर्फे नेहमीच करण्यात येते.

  हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी  प्रा.मनिष प्रभू,प्रा. मिथुन माने,प्रा. मुश्ताक गडकरी,प्रा. सुरेश कोळेकर यांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.मनीष प्रभू यांनी केले.