Wednesday, August 7, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकीचे एनपीटीइएलमध्ये यश

राजेंद्र माने अभियांत्रिकीचे एनपीटीइएलमध्ये यश

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय आणि आयआयटीतर्फे घेतल्या जाणा-या स्वयम (एनपीटीइएल) लोकल चॅप्टर
उपक्रमांतर्गत आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामधील विविध शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या
विषयांमधील ऑनलाईन कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केले.
जानेवारी ते एप्रिल २०१९ पर्यंत घेतलेल्या ऑनलाईन कोर्समध्ये महाविद्यालयाच्या ११ प्राध्यापक व ९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
यामध्ये कॉम्पुटर विभागातील रफिक गडकरी व पूजा शेळके यांनी सुवर्ण, डॉ. राहुल दंडगे, प्रा. पूनम क्षीरसागर, श्रुती तिखे व दत्तात्रय
करकरे यांनी रौप्य श्रेणी मध्ये तर इतर ९ जणांनी विशेष प्रविण्याण्यासह यश संपादन केले आहे.
जुलै ते डिसेंबर २०१८ च्या सत्रामध्ये महाविद्यालयाच्या एकूण ४८ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एनपीटीइएलचे विविध विषयातील
ऑनलाईन कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यामध्ये प्रा. मुश्ताक गडकरी व प्रा. आशिष सुवारे हे सुवर्ण श्रेणीमध्ये अव्वल ठरले. तर प्रा.
पूनम क्षीरसागर यांनी रौप्य श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकाविले. प्रा. सुदर्शन जाधव, प्रा. गीतांजली सावंत, प्रा. सुरेश कोळेकर, प्रा.
शहाजी देठे, केतन चव्हाण, आशुतोष गावडे, प्रीती सालीम, पल्लवी निवळकर, राज सुर्वे, अभी मेस्त्री यांनीही रौप्य पदक मिळविले.
इतर १५ जणांनी विशेष प्राविण्यासह कोर्स पूर्ण केला.
महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन कोर्स फार उपयुक्त ठरत असून त्यासाठी सर्वाना प्रोत्साहित करण्यात येते.
यासाठी महाविद्यामध्ये स्वतंत्र सेल देखील स्थापन करण्यात आला आहे. सर्व यशस्वी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. महेश भागवत व सर्व विभागप्रमुखांनी अभिनंदन केले आहे.
फोटो: यशस्वी प्राध्यापक व विद्यार्थी











राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात मुंबई विद्यापिठाचा ५२ वा युवा महोत्सव उत्साहात संपन्न

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात मुंबई विद्यापिठाचा ५२ वा युवा महोत्सव

उत्साहात संपन्न

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाचा ५2 वा युवा महोत्सव अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी, मुंबई विद्यापीठाचे अधिकारी,महाराष्ट्राच्या कला व सांस्कुतिक क्षेत्रातील नामवंत अभिनेते व कलाकार, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या महोत्सवाने महाविद्यालयाचे संपूर्ण वातावरण चैतन्यमय बनून गेले होते.
महोत्सवाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर विद्यापीठ गीत गायन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव दिलीप जाधव, प्राचार्य डॉ. महेश भागवत, मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. निलेश सावे, जिल्हा समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, प्रा. महेश देशमुख, तसेच परीक्षक उपेंद्र दाते, दिगंबर राणे, राहुल वैद्य, प्रणीत मावळे उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे संस्थेतर्फे यथोचित स्वागत करणेत आले.
यानंतर प्रास्ताविक करताना प्रा. आंबेकर म्हणाले कि, युवा महोत्सव हा स्पर्धा व व्यवस्थापन यांचा संगम असून यामध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असते. सर्व स्पर्धक व त्यांच्या मार्गदर्शकांचे त्यांनी यावेळी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या भाषणात महाविद्यालातर्फे सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या महोत्सवामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय
वाढत असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. प्रा. सावे यांनी हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी वेगळी पर्वणी असून सर्वागीण विकास घडविणारा उपक्रम असल्याचे सांगून आयोजकांचे विशेष आभार मानले. प्रा. देशमुख यांनी हा महोत्सव कला व सांस्कृतिक क्षेत्रात दिग्गज घडविणारा असल्याचे सांगितले.
मा. माने साहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले कि, हे महाविदयालय आपल्या मागील २१ वर्षांच्या यशस्वी वाटचालीतून व अशा महोत्सवाच्या आयोजनातून विशेषत: कोकणातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नरत आहे. भाषणाच्या शेवटी सर्वाना सुयश मिळावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. शेवटी महाविदयालय समन्वयक प्रा. गणेश जागुष्टे यांनी आभार प्रदर्शन केले.
त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सहभागी स्पर्धकांच्याशास्त्रीय नृत्य, स्केचीग, पेंटिंग, क्ले मॉडेलिंग, कोलाज, मेहंदी, रांगोळी, कथाकथन, एकपात्री नाटक, हास्यप्रधान कथानक, वक्तृत्व यासारख्या १५ विवीध कला व सांस्कृतिक प्रकारांच्या प्राथमिक फेरीतील स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये दक्षिण रत्नागीरीया प्रादेशिक विभागातील लांजा, राजापूर, रत्नागीरी, संगमेश्वर या चार तालुक्यातील १७ महाविद्यालयामधून जवळपास ४७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व स्पर्धांचे परीक्षण विद्यापीठ नियुक्त परीक्षकांनी केले. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते प्रदीप कबरे, संजय क्षेमकल्याणी, हेमंत भालेकर, उपेद्र दाते, दिग्दर्शक दिगंबर राणे, नृत्य दिग्दर्शक देवेंद्र शेलार, तसेच दीपक बिडकर, विजय जाधव, हनुमंता रवाडे, प्रकाश राजेशिर्के, मनोज भडांगे, समीर बुटाला, प्रकाश नारकर, रवींद्र सोमोशी यासारख्या टेलेव्हिजनच्या विविध वाहिन्यांवरील मालिका व कार्यक्रमामधील अभिनेते व कलाकारांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

- महाराष्ट्राच्या कला व सांस्कुतिक क्षेत्रातील नामवंत अभिनेते,गायक व कलाकारांची परीक्षक म्हणून उपस्थिती
- १७ महाविद्यालयातील जवळपास ४७० विद्यार्थ्यांचा सहभाग सायंकाळच्या शेवटच्या सत्रात, महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात, दिव्यांच्या प्रकाशझोतात व सर्वांच्या उपस्थितीत तरुणाईच्या
आवडत्या अशा लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सहभागी विद्यार्थी गटांनी विविध लोकगीतांवर बहारदार व मनमोहक नृत्ये सदर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
यानंतर झालेल्या समारोपप्रसंगी मा. माने साहेब व विद्यापीठाच्या पदाधिका-यांच्या हस्ते सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात केली. तसेच इतर विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. गोगटे जोगळेकर महाविदयालय रत्नागीरीच्या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त विजेतेपदांसह विभागीय जेतेपद पटकाविले. देवरूखच्या आठल्ये सप्रे महाविदयालयाने एकूण दहा तर फिनोलेक्स अकॅडेमी व भारत शिक्षण मंडळ वरिष्ठ महावियालयाने एकूण आठ, लांजा महाविद्यालयाने एकूण पाच
प्रकारामध्ये यश मिळविले.
राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या सिद्धेश शेट्येने क्ले मोडेलिंग मध्ये प्रथम, मिमिक्री व वकृत्वमध्ये ओमकार कुलकर्णीने अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळविला तर कौस्तुभ आंबेकरने कार्टुनिंग मध्ये तृतीय क्रमांक मिळविला.विद्यापीठाच्या पदाधिका-यानी महाविद्यालयाचा परिसर रमणीय व निसर्गरम्य असल्याचे यावेळी नमूद केले तसेच महाविद्यालयाने केलेल्या या महोत्सवाच्या उत्तम नियोजनाबद्दल महाविदयालय व्यवस्थापन, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी प्रतिनिधींचे आभार मानले.मा. माने साहेबांनी आजचा भारत हा तरुणाईचा देश असल्याचे आज खंरोखरीच अनुभवल्याचे सांगून अशा कार्यक्रमांसाठी
महाविदयालय यापुढेही सहकार्य करेल असे सांगितले. महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. गणेश जागुष्टे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी महोत्सवाच्या
यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ओमकार कुलकर्णी याने महोत्सवाचा विद्यार्थी समन्वयक म्हणून काम पहिले.

फोटो:
1. मा. रविन्द्रजी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत व मान्यवर परीक्षकांसमवेत विद्यार्थी
2. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. रविन्द्रजी माने, समवेत डावीकडून प्राचार्य डॉ. महेश भागवत, सहसचिव
दिलीप जाधव, प्रा. आनंद आंबेकर, प्रा. निलेश सावे, प्रा. महेश देशमुख (पाठीमागील रांगेत परीक्षक)
3. युवा महोत्सवाच्या लोकनृत्य स्पर्धेमधील एक प्रसंग