Wednesday, September 16, 2015

ऑटोट्रेंड्स-टाईमलाईन चे अनावरण



   
 

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या धावत्या युगामध्ये स्पर्धा,गुणवत्ता आणि परीक्षा यांच्या न संपणारया चक्रामध्ये गुरफटलेल्या विद्द्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या भावनांना मुक्त व्यासपीठ मिळावे आणि विविध कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल शाखेच्या विद्द्यार्थी संघटनेतर्फे एक अभिनव उपक्रम म्हणून ऑटोट्रेंड्स-टाईमलाईनया भित्तीपत्रिकेची कल्पना आज मूर्त रुपात आणण्यात आली.
  अभियांता दिनाचे औचित्य साधून आज या भित्तीपत्रिकेचे अनावरण विभागप्रमुख प्रा.निमेश ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. अनावरणप्रसंगी ऑटोट्रेंड्स इनचार्ज व टाईमलाईनचे संपादक प्रा. राहुल राजोपाध्ये,सहसंपादक कु.रुपेश अवसरे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.अनावरणप्रसंगी बोलताना प्रा. ढोले यांनी विद्द्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन या अभिनव उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
  सदर भित्तीपत्रिका ही विभागातील विद्द्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच विभागांतर्गत होणार्या कार्यक्रमासाठी एक व्यासपीठ ठरणार असून या अंतर्गत विविध विभागांमध्ये अतिशय उत्कृष्ट मांडणी करण्यात आली आहे. भित्तीपत्रिका साप्ताहिक स्वरुपाची असून प्रत्येक सप्ताहामध्ये विविध निकाषांवरती साहित्यकृतींची निवड करण्यात येणार आहे.सदर भित्तीपत्रिकेमधून विद्द्यार्थ्यांना विविध विषयातील अद्ययावत ज्ञान मिळण्यास मदत होणार असून विविध विषयातील तज्ञ लोकांच्या माहितीपूर्ण लेखांचा यामध्ये समावेश असणार आहे.
  प्रत्येक सप्ताहामध्ये वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचे शुभेच्छा संदेश प्रकाशित केले जाणार आहेत.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी भित्तीपत्रिकेला शुभेच्छा दिल्या.या भित्तीपत्रिकेसाठी प्रकाशक प्रा.निमेश ढोले,संपादक प्रा.राहुल राजोपाध्ये यांचेसह रुपेश अवसरे,कौस्तुभ धमाले,पृथ्वीराज मोहोरकर, रुपेश बाबर तसेच ऑटोट्रेंड्स कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचा वाट उचलला.