Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन “आरोहण 2 K २३” चे उद्घाटन

 राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आरोहण 2 K २३” चे उद्घाटन

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पराग पानवलकर प्रमुख पाहुणे

तालुक्यातील प्रशिसंस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे  वार्षिक स्नेहसंमेलन आरोहण २के२३” चे दिमाखात उद्घाटन झालेविद्यार्थ्यांना त्यांच्या कलाक्रीडा  सांस्कृतिक कलागुणांना वाव देणाऱ्या या स्नेह्संमेलनाची प्रचंड प्रतीक्षा असतेत्यात कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असणा-या  या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

उद्घाटन समारंभाला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पराग पानवलकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलीयावेळी संस्थाध्यक्ष मारवींद्र मानेकार्यकारी अध्यक्षा सौनेहा मानेपटवर्धन फूड्स रत्नागिरीचे संजय पटवर्धन,  प्राचार्यडॉमहेश भागवततसेच महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख व्यासपीठावर स्थानापन्न होते.

समारंभाला दिपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आलीयानंतर प्रमुख पाहुणे  अन्य मान्यवरांचे संस्थाध्यक्ष मारवींद्र माने यांनी यथोचित स्वागत केलेमहाविद्यालयाच्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आंबव ग्रामदेवता कालीश्रीच्या मंदिरामध्ये क्रीडाज्योत प्रज्वलित करून मैदानात  मिरवणुकीने आणण्यात आलीमारवींद्र माने यांनी या क्रीडाज्योतीची मैदानामध्ये स्थापना केली  श्रीफळ वाढवून स्नेह्संमेलनाचे औपचारिक उद्घाटन केले.  

यानंतर महाविद्यालयाच्या सहा विभागातील विद्यार्थ्यांच्या तुकड्यांनी दिमाखदार ध्वजसंचालन करून मान्यवरांना सलामी दिलीउपस्थित मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना दाद लाभलीमहिप सावंत याने सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण स्पर्धांमध्ये खिलाडूवृत्ती  शिस्त जोपसण्यासाठी शपथ दिलीपरेड तुकड्यांच्या सर्व प्रमुखांनी शेवटी आपापल्या विभागाच्या ध्वजाची  मैदानात स्थापना केली.

यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलेआपल्या भाषणात त्यांनी अशा स्पर्धांमुळे व्यवस्थापकीय कौशल्यसंवाद क्षमता वाढण्यास मदत होऊन मानसिक ताण कमी होत  असल्याने विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन केले  सर्वाना शुभेच्छा दिल्यायानंतर प्रमुख पाहुणे पराग पानवलकर यांनी मार्गदर्शन केलेते म्हणालेकरिअर घडविण्यामध्ये कला  क्रीडा प्रकारांचा फार उपयोग होतोकोणत्याही क्षेत्राप्रमाणे खेळातही यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म निरीक्षणशक्ती कामी येतेत्यांनी स्वतः २०१३ ला इटलीमध्ये  २०१७ ला न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय  बॅडमिंटन मास्टर्स स्पर्ध्येत मिळविलेल्या सुवर्ण पदकांची यशस्वी गाथा विद्यार्थ्यांना ऐकविलीशेवटी राजेंद्र माने महाविदयालयाचे विद्यार्थी विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये नेहमीच चमकत असल्याचे सांगून त्यांनी विशेष कौतुक केले.  

यानंतर संस्थाध्यक्ष मारवींद्र माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना हे स्नेहसंमेलन उत्तम आठवणींची शिदोरी ठरेलतसेच सर्व स्पर्धा या स्तुत्य  प्रशंसनीय वातावरणात खेळण्याचा सल्ला त्यांनी दिलायानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या ध्वजसंचालनाचा निकाल जाहीर केला. महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाला या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आलापुढील आठवडाभर विविध स्पर्धा पार पडणार असून दि जानेवारी रोजी बक्षीस वितरण समारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मोगरणकरभक्ती सावंतविशालिनी या विद्यार्थ्यांनी केलेसांस्कृतिक स्पर्धा समन्वयक म्हणून प्रास्वप्नील रावूळ तर क्रीडा स्पर्धा समन्वयक म्हणून प्रासुमित सुर्वे काम पहात आहेतविविध स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी कमिटी प्रमुख शुभम खामकर तसेच भावना परबआशिष पाटकरसमृद्धी शिंदे  अन्य सदस्य मेहनत घेत आहेत.  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक  इतर कर्मचार्यांचे यासाठी सहकार्य लाभत आहे.


No comments:

Post a Comment