Sunday, February 21, 2016

माने अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांना मुंबई विद्यापीठाचे संशोधन अनुदान घोषित!!

माने अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांना मुंबई विद्यापीठाचे संशोधन अनुदान घोषित!!
    फोटो:  संशोधन अनुदान उपक्रमांतर्गत निवड करण्यात आलेले प्राध्यापक डावीकडून 
               अनुक्रमे प्रा.अच्युत राउत, प्रा.राहुल राजोपाध्ये व प्रा.वैभव डोंगरे
  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन संशोधन प्रकल्पांचीविद्यापीठ अनुदान मंडळातर्फे संशोधन अनुदान उपक्रमांतर्गत निवड करण्यात आली.यामध्ये ऑटोमोबाईल विभागाचे प्राध्यापक प्रा.राहुल राजोपाध्ये तसेच मेकॅनिकल विभागाचे प्रा.अच्युत राउत व प्रा.वैभव डोंगरे यांच्या संशोधन प्रकल्पांना मुंबई विद्यापीठातर्फे अनुदानाची घोषणा करण्यात आली.मुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अत्याधुनिक संशोधनाला चालना मिळावी या उद्देशाने विविध संशोधन प्रकल्पांची,त्यांच्यातील संशोधन मुल्यांची निकड तपासून निवड करण्यात येते.
  प्रा.राहुल राजोपाध्ये यांनी छोट्या लेथ मशीन व्यावसायिकांसाठी त्यांच्या पारंपारिक लेथ मशीनवर सहजासहजी बसवता येणारे आणि स्टेनलेस स्टील सारख्या एरवी सध्या मशीनवरती काम न करता
येणा-या मटेरियलवरती पारंपारिक मशीनच्या सहाय्याने मशीनिंग करता येऊ शकेल अशा एका हॉट मशीनिंग च्या उपकरणाची निर्मिती आणि त्याचे संशोधन हा प्रकल्प सादर केला होता.सध्याच्या यांत्रिकी युगात अशा संशोधनाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या या प्रकल्पाची  मुंबई विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे निवड करण्यात आली.
   प्रा.अच्युत राउत यांनी वूड बर्निंग स्टोव्ह या अत्याधुनिक चुलीची निर्मिती व परीक्षण हा प्रकल्प सादर केला.यामध्ये पारंपारिक  चुलीमध्ये जी उष्णता वाया जाते त्या  उष्णतेचा वापर करून चुलीची कार्यक्षमता वाढवण्याबद्दलच्या संशोधनाचा समावेश आहे.सध्याच्या इंधन तुटवड्याचा विचार करता या संशोधनाचे  महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली.
  प्रा.वैभव डोंगरे यांनी पर्यावरणपूरक कमी तापमानाच्या रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन साठी नॅनो फ्लुइड रेफ्रिजरंट चा वापर करून त्याचे प्रयोग आणि अन्वेशन हा प्रकल्प सादर केला.सध्याच्या पर्यावरण जागृतीसाठी या संशोधनाची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प निवडण्यात आला.
  या तीनही संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्राध्यापकांबरोबर प्रा.निमेश ढोले, प्रा.संदेश रसाळ आणि प्रा.एस.बी.खांडेकर सहाय्य करणार आहेत. संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने यांनी या प्राध्यापकांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवत तसेच संशोधन आणि विकास समितीचे प्रा.संजय भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Saturday, February 20, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष !!

राजेंद्र  माने  अभियांत्रिकी  महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष !!