Tuesday, March 14, 2023

मुंबई विद्यापिठाच्या ५५ व्या युवा महोत्सवची प्राथमिक फेरी राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात संपन्न

 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाच्या   ५५  व्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाली. दक्षिण रत्नागिरी या प्रादेशिक विभागातील महाविद्यालायांतर्गत विद्यार्थ्यांच्या युवा महोत्सव निवड फेरीचे माने अभियांत्रिकीमध्ये हे तिसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारीमुंबई विद्यापीठाचे अधिकारीमहाराष्ट्राच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत अभिनेते व कलाकारविविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या अतिउत्कृष्ट कलाकृती पाहण्याची संधी मिळाली.

महोत्सवाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मारवींद्र माने व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलेयानंतर विद्यापीठ गीत गायन करण्यात आलेयावेळी व्यासपीठावर नागपूर विद्यापीठाचे डॉ. अरुण पाटील, प्राचार्य डॉ. महेश भागवतमुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावेजिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर उपस्थित होतेयाप्रसंगी प्रथम सर्व मान्यवरांचे संस्थेतर्फे यथोचित स्वागत करण्यात आले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवत यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालातर्फे स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

युवा महोत्सवाची माहिती देताना डॉ. आंबेकर म्हणाले कियुवा महोत्सव हा स्पर्धा व व्यवस्थापन यांचा संगम असून यामध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असतेडॉ. सावे यांनी हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी वेगळी पर्वणी असून सर्वागीण विकासासाठीचा उपक्रम असल्याचे सांगून आयोजकांचे विशेष आभार मानलेमामाने साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये या महोत्सवाच्या आयोजनाचा विशेष आनंद आहे अशा कार्यक्रमांसाठी महाविदयालय यापुढेही सहकार्य करेल असे सांगितलेत्यांनी सर्वाना सुयश मिळावे अशी सदिच्छा व्यक्त केलीमहाविदयालय समन्वयक प्रागणेश जागुष्टे यांनी आभार प्रदर्शन केले.

त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सहभागी स्पर्धकांच्याशास्त्रीय नृत्यस्केचींगपेंटिंगक्ले मॉडेलिंगकोलाजमेहंदीरांगोळीकथाकथनएकपात्री नाटकहास्यप्रधान कथानकवक्तृत्व यासारख्या २९ विविध कला व सांस्कृतिक प्रकारांच्या प्राथमिक फेरीतील स्पर्धा घेण्यात आल्यायामध्ये दक्षिण रत्नागीरी या प्रादेशिक विभागातील लांजाराजापूररत्नागिरीसंगमेश्वर या चार तालुक्यातील १७ महाविद्यालयामधून जवळपास ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलासर्व स्पर्धांचे परीक्षण विद्यापीठ नियुक्त परीक्षकांनी केलेयामध्ये प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन केणी, नृत्य दिग्दर्शक देवेंद्र शेलार,प्रा. प्रकाश राजेशिर्केश्री. दिगंबर राणे, श्री. महेश देशमुख यासारख्या  कला क्षेत्रातील मान्यवर आणि टेलिव्हिजनच्या विविध वाहिन्यांवरील मालिका व कार्यक्रमामधील अभिनेते व कलाकारांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

सायंकाळच्या शेवटच्या सत्रातमहाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणातदिव्यांच्या प्रकाशझोतात व सर्वांच्या उपस्थितीत तरुणाईच्या  आवडत्या  अशा लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आल्यायामध्ये सहभागी विद्यार्थी गटांनी विविध लोकगीतांवर बहारदार व मनमोहक नृत्ये सदर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

यानंतर झालेल्या समारोपप्रसंगी मामाने साहेब,  विद्यापीठाचे पदाधिकारी, प्राचार्य, प्रद्युम्न माने आदी मान्यवरांच्याहस्ते सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात केलीतसेच इतर विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. गोगटे जोगळेकर महाविदयालय रत्नागीरीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमाकांची नऊद्वितीय क्रमांकाची तीन तसेच तृतीय चार व उत्तेजनार्थ दोन अशा एकूण अठरा पारीतोषिकांसह या युथ फेस्टिवलमध्ये आपला ठसा उमटवला तर देवरूखच्या आठल्ये सप्रे महाविदयालयाने प्रथम क्रमाकांची सहाद्वितीय क्रमांकाची तीन तसेच तृतीय सात व उत्तेजनार्थ एक अशी एकूण सतरा पारीतोषिके मिळविलीश्रीमान कीर लॉ कॉलेजने एकूण नऊ, रत्नागिरी सब सेंटर, नवनिर्माण कॉलेज, लांजा कॉलेज व फ़िनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरीने प्रत्येकी एकूण पाच पारितोषिके मिळवली. राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या शुभम वाघधरे व ओंकार सुर्वे यांनी इंग्लिश डिबेट प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.

विद्यापीठाच्या पदाधिका-यानी महाविद्यालयाचा परिसर  रमणीय व निसर्गरम्य असल्याचे यावेळी नमूद केले तसेच महाविद्यालयाने केलेल्या या महोत्सवाच्या उत्तम नियोजनाबद्दल महाविदयालय व्यवस्थापनप्राध्यापक वर्ग व विद्यार्थी प्रतिनिधींचे आभार मानले. महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रागणेश जागुष्टे, सर्व प्राध्यापककर्मचारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेलक्ष्मण सावंत व भावना परब यांनी महोत्सवाचे विद्यार्थी समन्वयक म्हणून काम पहिले.

Photos: 








No comments:

Post a Comment