Thursday, March 24, 2022

राजेंद्र माने महाविद्यालय देवरूख येथील एमबीए विभागातील विद्यार्थ्यांची स्कॉलर्स कट्टा पुणे कंपनीमध्ये निवड

 राजेंद्र माने महाविद्यालय देवरूख येथील एमबीए  विभागातील विद्यार्थ्यांची स्कॉलर्स कट्टा पुणे कंपनीमध्ये निव

स्कॉलर्स कट्टा पुणे या ई लर्निंग सॉफ्टवेअर कंपनीने महाविद्यालयाच्या एम बी ए विभागातील नऊ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. विविध निवड चाचण्यांमधून एकूण  27 विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी यशस्वी झाले त्यामधील सात विद्यार्थ्यांना मार्केटिंग मॅनेजर पदावर रुजू करण्यात आले व दोन विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. अश्विनी मोहिते कु. धनश्री साळवी कु. मानसी अणेराव, कु अंकिता पिंपळकरकु जुईली हिरवे,  कु पूजा गुरवकु. सानिया वास्ता, शैलेश गुरव, ऋषिकेश खानविलकर यांचा समावेश आहे.

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय देवरुख येथे 2010 सालापासून एम बी ए विभाग कार्यरत आहे. आज या विभागातून अनेकानेक विद्यार्थी व्यवस्थापन शास्त्र या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपली कारकीर्द यशस्वीपणे पुढे नेत आहेत. या विभागातून आतपर्यंत दहा बॅचेस यशस्वी होऊन बाहेर पडल्या आहेत. व्यवस्थापन शास्त्र हे एक नुसते शिक्षण नसून विद्यार्थ्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी एक अविभाज्य घटक आहे. या विभागातर्फे व्यवस्थापन शास्त्र त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये याचे संपूर्ण ज्ञान तज्ञ  प्राध्यापकांकडून महाविद्यालय सातत्याने देत आहे. महाविद्यालयाचा एम बी ए विभाग मुंबई विद्यापीठाशी सलग्न असून यास ए आय सी टी ई नवी दिल्ली ची मान्यता आहे. तसेच संपूर्ण अभ्यासक्रम अद्ययावत मार्केटशी संलग्नित आहे. या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञानाबरोबरच रिसर्च प्रोजेक्टचे सुद्धा ज्ञान दिले जाते. हे रिसर्च प्रोजेक्ट विद्यार्थ्यांची सर्व कौशले आणि विद्वत्ता यांचा एक समर्पक संगम आहे. 

हे महाविद्यालय व एमबीए विभाग नुसते शिक्षण देऊन थांबत नाही तर विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनवणे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्नशील असते. यासाठी विविध शासकीय व निमशासकीय आस्थापनांची मदत मिळत असते. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर यशस्वीपणे एखाद्या कंपनीमध्ये निवड होणे अनिवार्य असते आणि यासाठी सातत्याने कंपन्यांशी संपर्क साधणे इ. काम अविरतपणे चालू असते. याचेच फलित म्हणून अनेक नामवंत कंपन्या विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आपल्या कंपनीमध्ये विविध पदांवर घेण्यासाठी इच्छुक आहेत.

या प्लेसमेंट ड्राइव्ह साठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर व विभाग प्रमुख प्रा. मोहन गोसावी तसेच इतर सहकारी प्राध्यापक यांचे प्रयत्न विशेष कारणीभूत ठरले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा. श्री.  रवींद्र माने तसेच प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी अभिनंदन केले.

 

 

Photo: सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो सोबत जोडले आहेत











राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न

 राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉकिशोर सुखटणकर यांची प्रमुख उपस्थिती

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित आंबव येथिल राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झालामहाविद्यालयाच्या  २०१९-२० आणि २०२०-२१ मधील पदवी उत्तीर्ण झालेल्या  विद्यार्थ्यांना याप्रसंगी पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आलीयावेळी रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉकिशोर सुखटणकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलीमागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे या कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य झाले नव्हतेत्यामुळे यावर्षी  पदवीप्राप्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनीमध्ये मोठा उत्साह होता.

संस्थाध्यक्ष  माजी राज्यमंत्री मारवींद्र मानेकार्यकारी अध्यक्षा सौनेहा मानेप्राचार्य डॉमहेश भागवतराजेंद्र माने तंत्रानिकेतनचे प्राचार्य प्रानितीन भोपळे आदी मान्यवरांच्या व्यासपीठावरील उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलामहाविद्यालयाच्या सर्व विभागांचे प्रमुखप्राध्यापक  बहुसंख्य स्नातक याप्रसंगी  उपस्थित होते

दीपप्रज्वलनसरस्वती वंदना  विद्यापीठ गीत गायनाने समारंभाला सुरुवात करण्यात आलीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवत यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयाची ही २० वी स्नातक तुकडी बाहेर पडत असल्याचे सांगितले.मागील दोन शैक्षणिक वर्षे कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांसाठी फार कसोटीची होती पण या परिणामांना उत्तर देण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि त्यांनी पुढील कारकीर्द यशस्वी करून यावर मात करावी ही इच्छा त्यांनी प्रकट केलीविद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात ज्ञानकौशल्यआणि सदवृत्ती याकडे विशेष लक्ष देण्याची त्यांनी सूचना केली आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 मुख्य अतिथी डॉकिशोर सुखटणकर यांनी यानंतर स्नातकांना विस्तृतपणे मार्गदर्शन केलेते म्हणाले,यशस्वी होण्यासाठी जिद्दचिकाटी तसेच शिक्षणाप्रती तळमळ  स्वयंप्रेरणा आदी विविध गुणधर्मांचे आपल्या कारकीर्दीत महत्त्व आहेमुंबई विद्यापीठाची दैदिप्यमान कारकीर्द याप्रसंगी त्यांनी मुलांसमोर मांडली अठराशे सत्तावन्न साली  स्थापन झालेले हे विद्यापीठ आज आपल्या यशाच्या मानांकनात विविध गोष्टी रुजवत चाललेले आहे आणि अशीच कारकीर्द विद्यार्थीसुद्धा आपल्या भविष्यात निर्माण करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केलीतसेच मुंबई विद्यापीठाचे कार्यक्षेत्र वाढवणे आणि विभागीय कार्यालये निर्माण करणे यात संस्थेचे चेअरमन मारवींद्रजी माने यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेखित केलेआजचा इंजिनियर किंवा अभियंता कसा असला पाहिजे याचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला.

 

संस्थेचे अध्यक्ष मारवींद्र माने यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा संदेश दिलाते म्हणालेजेव्हा एखादा विद्यार्थी काही  वर्षांनी आपल्याला ओळखतो यातून मिळणारे समाधान अवर्णनीय असते आणि हीच खरी कमावलेली संपत्ती आहे याचा त्यांनी जाणीवपूर्वक उल्लेख केलाविद्यार्थ्यांनी आयुष्यातील एक मुख्य टप्पा पार केला आहे मात्र एवढ्यावर समाधानी  राहता त्यांनी मोठी मजल गाठण्याची इच्छा ठेवावी अशी मनोकामना व्यक्त केली.

 

यानंतर उपस्थित सर्व स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मागील दोन्ही शैक्षणिक वर्षातील अंदाजे दोनशे विद्यार्थी उपस्थित होतेमहाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावाही विभागवार आयोजित करण्यात आला.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीक्षा विभागाचे प्राविश्वनाथ जोशीमाजी विद्यार्थी संघाचे समन्वयक प्रावैभव डोंगरे  अन्य सर्वांचे उल्लेखनीय सहकार्य लाभलेसमारंभाचे सूत्रसंचालन प्रास्नेहल मांगले यांनी केलेस्नेह्भोजानानंतर समारंभाची सांगता झाली

 

फोटो:

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभादरम्यान स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करताना संस्थेचे अध्यक्ष मा. रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर, प्राचार्य डॉ. महेश भागवत, राजेंद्र माने तंत्रानिकेतनचे प्राचार्य प्रा. नितीन भोपळे आदी मान्यवर