Tuesday, March 14, 2023

मुंबई विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील उत्तम निकालाची परंपरा कायम

 मुंबई विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील उत्तम निकालाची परंपरा कायम

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या  शेवटच्या वर्षाचा रिझल्ट नुकताच जाहीर झाला आहेविद्यापीठाशी सलग्न राजेंद्र माने  कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामधून परीक्षा दिलेल्या २२३ विद्यार्थांपैकी २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ९५ टक्के इतका लागला आहेदोन वर्षानंतर प्रथमच ही परीक्षा पारंपारिक म्हणजे ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आली होती.

महाविद्यालयातून कॉम्पुटर इंजिनीरिंग ह्या विद्याशाखेमधून ७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ह्या शाखेचा निकाल ९८.६३इतका लागला आहेत्यामध्ये सानिका मोहन कुलकर्णी .२५ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम आली आहेप्रगती अनिल इंदुलकर .५५ पॉइंट मिळवून दुसरी तर समृद्धी नरेंद्र जाधव .४६ पॉइंटसह तिसरी आली आहेह्या तिन्ही मुलींची कॅम्पस इनटरव्ह्यूमधून नामांकित कंपनी मध्ये नोकरी साठी निवड झाली आहे.

ऑटोमोबाईल इंजिनीरिंग ह्या विद्याशाखेमधून ५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ह्या शाखेचा निकाल ९८.०८इतका लागला आहेत्यामध्ये अक्षय प्रभाकर शिखरे .१५ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथमनूरउल्हासन इम्रान मुगळे .६९ पॉइंट मिळवून दुसरातर अनिकेत विलास बने .६८ पॉइंटसह तिसरा आला आहेह्यापैकी अनिकेत बने ह्याची इन्फोजेन लॅब पुणे ह्या कंपनीत निवड झाली आहे.

मेकॅनिकल इंजिनीरिंग शाखेमधून ७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ह्या शाखेचा निकाल ९०.७९इतका लागला आहेत्यामध्ये सुरज रवींद्र अणेराव .२६ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथममहेंद्र रवींद्र गोरुले .९० पॉइंट मिळवून दुसरातर यशदीप मधुकर चव्हाण .८५ पॉइंटसह तिसरा आला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकी ह्या शाखेमधून २२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ह्या शाखेचा निकाल ९०.९१इतका लागला आहेत्यामध्ये शुभम विश्राम पानगले .०६ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथमप्रज्वल सीताराम सावंत .७५ पॉइंटसह दुसरातर ओजस रमेश सन्नक .७५ पॉइंटसह तिसरा आला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्रीरवींद्रजी मानेकार्याध्यक्षा सौनेहा मानेउपाध्यक्ष श्रीमनोहर सुर्वे,   सचिव श्रीचंद्रकांत यादव,  सहसचिव श्रीदिलीप जाधवप्राचार्य डॉमहेश भागवतपरीक्षा विभागप्रमुख प्राविश्वनाथ जोशी  प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.   

प्रशिप्रसंस्थेचे राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय मागील चोवीस वर्षापासून समाजाच्या विविध स्तरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देत आहे. महाविद्यालयामध्ये मेकॅनिकलऑटोमोबाईलकम्प्युटर  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यासारखे पदवी अभ्यासक्रम असून एमबीए हा पदव्युत्तर विभाग आहेमहाविद्यालयाचा परिसर हा तब्बल ३१ एकर मध्ये पसरलेला असूनउच्चशिक्षित  अनुभवी प्राध्यापकअत्याधुनिक उपकरणांनी सुसज्य लॅबोरॅटरी आणि विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण  रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न हि महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये आहेतअभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना नियमितपणे अॅप्टीट्यूड टेस्ट,  ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूचे प्रशिक्षण नियमितपणे दिले जातेया सर्व एकत्रित प्रयत्नांमुळेच महाविद्यालयाचा वार्षिक निकाल उत्तम असून विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये घवघवीत यश प्राप्त होत आहेनुकत्याच संपलेल्या शैक्षणिक वर्षांत टी सी एसविप्रोइफोसीसइंफोजेन लॅब्जकॅपजेमिनीवदिनी इन्फोसेंटरपेंटागॉन स्पेस,एन टी टी डाटा सर्विस,स्कॉलर कट्टा यासारख्या नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यूमध्ये महाविद्यालयाचे विविध विभागातील तब्बल ६५ नोकरीसाठी निवडले गेले.

 

फोटो:





No comments:

Post a Comment