Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने एम एम एस मध्ये “एक्सप्लोअर – 2 के 23” महोत्सवाचे यशस्वी आयोजन

 राजेंद्र माने एम एम एस मध्ये “एक्सप्लोअर – के 23” महोत्सवाचे यशस्वी आयोजन

 

देवरुख:

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने महाविद्यालयामधील एम.एम.एस विभागाचा   एक्सप्लोअर – के 23”  हा दोन दिवसाचा वार्षिक मॅनेजमेंट फेस्टिवल दिमाखात संपन्न झाला.  रत्नागीरी जिल्ह्यातील विविध पदवी महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येतेबेस्ट परसोना स्पर्धा  जनरल चॅम्पियनशिप सारखी मुख्य आकर्षण असणा-या या दोन दिवसीय मॅनेजमेंट फेस्टिवलमध्ये अॅडमॅड जुनूनबेस्ट आउट ऑफ वेस्टरंगोलीफोटोग्राफीफेस पेंटिंगपोस्टर मेकिंगबिझिनेस क्विझ यासारख्या विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात आल्याजिल्ह्यातील जवळपास ०९ महाविद्यालयातील सुमारे २२५ विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.  

कार्यक्रमाच्या नुकत्याच झालेल्या सांगता समारंभ प्रसंगी संस्थेचे संस्थापक श्रीरविंद्रजी माने यांच्याबरोबर व्यासपीठावर प्रद्युम्न मानेप्रमुख पाहुणे  आठल्ये सप्रे कॉलेज देवरुखचे प्राचार्य डॉनरेंद्र तेंडोलकरमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवतएम एम एस विभागप्रमुख प्रामोहन गोसावी उपस्थित होते.

 

 कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन  सरस्वती वंदनाने करण्यात आलीप्रामोहन गोसावी यांनी प्रास्ताविक करताना मॅनेजमेंट फेस्टिवल आयोजनामागील उद्देश स्पष्ट केलातसेच विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवर  स्पर्धक विद्यार्थ्यांचे स्वागत केलेयानंतर महविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील अभ्यासक्रम  रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती दिलीतसेच स्पर्धेतील महाविद्यालये  विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादाबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभार मानले

यानंतर डॉतेंडोलकर यांनी मार्गदर्शन केलेत्यांनी सध्याची स्पर्धा हि विविध कारणामुळे कठीण बनत असली तरीही त्यासाठी उत्तम तयारी  योग्य तंत्राची जोड दिल्यास जिंकणे सोपे होऊन जाइल असे सांगितलेजोपर्यंत तुम्ही प्रयत्न सोडत नाही तोपर्यंत तुम्ही पराभूत होऊ शकत नाही हा कानमंत्र त्यांनी दिला. तसेच कार्यक्रमाचे  यशस्वी आयोजन  इतर विविध उपक्रमांबद्दल राजेंद्र माने महाविद्यालयाच्या एम.एम.एस विभागाचे कौतुक केलेसहभागी स्पर्धकांनीही या फेस्टिवलमधील सहभाग  महाविद्यालय परिसरातील दोन दिवस एक सुंदर अनुभव होता असे सांगितले.

माजी राज्यमंत्री श्रीरवींद्र माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेची मागील पंचवीस वर्षातील यशस्वी वाटचाल अधोरेकीत करताना यामध्ये योगदान असणा-या सर्वांच्या कष्टाचे हे फलित असल्याचे नमूद केलेउद्योग धंद्यामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापकीय ज्ञानाबरोबरच अशा स्पर्धांमधील सहभाग  नेहमीच उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. “एक्सप्लोअर – के 23” मध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने गोगटे जोगळेकर महाविद्यालय  रत्नागिरीइंदिरा इंस्टीट्युट ऑफ फार्मसी देवरुख, आठल्ये सप्रे महाविद्यालय देवरुखनवनिर्माण कॉलेज संगमेश्वर, आबासाहेब मराठे कॉलेज राजापूर इ. महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवला.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेरोख रकमेची पारितोषिके देण्यात आलीरत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय  महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विजेतेपदे मिळवत एक्सप्लोअर  k १९ जनरल चॅम्पियनशिप पटकाविलीकार्यक्रमाचे नियोजनामध्ये एम एम एस विभागातील सर्व प्राध्यापकविद्यार्थी प्रतिनिधी  इतर कर्मचा-यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

 

फोटो:       



No comments:

Post a Comment