Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारतीय हवाई दलाचे जागरूकता अभियान

 राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारतीय हवाई दलाचे जागरूकता अभियान

देवरुख:

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये दिल्लीतील भारतीय हवाई दलातर्फे “इंडक्शन पब्लिसिटी प्रोग्राम” चे आयोजन करण्यात आले होते. हवाई दलाचे कामकाज व रोजगाराच्या उपलब्ध संधींची  विद्यार्थ्यांना माहिती करून देण्याचा व विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे प्रेरित करण्याचा यामागे मुख्य उद्देश होता. याच अनुषंगाने हवाई दलाने  फ्लाईट सिमुलेटर तसेच अन्य सलग्न साधन यंत्रांनी सुसज्य बनविलेल्या एक्झीबिशन व्हेहिकलमधून विद्यार्थ्यांना हवाई दलाच्या  कामकाजाचा  प्रत्यक्ष अनुभव घडवून आणला.

सुरुवातीला संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मारविंद्रजी माने यांच्या हस्ते कार्यक्रमाला उपस्थित हवाई दलाच्या सर्व अधिकाऱ्यांचे यथोचीत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी प्रद्युम्न माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, तंत्रानिकेतनचे प्राचार्य प्रा. नितीन भोपळे व्यासपीठावर उपस्थित होते. 

या अभियानादरम्यान भारतीय हवाई दलातील प्रशिक्षण व जीवन, भारतीय हवाई दलातील संधी, फ्लाईट सिमुलेटर  याविषयी माहिती देण्यात आली. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर सिजोमोन के. व्ही., स्क्वाड्रन लीडर देवाशिष अय्यर, फ्लाईट लेफ्टनंट दया एस. अगरवाल, फ्लाइंग ऑफिसर अंकित भट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्येही विमानाबद्दल असणारे कुतूहल दिसून आले. विद्यार्थ्यांनी यावेळी विचारलेल्या सर्व शंकांचे यावेळी उपस्थित हवाई दलाच्या अधिका-यानी निरसन केले. प्र.  शि. प्र. संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, राजेंद्र माने तंत्रनिकेतन त्याचबरोबर मीनाताई ठाकरे विद्यालय  व कनिष्ठ महाविद्यालय देवरुख, माने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी मधील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमात भाग घेतला.

 

फोटो:    






No comments:

Post a Comment