Saturday, August 29, 2015

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “टीम फुल थ्रोटल” ची नोएडा ‘गो कार्टिंग’ स्पर्धेसाठी निवड

फेब्रुवारी २०१६ मध्ये होणाऱ्या नोएडा गो कार्टिंग स्पर्धेसाठी आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील “टीम फुल थ्रोटल ची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.नोएडा दिल्ली स्थित ‘इंडियन सोसायटी फॉर न्यु एरा इंजिनियर्स’ या संस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून “बुद्ध इंटरनॅशनल सर्किट नोएडा” येथील आंतरराष्ट्रीय फोर्मुला रेसिंगच्या ट्रॅकवर ही स्पर्धा होणार आहे.
  या स्पर्धेच्या निवड प्रक्रियेअंतर्गत २३ ऑगस्ट रोजी इंदौर येथे ‘गो कार्ट डिझाईन चॅलेंज’ हि उपांत्य फेरी पार पडली.या फेरीअंतर्गत नोंदणीकृत २०० संघांमधून उपांत्य फेरीसाठी देशभरातून १०० संघ निवडण्यात आले होते.या उपांत्य फेरीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यानुसार या  महाविद्यालयाच्या “टीम फुल थ्रोटल ने पाचवा क्रमांक पटकावला.या उपांत्य फेरीमध्ये सहभागी संघाची डिझाईन प्रेसेंटेशन,कॉस्ट रिपोर्ट,प्रोजेक्ट प्लॅन आदी निकषांवर तयारी आजमावण्यात आली.यामध्ये “टीम फुल थ्रोटल कॉस्ट रिपोर्ट या निकषामध्ये सर्वोत्तम ठरली.अॅक्रोपोलीस टेक्निकल कॅम्पस इंदौर येथे उल्लेखनीय यश संपादन केलेल्या या टीममध्ये महाविद्यालयातील मयूर राऊळ,सिमरनजीत सिंग,कौशल हलवाई,प्रतिक कसाळकर,आदित्य पवार,अनिकेत तांबे व पुष्पराज पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.शिक्षक सल्लागार म्हणून प्रा.सुमित सुर्वे यांनी मार्गदर्शन केले.
  या संदर्भात बोलताना सिमरनजीत सिंग याने सांगितले की राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक मिळाल्यामुळे संघासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.संस्थाध्याक्ष श्री.रविंद्र माने यांची प्रेरणा,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचे प्रोत्साहन,विभागप्रमुख प्रा. निमेष ढोले व प्रा.एस.आर.भंडारी  यांचे सहकार्य,शिक्षक सल्लागार प्रा.सुमित सुर्वे यांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाले. महाविद्यालयातर्फे सदर “टीम फुल थ्रोटल ला नोएडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 


Wednesday, August 12, 2015

आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्याल्यात “ “सायबर सिक्युरिटी अँड इथिकल हॅकिंग” ” वर कार्यशाळा
 
   देवरुख: आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्याल्यात संगणक अभियांत्रिकी विभागामार्फत “सायबर सिक्युरिटी अँड इथिकल हॅकिंग” या विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली.या वेळी संगणक अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. एल.एस.नाईक यांनी कार्यशाळेची उपयुक्तता विषद केली.
  दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या कार्याशाळेमध्ये दिल्ली येथील “गीक्स लॅब टेक्नॉलॉजीस” या अस्थापानातील तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.या प्रसंगी “हॅकिंग ट्रीक्स आणि सिक्युरिटी अवेअरनेस” या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले गेले.
  कार्यशाळेच्या दुसर॒या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व हॅकिंग टूलकीट वितरण करण्यात आले.यावेळी उत्स्फूर्तपणे अनुभव कथन करताना या कार्याशाळेमध्ये आपल्याला चांगली माहिती मिळाली असून दैनंदिन वाढणाऱ्या सायबर क्राईमपासून कसे सावध राहता येईल या विषयी अधिक मार्गदर्शन लाभले असे विद्यार्थ्यांनी सांगितले.महाविद्यालाचे प्राचार्य डॉ.एम. एम. भागवत यांनी सहभागी विद्यार्थ्यांना भविष्यातही अशा प्रकारच्या पाठ्यक्रमेतर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन कौशल्य वृद्धी करणे आवश्यक आहे असे सांगितले.शेवटी आभार प्रदर्शन झाले.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख प्रा. एल.एस.नाईक, कार्यशाळा समन्वयक प्रा.व्ही.एन.माळवदे यांसह प्रा.(सौ)सावंत, प्रा.गमरे, प्रा.गजमल,श्री.महाडिक, श्री.शेलार यांनी कष्ट घेतले.