Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे स्वागत

 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता प्रचार यात्रेचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, महाविद्यालयाच्या इन्स्टीट्युट इनोवेशन सेलचे प्राध्यापक सदस्य व विद्यार्थ्यांनी स्वागत केले.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामध्ये देशातील तरुण वर्गाला नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची प्रेरणा मिळावी व त्या समाजासाठी उपयुक्त माध्यमामध्ये परावर्तीत करता याव्यात यासाठी मदत मिळावी या प्रमुख उद्देशाने इनोवेशन सेलची स्थापना करण्यात आली. तसेच त्यानुसार या मंत्रालयाकडून उच्च शिक्षण देणाऱ्या काही निवडक महाविद्यालयांना आपल्या ठिकाणीहि  इनोवेशन सेल  स्थापन करण्याचे निर्देश आहेत. या विविध संस्थांच्या स्वतंत्रपणे कार्यरत असणा-या सेलमार्फत त्या त्या भागातील युवकांना स्टार्टअप व त्यांच्या संकल्पना साकारण्यासाठी साठी पूरक यंत्रणा उभी करणे यावर भर दिला जात आहे.   

या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये स्थापन झालेल्या इन्स्टीट्युट इनोवेशन सेलमार्फत विद्यार्थ्यांना उद्योजकता वाढीसाठी बहुमोल मार्गदर्शन करण्यात येते. नामांकित उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक यांची व्याख्याने तसेच कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मारवींद्र माने तसेच संस्था पदाधिकारी यांचे याअंतर्गत उपक्रमांना नेहमीच पाठबळ लाभत असते.

 महाराष्ट्र राज्य इनोवेशन सोसायटीतर्फे १३ व १४ सप्टेंबर रोजी स्टार्टअप स्पर्धा होत आहेत. कृषी, शिक्षण, आरोग्य व इतर विषयांवरील युवकांच्या स्टार्टअप कल्पनांचे यावेळी सादरीकरण होणार असून विजेत्यांना रोख रकमेची भरघोस पारितोषिके देण्यात येतील. जिल्हा व राज्य अशा दोन्ही स्तरावर विजेते निवडले जाणार असून त्यांना तज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरविले जाणार आहे.

या स्पर्धेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी  शासनाच्या रत्नागिरी येथील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता सेंटरतर्फे  सहसंचालक मा. गणेश बितोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा सुरु आहे. दरम्यान गणेश मुंढे यांनी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना यात्रा वाहनावरील डिजिटल स्क्रीनद्वारे सखोल माहिती देऊन मार्गदर्शन केले. डॉ. महेश भागवत यांनी  याप्रसंगी आजच्या काळात विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे जास्तीतजास्त वळण्याची गरज असल्याचे सांगून या यात्रेमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत मिळेल असे म्हटले तसेच या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यानी हिरीहीरीने सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. यांनी समन्वयक प्रा. स्वप्नील राउळ, व प्राध्यापक सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

Photos:

१.      महविद्यालयातील विद्यार्थ्यांना यात्रा वाहनावरील डिजिटल स्क्रीनद्वारे स्टार्टअप स्पर्धेसंबंधी माहिती देताना गणेश मुंढे सोबत प्राचार्य डॉ. महेश भागवत व प्राध्यापक

२.      महविद्यालयातील विद्यार्थ्यांना यात्रा वाहनावरील डिजिटल स्क्रीनद्वारे स्टार्टअप स्पर्धेसंबंधी माहिती देताना गणेश मुंढे सोबत प्राचार्य डॉ. महेश भागवत व प्राध्यापक

३.      महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा प्रसंगी श्री. गणेश मुंढे यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत सोबत प्राध्यापक व विद्यार्थी





No comments:

Post a Comment