Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या कॉम्पुटर विभागाचा 'आय स्पार्क २०२३' उपक्रम संपन्न

 राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या कॉम्पुटर विभागाचा 'आय स्पार्क २०२३उपक्रम संपन्न

आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  नुकताच आय स्पार्क २०२३” हा अनोखा उपक्रम उत्साहात पार पडलामहाविद्यालयाच्या कॉम्पुटर विभागातील असोसिअशन ऑफ कॉम्पुटर इंजिनीरिंग (एससंघटनेने हा उपक्रम घेतलायामध्ये राजेंद्र माने पॉलिटेक्नीक,  राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग  टेक्नॉलॉजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसहित मीनाताई ठाकरे विद्यालयन्यू इंग्लिश स्कूलपी.एसबने इंटरनॅशनल स्कूलआश्रमशाळा निवेलोक विद्यालय तुळसनीमाने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरीच्या शालेय विद्यार्थ्यासाठीही स्पर्धात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

संस्थाध्यक्ष मारविंद्रजी माने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलेयावेळी प्राचार्य डॉमहेश भागवतविभागप्रमुख प्रा. लक्ष्मण नाईक तसेच अन्य महाविद्यालय  शाळामधून आलले प्राध्यापकस्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत विज्ञान प्रकल्प प्रदर्शनवेब डिझायनिंगचित्रकला, प्रश्नमंजुषानकाशा भरणे  यासारख्या आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होतेनजीकची  महाविद्यालये  शाळा यामधून जवळपास दीडशे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होतेयातील नकाशा भरणे स्पर्धेत मीनाताई ठाकरे विद्यालयाची  निधी सावंतचित्रकला स्पर्धेत  माने इंटरनॅशनल स्कूलची  नारायणी चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

विज्ञान प्रकल्प प्रदर्शन मध्ये पी.एसबने इंटरनॅशनल स्कूलचे शुभम महाडिक आणि संकल्प अंकुशराव तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत माने इंटरनॅशनल स्कूलचे अभिराज कांबळे आणि अर्श काझी यांनी  प्रथम क्रमांक पटकाविला.शब्दकोडे स्पर्धेत मीनाताई ठाकरे विद्यालयाची नुपूर भुरवणे वेब डिझायनिंग स्पर्धेत राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या मनोज  गोठणकर याने प्रथम क्रमांक पटकाविला.

या उपक्रमाचे औचित्य साधून प्राचार्य डॉमहेश भागवत यांनी होतकरू विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्व विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉमहेश भागवतविभागप्रमुख प्रालक्ष्मण नाईक तसेच अन्य मान्यवराच्या हस्ते प्रशस्तीपत्रके  पारितोषिक वितरण करण्यात आले.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी एस संघटनेच्या प्रमुख प्रामानसी गोरेविद्यार्थी प्रमुख तेजस सुतार तसेच विभागीय प्राध्यापक  कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

Photo:

 




No comments:

Post a Comment