Monday, April 2, 2018

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभागातर्फे" आयओटी(IoT)–इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सिरीअल बसेस” या विषयावर कार्यशाळा संपन्न‼  फोटो:-"आयओटी(IoT)इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सिरीअल बसेस” कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रोलिफिक         सिस्टिम्सचे तज्ञ व अंतिम वर्षाचे विद्यार्थी

            फोटो:- अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभागाचे विद्यार्थी कार्यशाळेत प्रात्यक्षिक करताना
  आयओटी(IoT)- इंटरनेट ऑफ थिंग्स हे नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून त्याचे विविध औद्योगिक क्षेत्रात असणारे फायदे लक्षात घेता राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभागातर्फे आयओटी (IoT)–इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सिरीअल बसेसया विषयांतर्गत नुकतीच चार दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली.हि कार्यशाळा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली व त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.अंतिम वर्षाच्या एकूण ५१ विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.  
  सन २०२० पर्यंत जवळपास २५ बिलियन उपकरणे आयओटी या नवीन वायरलेस तंत्रज्ञानाद्वारे जोडली जातील व त्याद्वारे विद्यार्थ्यांना मुबलक प्रमाणात नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे या कार्याशाळेमध्ये प्रोग्रॅमिंगद्वारे प्रात्यक्षिक करण्यावर भर देण्यातआला.या कार्याशाळेला श्री.राजेश रागासे श्री.आनंद राउत (प्रॉलिफिक सिस्टिम्स अँड टेक्नोलॉजीस् प्रा.लि.,पुणे) या तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. किल आयडीइ,ऑर्द्युनो आयडीइ,फ्लॅश मॅजिक या सॉफ्टवेअर माध्यमांचा उपयोग विद्यार्थ्यांनी केला.“आयओटी ची प्रस्तावना,करंट बिझनेस ट्रेंड्स इन आयओटी,इएसपी 8266 ची प्रस्तावना, इएसपी मोड्युलचे प्रकार व वैशिष्ट्ये, इएसपी 8266 प्रोग्रामिंग इन ओर्द्युनो, इएसपी 8266 मध्ये वायफाय कसे कनेक्ट करावे,होम अॅप्लिकेशन युसिंग आयओटीआदी विषयांवर मार्गदर्शनप्रात्यक्षिक करण्यात आले.
  आयओटी या नवीन विषयाचे सखोल ज्ञान,त्याची व्याप्ती विद्यार्थ्यांना समजावी तसेच त्याविषयीच्या कौशल्याची वृद्धी व्हावी या उद्देशाने हि कार्यशाळा आयोजित केली होती.अशा कोर्सेसना भारत सरकारच्यानॅशनल स्किल डेव्ह्लपमेंट कॉर्पोरेशनचीमान्यताआहे.महाविद्यालयाने याच कारणास्तव प्रोलिफिक सिस्टिम्स अँड टेक्नोलॉजीस् प्रा.लि.,पुणे यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.
  कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यशाळा समन्वयक प्रा.संदिप भंडारे,विभागप्रमुखप्रा.अजित तातुगडे अन्य शिक्षकेतर कर्मचा-यांनी विशेष मेहनत घेतली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत व संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम विभागातर्फे “एम्बेडेड टेक्नोलॉजी” वर कार्यशाळा संपन्न!!


                          

1)  कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रोलिफिक सिस्टिम्सचे ज्ञ तृतीय वर्षाचे विद्यार्थी


 २) “एम्बेडेड टेक्नोलॉजीया कार्यशाळेत प्रात्यक्षिक करताना इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम विभागाचे        विद्यार्थी

  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम विभागातर्फे एम्बेडेड टेक्नोलॉजीया विषयांतर्गत नुकतीच चार दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली.हि कार्यशाळा तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.तृतीय वर्षाच्या एकूण ५० विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.  
  या कार्याशाळेला श्री.राजेश रागासे श्री.आनंद राउत (प्रॉलिफिक सिस्टिम्स अँड टेक्नोलॉजीस् प्रा.लि.,पुणे) या तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.हि कार्यशाळा एम्बेडेड टेक्नोलॉजी विषयाचे सखोल ज्ञान,त्याची व्याप्ती विद्यार्थ्यांना समजावी तसेच त्याविषयीच्या कौशल्याची वृद्धी व्हावी या उद्देशाने आयोजित केली होती.अशा कोर्सेसना भारत सरकारच्यानॅशनल स्किल डेव्ह्लपमेंट कॉर्पोरेशनचीमान्यता आहे.महाविद्यालयाने याच कारणास्तव प्रोलिफिक सिस्टिम्स अँड टेक्नोलॉजीस् प्रा.लि.,पुणे यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.
  या कार्याशाळेमध्ये मायक्रोकन्ट्रोलर आर्म प्रोसेसर यांच्याएम्बेडेडसीआणिअसेम्ब्लीभाषांमधून प्रोग्रॅमिंगद्वारे प्रात्यक्षिक करण्यावर भर देण्यात आला.किल आयडीइ,फ्लॅश मॅजिक या सॉफ्टवेअर माध्यमांचा उपयोग विद्यार्थ्यांनी केला.त्यामुळे या साधनांचा प्रत्यक्ष वापर करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.मायक्रोकन्ट्रोलरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी मोटर ड्राईव्हर,एल सी डी डिस्प्ले,कीपॅड .उपकरणांवर नियंत्रण कसे करावे याचे प्रात्यक्षिक केले.
  कार्यशाळेचा उद्देश विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे यांनी विषद केला. नवीन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते.अशा कार्यशाळांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आपले कौशल्य वाढवावे अशी प्रतिक्रिया या कार्यक्रमासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी व्यक्त केली.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यशाळा समन्वयक प्रा.महेश पावसकर,विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे अन्य शिक्षकेतर कर्मचा-यांनी विशेष मेहनत घेतली.
माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “ऑटो सर्व्हिस सेंटरचे” संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी मानेंच्या शुभहस्ते उद्घाटन‼फोटो:- उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष रविंद्रजी माने,कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने,प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ.महेश भागवत, ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये,उपस्थित मान्यवर तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग
   देवरुख वार्ताहर:
  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय संचलित तंत्रज्ञानाचा समाजाला फायदा व्हावा म्हणून अद्ययावत “ऑटो सर्व्हिस सेंटरचे” उद्घाटन गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने यांच्या शुभहस्ते तसेच कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने,प्रद्युम्न माने तसेच देवरुख शहरातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांच्या उपस्थितीत पार पडले.   
  अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कॉम्प्यूटराईज्ड व्हील अलाइन्मेंट, व्हील बॅलन्सिंग तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल आदी सुविधांचा यामध्ये समावेश आहे. देवरुख आणि परिसरातील वाहनधारकांसाठी हि एक अतिशय चांगली सुविधा महाविद्यालयातर्फे मैत्री पेट्रोल पंप येथे सुरु झाली आहे व याचा लाभ देवरुख व आसपासच्या परिसरातील वाहनधारकांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.महेश भागवत तसेच ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये यांनी केले आहे.
  या ऑटो सर्व्हिस सेंटरमध्ये एकाच छताखाली अत्याधुनिक उपकरणांवर प्रशिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध असणार आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयातील अद्ययावत तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता ते समाजाभिमुख व्हावे या संस्थाध्यक्ष श्री. रविंद्रजी माने यांच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. संस्थाध्यक्ष श्री. रविंद्रजी माने यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
  उद्घाटनानिमित्त व्हील अलाइन्मेंट, व्हील बॅलन्सिंग वरती विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे.ही सवलत पुढील काही दिवसांसाठी उपलब्ध राहणार आहे.अधिक माहिती ऑटो सर्व्हिस सेंटरवर उपलब्ध होईल.