Wednesday, October 25, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम‼  मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून त्यामध्ये आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
  या वर्षी महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल विभागातून रुपेश अवसरे हा विद्यार्थी 8.१८ (CGPA) गुण मिळवून विशेष प्राविण्यासह महाविद्यालयात प्रथम  आला. अभिषेक सुतार व प्रसाद नलावडे ह्या विद्यार्थ्यांनी  ७.६२(CGPA)  आणि ७.५५ (CGPA)  गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा   क्रमांक पटकावला. ऑटोमोबाईल विभागाचा निकाल ९८.७७% लागला.
  माहिती तंत्रज्ञान या शाखेचा महाविद्यालाचा निकाल १००% लागला असून अमोल भागवत हा 8.७३(CGPA) गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम आला. रोमा अहिरे आणि विशाखा बाबरदेसाई ह्यांनी अनुक्रमे 8.५६(CGPA)  व ७.७२(CGPA)  गुण मिळवून दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. संगणक विभागाचा निकाल ९१.१८% लागला असून सायली लोगडे, दीपिका देवरुखकर आणि संकेत गडदे हे अनुक्रमे 8.३४, 8.१९, 8.०३(CGPA) गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
  अणुविद्युत व दूरसंचार विभागाचा निकाल ८१.०८ % लागला असून श्रद्धा शिंदे,ऋतुजा भुर्के व अश्विनी भट हे अनुक्रमे 8.२३, 8.१३ व ७.९५ (CGPA)  गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.एमएमएस विभागाचा निकाल ८६.६७ % लागला असून मसूमा पागरकर,रोहन खामकर,क्रांती सावंत हे अनुक्रमे ६.७६, ६.६८  व ६.४४ (CGPA)  गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
  यांत्रिकी विभागाचा निकाल ८२.०९% लागला असून अजय पाटील,सिद्धार्थ गुरव आणि प्रथमेश शिर्के हे अनुक्रमे 8.८०, 8.४१ व ७.९० (CGPA) गुण मिळवून महाविद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयातील सर्व विभागांमधून एकूण ३२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ८१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री.रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ.नेहा माने, उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, सचिव श्री. चंद्रकांत यादव, सहसचिव श्री.दिलीप जाधव, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच परीक्षा विभाग प्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.


राजेंद्र माने आभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागामध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न!


फोटो: वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध ग्रंथांचे वाचन करताना महाविद्यालयातील विद्यार्थी

     डॉ. ए .पी .जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राजेंद्र माने आभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ग्रंथालय व व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .यानिमित्त ग्रंथालय विभागामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. महावीर साळवी, ग्रंथालय प्रमुख प्रा. जितेंद्र खैरनार, प्रा.मिलिंद शिंदे, प्रा.सीमा भुरवणे, ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. जाधव सर , ग्रंथालय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  
    विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त ग्रंथालयात उपलब्ध असलेले साहित्य जसे की संदर्भ पुस्तके,ई-बुक्स,ई-रिसोर्सेस,व्यक्तिमत्त्व विकास विषयक पुस्तके,नियतकालिके आदींचा जास्तीत जास्त वापर करावा व वाचनासाठी वेळ द्यावा हा वाचन प्रेरणा दिनाचा प्रमुख उद्देश होता.  यावेळी बोलतांना महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रमुख प्रा. जितेंद्र खैरनार म्हणाले की विद्यार्थ्यांनी ग्रंथ व डिजीटल साहित्य या माध्यमातून वाचनाचा दिवसातून कमीतकमी एक तास लाभ घ्यावा. यानंतर व्यवस्थापन विभागाची विद्यार्थीनी कोमल जाधव हिने डॉ.ए .पी .जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला . तसेच ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. जाधव सर यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे सुचवले .

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सीमा भुरवणे यांनी केले . या कार्यक्रमासाठी प्रा.मिलिंद शिंदे व ग्रंथालय कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमएमएस विभागाला शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवरांची भेट !!

फोटो:- बैठकी दरम्यान उपस्थित शैक्षणिक व  औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर व एमएमएस विभागाचा प्राध्यापक वर्ग
  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमएमएस विभागाला शैक्षणिक व  औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवरांनी नुकतीच भेट दिली. विभागाच्या भविष्यातील वाटचालीसाठी व गुणवत्ता वाढीसाठी पूरक शैक्षणिक वातावरण व धोरणात्मक बदलांकरीता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
  सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी यांनी विभागातील चालू घडामोडी व विभागातील आतापर्यंतच्या कामकाजाचा आलेख मान्यवरांना सादर केला.या बैठकीमध्ये बोलताना श्री.एस.एच.केळकर कॉलेज ऑफ आर्टस,कॉमर्स अॅंड सायन्स कॉलेज देवगडचे प्राचार्य डॉ.श्री.जी.टी.परुळेकर यांनी मार्गदर्शन केले.तसेच गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरीच्या प्राचार्या व अर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.यस्मिन आवटे यांनी विभागामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक ACTIVITY BASED LEARNING (ABL) अंतर्गत व्यवस्थापनाचे शिक्षण देण्यात यावे असे सूचित केले. याप्रसंगी आयडीबीआय बँक साखरपा शाखेचे व्यवस्थापक मां.श्री.जितेंद्रकुमार यांनी IIM  व इतर उच्च दर्जाच्या व्यवस्थापनातील कॉलेजेसना भेट देऊन आपल्या गुणवत्तेत कशा प्रकारे वाढ करता येईल ते आत्मसात करून तसे धोरण राबवावे असे सुचविले.
  यावेळी बोलताना श्री.एस.एच.केळकर कॉलेजचे बीएमएस विभागप्रमुख श्री.बाळकृष्ण तेऊरवाडकर यांनी व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये कोणता बदल होणे आवश्यक आहे यावर विशेष भर दिला.याप्रसंगी विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास व व्यवस्थापन शिक्षणाच्या अनुषंगाने येणाऱ्या सुचवलेल्या  सर्व गोष्टी राबविण्याची हमी दिली. एमएमएस विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या सर्व मान्यवरांनी वरीलप्रमाणे मार्गदर्शन केले.हे सर्व मान्यवर एमएमएस विभागाच्या डिपार्टमेंट अॅडव्हायझरी बोर्ड समितीचे सभासद आहेत. उपस्थित सर्व मान्यवरांनी संपूर्ण विभागाची प्रवेश क्षमता परिपूर्ण केल्याबद्द्ल विशेष कौतुक केले व सध्या चालत असलेल्या घडामोडींवर व राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांवर समाधान व्यक्त केले.
  अशा बैठका वरचेवर आयोजित करण्यात याव्यात व त्यावर सकारात्मक चर्चा व्हावी व त्याअनुशंगाने बदल करण्यात यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकासात्मक बदल होईल व विद्यार्थी तो अंगीकृत करतील असे महाविद्यालयाचे चेअरमन श्री. रवींद्र माने यांनी सांगितले.तसेच हा उपक्रम कौतुकास्पद असलेचे त्यांनी नमूद केले.या बैठकीकरता विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी व प्राध्यापक वर्ग यांनी आभार व्यक्त केले.


राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात नेचर क्लबतर्फे सेमिनारचे आयोजन


 आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नेचर क्लबतर्फे विविध विषयांवर मान्यवरांचे सेमिनार आयोजित करण्यात आले. मान्यवरांची ओळख व प्रास्ताविक नेचर क्लब प्रमुख प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी केले.कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या नेचर क्लब,एन एस एस या विभागांचे समन्वयक व विद्यार्थी, विद्यार्थीनींना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
  कार्यक्रमाला लांजा येथील आर्टस,कॉमर्स व सायन्स कॉलेजचे डॉ.विक्रांत बेर्डे यांनी ग्रीन ऑडीट यासंदर्भात विस्तृत माहिती दिली.त्यानंतर इको स्पेस ग्रीन,पुणे कंपनीचे डायरेक्टर डॉ.श्रीनाथ कवडे यांनी पर्यावरण जागृती वरील आपल्या सेमिनारमध्ये मानवनिर्मित घडामोडींमुळे होणारी पर्यावरणाची हानीची सर्वांना जाणीव करून दिली व टी टाळण्यासाठीच्या विविध उपायांची सखोल माहिती दिली.बेंगलोर येथील हिमालया कंपनीचे सीएसआर श्री.अनुप महाजण यांनी निसर्गाला गुरु मानून माणसाने मेडिकल व तंत्रज्ञान क्षेत्रात कसे प्रयोग केले व नाविन्यपूर्ण वस्तू तयार केल्या याचे विवेचन केले.सर्व मान्यवरांनी आपल्या संदेशामध्ये निसर्गावरील मानवाचे अवलंबीत्त्व स्पष्ट करून त्याचे संगोपन व संवर्धन करण्याचा बहुमोल सल्ला दिला.तसेच शाश्वत प्रगतीचा सल्ला उपस्थितांना दिला.
  कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाला प्रा.वैभव डोंगरे,प्रा.ओंकार गद्रे,प्रा.गणेश वाफेलकर व नेचर क्लब तसेच एन एस एस चे बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांचे आयोजनासाठी प्रोत्साहन लाभले.


माने अभियांत्रिकीचा एम.एम.एस. विभागातर्फे प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरिता "परिचय २०१७”चे आयोजन !!
फोटो:-  परिचय २०१७ प्रसंगी प्रमुख पाहुणे आयडीबीआय बँक साखरपा शाखेचे व्यवस्थापक श्री.जितेंद्रकुमार , संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, एम,.एम. एस. विभाग प्रमुख प्रा.महावीर साळवी
   राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एम.एम. एस. विभागाच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरिता "परिचय २०१७ या इंडक्शन प्रोग्रामचे  चे नुकतेच आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयडीबीआय बँक साखरपा शाखेचे व्यवस्थापक श्री.जितेंद्रकुमार, संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, एम.एम. एस. विभाग प्रमुख प्रा.महावीर साळवी उपस्थित होते.
  विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यस्थापन शास्त्राचे शिक्षण अनिवार्य आहे तसेच विद्यार्थ्यांनी प्रत्येक संधीमध्ये यश शोधावे असे मत प्रमुख पाहुणे आयडीबीआय बँक साखरपा शाखेचे व्यवस्थापक श्री.जितेंद्रकुमार यांनी व्यक्त केले.त्यांनी विद्यार्थ्यांना समर इंटरनशिप प्रोजेक्ट्ससाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी हमी दिली.यावेळी मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने यांनी  विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितले कि विद्यार्थ्यांनी मोठी ध्येय उराशी बाळगून पुढे वाटचाल करावी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनीही विशेष मार्गदर्शन केले.
  यावेळी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या मार्कबीज २०१७" या मार्केटींग इव्हेंटमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व एम.एम. एस.च्या विद्यार्थ्यांना व मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेणेत आलेल्या विविध कला गुणांच्या वाढीसाठी सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
   याप्रसंगी एम.एम. एस. विभाग प्रमुख प्रा.महावीर साळवी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व सकारात्मक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी एम.एम. एस. विभागातील प्राध्यापक वर्ग व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात निसर्ग सहलीचे आयोजन!!

  आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नेचर क्लबने विद्यार्थ्यांसाठी निसर्ग सहल आयोजीत केली होती. विद्यार्थ्यांना निसर्गातील वनस्पती,पशुपक्षी यांची माहिती व्हावी,मानवनिर्मित प्रदूषण व इतर गोष्टींमुळे निसर्गाची होणारी हानी लक्षात यावी तसेच त्यांच्यात निसर्ग संगोपन व संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी महाविद्यालयाचा नेचर क्लब अशा प्रकारचे उपक्रम व मान्यवरांचे सेमिनार आयोजित करतो.
  याअंतर्गत आंबाघाट ते विशालगड दरम्यान जंगलातील निवडक वनस्पती व पशुपक्ष्यांची मुलांना माहिती करून देण्यात आली तसेच याच  रस्त्यावरील शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या पावनखिंडीला विद्यार्थ्यांनी भेट दिली व त्याचा इतिहास माहित करून घेतला. त्यानंतर माणोली धारण व तिथून जवळपास ३० किमी वरील कोल्हापूर जिल्ह्यातील  प्रसिद्ध बरकी येथे ट्रेकिंगचा अनुभव घेतला व तेथील धबधब्याचा मनमुराद आनंद लुटला.

  या  सहलीचे सर्व आयोजन नेचर क्लबप्रमुख प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी केले.सहल यशस्वीतेसाठी सुशांत धारवट,हर्षाली माकडे, हर्शल मोचेमाडकर,दत्तप्रसाद निर्मल,स्वराज सावंत,श्रेया जंगम या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.प्रा.संदेश रसाळ यांचेही सहकार्य लाभले. यामध्ये  एकूण पन्नास विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ.महेश भागवत यांचे याकामी प्रोत्साहन मिळाले.

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागातर्फे “ प्लॅनिंग अ स्मॉल बिझनेस अॅंड सोर्सिंग ऑफ इन्फॉर्मेशन ” या विषयावर व्याख्यान संपन्न‼!


फोटो:- मार्गदर्शक अनिकेत भोसले, डायरेक्टर,डिझाईन फॉर एक्सलन्स, मुंबई, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
                                                                                 
आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅंड टेक्नॉलॉजी मध्ये उद्योजकता विकास विभागातर्फेप्लॅनिंग अ स्मॉलबिझनेस अॅंड सोर्सिंग ऑफ इन्फॉर्मेशन” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजकता विकास विभागाच्या समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी मार्गदर्शक श्री.अनिकेत भोसले,डायरेक्टर,डिझाईन फॉर एक्सलन्स यांची ओळख करून दिली.ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागातर्फे तृतीय वर्ष व अंतिम वर्षाच्या इलेक्ट्रोनिक्स व टेलिकाम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली.याप्रसंगी बोलताना उद्योजकता विकास विभागप्रमुखप्रा.अजित तातुगडे यांनी विद्यार्थ्यांचा उद्योजकतेकडे कल असावा व त्यांच्यात रुची निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना मार्गदर्शक श्री.अनिकेत भोसले यांनी एखादा स्मॉलबिझनेससुरु करतानाप्लॅनिंग कसे करावे याबद्दल विस्तृत माहिती दिली.तसेच ते म्हणाले की मी याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असल्याने एखादा उद्योगधंदा सुरु करताना शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत मला पूर्ण कल्पना आहे. हे लक्षात घेऊनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सोर्सिंग ऑफ इन्फॉर्मेशन कसे करावे याबद्दल सविस्तर विवेचन केले.


या कार्यशाळेचे आयोजन उद्योजकता विकास विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे व उद्योजकता विकास विभागाच्या समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी केले.समारोप प्रसंगीप्रा. स्वाती बिर्जे यांनी मार्गदर्शक श्री.अनिकेत भोसलेतसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवतव संस्थाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी माने यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “पीसीबी डिझाईनींग युझिंग डीप ट्रेस अँड अल्टीयम सॉफ्टवेअर ”या विषयावर व्याख्यान संपन्न‼फोटो:- डावीकडून अनुक्रमे समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे, मार्गदर्शक श्री. प्रकाश भानुशाली (टेक्निकल हेड, डिझाईन फॉर एक्सलंस, मुंबई),विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे, प्रा.संदीप भंडारे व अंतिम वर्षाचे विद्यार्थी

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागातर्फेपीसीबी डिझाईनींग युझिंग डीप ट्रेस अँड अल्टीयम सॉफ्टवेअर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.व्याख्यानाच्या उद्घाटनप्रसंगीविभागप्रमुखप्रा.अजित तातुगडेयांनी सांगितले की नवीनसॉफ्टवेअरची विद्यार्थ्यांना ओळख निर्माण व्हावी व इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट गॅप भरून काढावी यासाठी विविध व्याख्यानांचे व कार्यशाळांचे आयोजन करण्यासाठी आपला विभागनेहमीचकार्यरत असतो.

याप्रसंगी बोलतानाइलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागाच्या समन्वयक प्रा. स्वाती बिर्जेयांनीसर्वप्रथम मार्गदर्शक श्री.प्रकाश भानुशाली यांची ओळख करून दिली.श्री.प्रकाश भानुशाली हे याच महाविद्यालयाच्याइलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागाचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांच्याकडून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणे ही अभिमानाची गोष्ट आहे असेही त्या म्हणाल्या.लायसन्स सॉफ्टवेअर बरोबरच ओपन सोर्स सॉफ्टवेअरबद्दलही मुलांना ज्ञान अवगत व्हावे हा व्याख्यान आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू होता असेत्यांनी सांगितले.

हे व्याख्यान तृतीय वर्ष व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.मार्गदर्शक श्री.प्रकाश भानुशाली यांनी डीप ट्रेस अल्टीयम सॉफ्टवेअर वापरून सिंगल लेअर तसेच मल्टिलेअर पीसीबी डिझाईनींग करण्याच्या प्रोसिजरविषयी मार्गदर्शन केले.

   या व्याख्यानाचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागप्रमुखप्रा.अजित तातुगडे, समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी केले.समारोप प्रसंगी प्रा. अनिकेत जोशी यांनी मार्गदर्शक श्री.प्रकाश भानुशाली, संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागातर्फे द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत!फोटो:व्यासपीठावर डावीकडून अनुक्रमे इलाइट विद्यार्थी प्रतिनिधी कु.श्रेया जंगम, विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे,इलाइट स्टाफ इनचार्ज प्रा. स्वाती बिर्जे व मार्गदर्शनपर भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत
देवरुख: प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागातर्फे द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडला.या स्वागतसोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे,इलाइट स्टाफ इनचार्ज प्रा. स्वाती बिर्जे व इलाइट विद्यार्थी प्रतिनिधी कु.श्रेया जंगम उपस्थित होते.

सर्वप्रथमइलाइट स्टाफ इनचार्ज प्रा. स्वाती बिर्जे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.त्याचबरोबर इलाइटस्टुडंट असोसिएशनच्या कार्यकालाबद्द्ल व यशस्वीतेबद्दल विवेचन करत विद्यार्थ्यांचा असलेला वाटा त्यांनी अधोरेखित केला.यानंतरअभियंता दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.तसेच द्वितीय वर्षात प्रवेश केलेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

विभागप्रमुखप्रा.अजित तातुगडे यांनी आपल्या मल्टीमिडिया प्रेझेंटेशनद्वारे विभागाचे व्हिजन व मिशन तसेच मागील वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेत नुकत्याच येणाऱ्या नॅक कमिटीसंदर्भात  उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉममध्ये भविष्यातील उपलब्ध असणा-या गव्हर्न्मेंट व प्रायव्हेट सेक्टरमधील संधीविषयीहीत्यांनी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी सर्वप्रथम द्वितीय वर्षामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणातबोलताना त्यांनीविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालय करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.याचबरोबर विद्यार्थ्यांकडूनही त्यांनी कठोर परिश्रमांची अपेक्षा व्यक्त केली.कोणताही विषय हाताळताना विद्यार्थ्यांनी त्या विषयाच्या मुलभूत संकल्पना व सखोल ज्ञान अवगत करावे असे आवाहन त्यांनी केले.महाविद्यालयात असणा-या शैक्षणिक सुविधांचा आपण पुरेपूर वापर करावा व आपल्या शंकांचे वेळोवेळी निरसन करून घ्यावे असे विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले.

याप्रसंगी विद्यार्थी प्रातिनिधी श्रुतिका गझने व साद नगरजी यांनी सूत्रसंचालन केले.द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले गेले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.आभार प्रदर्शन इलाइट स्टाफ इनचार्ज प्रा. स्वाती बिजें यांनी केले.