Tuesday, April 6, 2021

* राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एम एम एस च्या विद्यार्थ्यांची अॅपेक्स कंपनीमध्ये यशस्वी निवड *

 

 देवरुख आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्ह मध्ये एम एम एस या पदव्युत्तर विभागातील पाच विद्यार्थ्यांची अॅपेक्स अॅक्टसॉफ्ट या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. यामध्ये या विभागातील संदेश परशराम, ऋतुजा पेवेकर, तस्मिया मुजावर, अनघा टिकेकर व प्रतीक्षा सामंत हे विद्यार्थी निवडीत पात्र ठरले आहेत.

यासोबत कम्प्युटर शाखेतील  पूजा रुके व सोनाली शिंदे तर मेकॅनिकल विभागातील संकेत जाधव व रोहन करंडे या विद्यार्थ्यांनीही या कंपनीची निवड चाचणी यशस्वीपणे पार केली आहे. निवड प्रक्रियेत ग्रुप डीसकशन, बुद्धिमत्ता परीक्षा, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यू यासारख्या चाचण्या घेतल्या गेल्या. या सर्व फेर्‍यांमधून महाविद्यालयाच्या एकूण नऊ विद्यार्थ्यांची कंपनीने निवड केली आहे .

याचबरोबर २२ मार्च रोजी पार पडलेल्या वदिनी इन्फोसेंटर या बहुराष्ट्रीय आय.टी. कंपनीच्या रिक्रुटमेंट ड्राईव्ह मध्ये महाविद्यालयाच्या कम्प्युटर शाखेतील अनिकेत झेपले, प्रतीक्षा पांचाळ, राज सुर्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधील तेजल राव या आणखी चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या कंपनीचे ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स पुणे येथे असून मुख्यालय अमेरिकेमध्ये आहे, या कंपनीच्या विविध शाखा यु.एस.ए आणि यु.के. मध्ये कार्यरत असून ही कंपनी ग्राहकांना प्रभावी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मदत करते.

 

 प्र. शि. प्र. संस्थेचे राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय मागील बावीस वर्षापासून मुलभूत शिक्षणाबरोबरच व्यावसायाभिमुख प्रशिक्षण देते आहे. महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यासारखे पदवी अभ्यासक्रम असून एमबीए हा पदव्युत्तर विभाग आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना नियमितपणे अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट ग्रुप, डिस्कशन आणि इंटरव्ह्यूचे प्रशिक्षण नियमितपणे दिले जाते.  तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य प्रशिक्षणावर भर देऊन त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी सक्षम बनविण्याचे प्रयत्न केले जाते. त्यामुळे महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि महाविद्यालयामध्ये शिकत असणारे विद्यार्थीही  प्लेसमेंटमध्येही  घवघवीत यश संपादन करीत आहेत. 

चालू शैक्षणिक वर्षांत कोव्हीड- 19 ही महामारी आणि लॉकडाऊन या परिस्थितीमध्येही  टी सी एस , अॅसेंच्युअर, विप्रो, अॅपेक्स अॅक्टसॉफ्ट, वादिनी इन्फोसेन्टर यासारख्या ख्यातनाम कंपन्यांमध्ये जवळपास ४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. अॅपेक्स अॅक्टसॉफ्ट कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची निवड होण्यामागे प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. मोहन गोसावी, समन्वयक प्रा. स्नेहल मांगले, प्रा. आशिष सुवारे यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले.

संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉ. महेश भागवत  यांनी निवड झालेले विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक  यांचे विशेष अभिनंदन केले.