Tuesday, March 14, 2023

आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाने १७ ऑगस्ट रोजी  आपल्या स्थापनेची २४ वर्षे पूर्ण केलीतसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री श्रीरवींद्र माने यांचा या दिवशी ६४  वा वाढदिवसत्यामुळे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद,विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी हा उत्साहाचा दिवस असतो.

महाविद्यालयाने या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन  व नवनवीन उपक्रमांची सुरुवात केलीआंबव ग्रामदैवता कालीश्री देवीचे दर्शन झाल्यावर मामाने यांचे महाविद्यालयामध्ये आगमन झालेत्यानंतर सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या सौभाग्यवती नेहा माने व अन्य सवाष्णीनी भारतीय परंपरेनुसार त्यांचे मंत्रोच्चाराच्या गजरात औक्षण करून अभिष्टचिंतन केलेयाप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रशिप्रसंथेच्या कार्यकारी अध्यक्षा सौनेहा मानेसचिव चंद्रकांत यादव,  सहसचिव दिलीप जाधवखजिनदार सौ. जयश्री दळवी आदी संस्था पदाधिकारी तसेच माजी नायब तहसीलदार विजय दळवी,  प्राचार्य डॉमहेश भागवत, प्रा. नितीन भोपळे, तालुक्यातील राजकीय नेतेमंडळी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते 

सुरीवातीला राजेंद्र माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवत यांनी सर्वांचे स्वागत केलेमहाविद्यालयाच्या मागील चोवीस वर्षाच्या दैदिप्यमान कामगिरीचा त्यांनी आढावा घेत यशस्वी वाटचालीची उपस्थिताना माहिती दिलीतसेच महाविद्यालयाच्या वतीने मामाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर महाविद्यालयाचे प्राध्यापककर्मचारीव विद्यार्थ्यांनी मामाने यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

या दिवसाचे निमित्त साधून महाविद्यालयामध्ये नव्याने विकसित केलेल्या “स्मार्ट क्लासरूम” व महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाने आयोजित केलेल्या “रक्तदान शिबीराचे”  मा. माने यांनी उद्घाटन केले. डेरवण येथील वालावलकर रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने घेतलेल्या या शिबिरात बहुसंख्य विद्यार्थी व कर्मचा-यानी रक्तदान केलेडॉ. विजय शिंदे, रवी अग्रवाल यांचे यासाठी सहकार्य लाभले. यानिमित्ताने महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून यावेळी गौरविण्यात आले. वार्षिक प्रथेप्रमाणे सत्यनारायण पूजाहि बांधण्यात  आली.

यानंतर मारविंद्रजी माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या उभारणीपासून मागील चोवीस वर्षातील आपले अनुभवकथन केलेया महाविद्यालयातून बाहेर पडलेले सुमारे पाच हजाराहून अधिक विद्यार्थी इंजिनीअर विविध क्षेत्रामध्ये उत्तम योगदान देत आहेत. महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्याला कोकण तसेच पूर्ण देशाची सेवा करण्याची अशारितीने संधी मिळाली हे आपले भाग्य आहे असे ते म्हणाले. तसेच त्यांनी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापककर्मचारीव विद्यार्थी यांच्याकडून मिळालेल्या प्रेम व विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.

यानंतर महाविद्यालयामध्ये  विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्नेह्भोजनाने समारंभाची सांगता झाली.

फोटो:

1.       मा. रविंद्रजी माने  यांचे औक्षण करताना सौ. नेहा माने व महाविद्यालयाच्या प्राध्यापिका

2.       मा. रविंद्रजी माने आपल्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभात बोलताना

3.       मा. रविंद्रजी माने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवत आणि सर्व विभागप्रमुख

4.       मा. रविंद्रजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये आयोजित रक्तदान शिबीर प्रसंगी डेरवण येथील वालावलकर रुग्णालय रक्तपेढीचे रवी अग्रवाल, डॉ. विजय शिंदे यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवत






No comments:

Post a Comment