Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘टेक कार्निवल २के२३’ मध्ये जनरल चॅम्पियनशीप

 राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाला टेक कार्निवल २के२३’ मध्ये जनरल चॅम्पियनशीप

आंबव येथील प्रशिप्रसंस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या टेक कार्निवल २K२३ या राष्ट्रीय स्तरावरील फेस्टिवलमध्ये जनरल चॅम्पियनशीप प्राप्त करीत सुयश संपादन केले.

या स्पर्धेत कोडींग आय टी, वेबसाईट डेव्हेलपमेंट, पीपीटी प्रेसेंटेशन, व्हिडीओ मेकिंग तसेच क्विझ यासारख्या  विविध स्पर्धा प्रकारांचा समावेश होता. यामध्ये महाविद्यालयाच्या कॉम्पुटर इंजिनीरिंग व एम एम एस विभागातील ३३  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत चमकदार कामगिरी केली आहे.  

या स्पर्धांमध्ये मनोज गोठणकर याने वेबसाईट डेव्हेलपमेंटमध्ये प्रथम, यश सावर्डेकर व आदित्य पत्याने यांनी क्विझ मध्ये प्रथम तर सर्वेश बाईंग, सुधीर चारकरी यांनी क्विझ मध्ये द्वितीय व चैतन्य राजवाडे व मैत्रेय जुवेकर यांनी क्विझ मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. मानव जाधव व आदित्य पत्याने यांनी कोडींग आय टी मध्ये तर शकीर धामसकर याने पीपीटी प्रेसेंटेशनमध्ये उत्तेजनार्थ यश संपादन केले.

हा कार्यक्रम देवरुख येथील आठल्ये सप्रे महाविदयालय येथे पार पडला.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाची दोन, द्वितीय क्रमांकाची दोन, तिसऱ्या क्रमांकाचे एक व उत्तेजनार्थ तीन अशी एकूण आठ पारितोषिके प्राप्त केली. देवरुख शिक्षण प्रसारक संस्थाध्यक्ष श्री. सदानंद भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा एकूण सहभाग व मिळविलेल्या एकूण पारितोषिकांच्या आधारे माने अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्पर्धेची जनरल चॅम्पियनशीप बहाल करण्यात आली.

महाविद्यालयामधील सहभागी विद्यार्थ्याना एम एम एस विभागप्रमुख प्रा. मोहन गोसावी व प्राश्रमिका आर्ते यांचे मार्गदर्शन लाभलेविद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मारवींद्र मानेकार्यकारी अध्यक्षा सौनेहा मानेप्राचार्य डॉमहेश भागवत, तसेच सर्व विभागप्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले.




No comments:

Post a Comment