Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांकडून नवीन स्टार्टअपचे सादरीकरण

 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलायावेळी ऑटोमोबाईल विभागातील विद्यार्थ्यांच्या ग्रुपने नव्याने विकसित केलेल्या स्टार्टअपचे सादरीकरणनुकत्याच बेंगळूरु येथे पार पडलेल्या गो कार्ट डीझाइन चॅलेंज स्पर्धेत या महाविद्यालयाच्या दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अन्य टेक्नीकल स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.

या दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या विविध शाखेच्या विद्यार्थी संघटनाच्या सक्रीय सहभागातून पाहिल्या सत्रामध्ये महाविद्यालायांतर्गत टेक्नीकल स्पर्धा आयोजित करण्यात आल्यायामध्ये ऑटोमोबाईल विभागाने ऑटोस्नॅप २के२२मेकॅनिकल विभागाने टेक्नीकल स्केचिंगइलेक्ट्रोनिक्स टेलीकम्यूनीकेशन विभागाने कॅल्सी वार तर कॉम्पुटर विभागाने प्रोग्रामिंग अँड क्विझ यासारख्या स्पर्धा घेतल्या.

मुख्य कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष  माजी राज्यमंत्री श्रीरवींद्र माने प्रमुख उपस्थिती लाभली.  यामध्ये प्रथम संयोजक ऑटोमोबाईल विभागातर्फे मान्यवर  विभागप्रमुखांचे स्वागत करण्यात आलेयानंतर विद्यार्थी प्रतिनिधींनी इंजिनीअर्स डे च्या आयोजनामागील महत्व आपल्या भाषणातून सांगितलेविनायक पेटकरश्रवण करकरे या  ऑटोमोबाईल विभागातील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात “डिजिटल वेहिकल सर्विस” या  नावाखाली नव्याने विकसित केलेल्या स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आलेदूरच्या प्रवासादरम्यान चालक  प्रवासी यांना -याचदा गॅरेजजवळचे सर्विस सेंटर  इतर सुविधांची  माहिती मिळवण्यात खूप अडचणी येतातत्या सोडविण्याच्या दृष्टीने गॅरेज मालक  ऑटोमोबाईल संदर्भातील इतर आवश्यक सुविधा पुरविणारे सर्व पुरवठादार आणि यांचा समन्वय साधून त्याची एक वेबसाईट तयार करण्याची विद्यार्थ्यांची योजना आहे.  यातून वाहन मालक  चालकांसाठी  एका अॅपच्या माध्यमातून जोडण्याचा विद्यार्थी प्रयत्न करणार आहेतयानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये बेंगळूरु येथे पार पडलेल्या गो कार्ट डीझाइन चॅलेंज स्पर्धेत ऑटोक्रॉस विनर ऑल ओवर इंडीयाऑल ओवर इंडीया रनर अपऑल ओवर मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम येऊन दैदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या महाविदयालयाच्या टीम फुल थ्रोटल या २५ जणांच्या टीमचा सत्कार करण्यात आलात्यांनीही उपस्थितांसमोर आपला २०१४ पासूनचा प्रवास प्रदर्शित केला. 

यानंतर सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आलायामध्ये विजेत्यांना रोख बक्षिसे  प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलीयाप्रसंगी प्राचार्य डॉमहेश भागवत यांनी भारतरत्न सर एमविस्वेस्वरय्या यांना आदरांजली वाहून विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्व विषद केलेत्यांनी विद्यार्थ्यांना विविध टेक्निकल स्पर्धांमधून भाग घेऊन स्वतःला उत्तम इंजिनिअर घडवावे असे सांगितलेयानंतर श्रीरवींद्र माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी सर विस्वेस्वरय्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन करताना  स्टार्टअप सारखे स्वतःची विशेष ओळख घडविणाऱ्या कार्यक्रमांवर विशेष लक्ष द्यावे असे सांगितले व सर्वाना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Photos:

१.     इंजिनीअर्स डे च्या निमित्ताने बेंगळूरु येथे पार पडलेल्या गो कार्ट डीझाइन चॅलेंज स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या महाविदयालयाच्या टीम फुल थ्रोटल या २५ जणांच्या टीमचा सत्कार सत्कार करताना श्रीरवींद्र माने, प्राचार्य डॉमहेश भागवत, विभागप्रमुख व प्राध्यापक

२.     इंजिनीअर्स डे च्या निमित्ताने भारतरत्न सर एमविस्वेस्वरय्या यांना अभिवादन करताना प्राचार्य डॉमहेश भागवत

३.     इंजिनीअर्स डे च्या कार्यक्रमात बेंगळूरु येथे पार पडलेल्या गो कार्ट डीझाइन चॅलेंज स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या महाविदयालयाच्या टीम फुल थ्रोटलने आपला २०१४ पासूनचा प्रवास सदर केला.  त्याप्रसंगी श्रीरवींद्र माने,  करताना प्राचार्य डॉमहेश भागवत, प्राध्यापक व विद्यार्थी

४.     इंजिनीअर्स डे च्या निमित्ताने भारतरत्न सर एमविस्वेस्वरय्या यांना अभिवादन करताना श्रीरवींद्र माने

५.     इंजिनीअर्स डे च्या निमित्ताने भारतरत्न सर एमविस्वेस्वरय्या यांना अभिवादन करताना श्रीरवींद्र माने







No comments:

Post a Comment