Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भव्य नोकरी मेळावा आयोजन

 राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  भव्य नोकरी मेळावा आयोजन

 

देवरुख:

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये ४ मार्च रोजी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी महाविद्यालयाच्या प्रशस्त सभागृहामध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या मेळाव्यामध्ये पुणे, मुंबई तसेच रत्नागिरी मधील विविध क्षेत्रातील १५ पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने नुकतेच आपल्या स्थापनेच्या 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आणि या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने महाविद्यालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागातर्फे आजपर्यंत अंतिम वर्ष उत्तीर्ण अनेक विद्यार्थी विद्यार्थीनीना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने फक्त इंजिनीरिंगच नव्हे तर इतर शिक्षण घेतलेल्या व महाविद्यालायाव्यातिरिक्त या जिल्ह्यातील तरुण तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

 इंजिनीरिंग पदवीधारक, एम बी ए , सर्व डीप्लोमाधारक, बी फार्मसी, आय टी आय, एम सी व्ही सी, सर्व शाखातील पदवीधर तसेच अंतिम वर्षात शिकत असलेले सर्व विद्यार्थी व १० वि , १२ वि उत्तीर्ण तरुण तरुणी यासाठी पात्र असणार आहेत.  तर रत्नागिरी जिल्हा व नजीकच्या परिसरातील रोजगाराच्या संधी शोधू इच्छीणा-या सर्व युवक युवतींनी याचा लाभ घेता येईल. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून त्याची अंतिम तारीख ३ मार्च आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ८३२९२०३६२० किवा ८९९९४०४५९ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

फोटो:    











No comments:

Post a Comment