Friday, March 3, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागातर्फे “व्यवसायातील संधी, आव्हाने व शासकीय संस्थांची भूमिका ” या विषयावर कार्यशाळा संपन्न ‼!



फोटो:- डावीकडून उद्योजकता विकास विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे, श्री.किरण धायगुडे, मार्गदर्शक श्री. राजेश पवार, समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे व विद्यार्थी

  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅंड टेक्नॉलॉजी मध्ये उद्योजकता विकास विभागातर्फे व्यवसायातील संधी, आव्हाने व शासकीय संस्थांची भूमिका या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या  उद्घाटनप्रसंगी इलेक्ट्रोनिक्स व टेलिकाम्युनिकेशन विभागाच्या समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी मार्गदर्शक श्री. राजेश पवार यांची ओळख करून दिली. या कार्यशाळेला श्री. राजेश पवार, डायरेक्टर, मायक्रो इनोटेक इंडिया प्रा.लि.,पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचा सुमारे ६० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी विद्यार्थ्यांचा उद्योजकतेकडे कल असावा व त्यांच्यात रुची निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

  विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपल्या अनुभवातून त्यांनी सांगितले की स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये प्रथमत: अनुभव घेऊन त्यानंतरच व्यवसायाला सुरुवात करावी, ज्यामुळे त्यातील अडचणी काम करतानाच समजू शकतात. व्यवसायातील संधी कशा ओळखाव्यात याचे सुयोग्य मार्गदर्शन करताना ते म्हणाले की इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना केवळ त्यातील एकाच विभागामध्ये काम न करता इतरही संलग्न विभागांचा सर्वांगीण अभ्यास करावा ज्यामुळे स्वत:चा व्यवसाय सुरु करताना तुम्हाला निशितच फायदा होईल.
  आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करताना जर आपल्याला अगोदर काम केलेल्या इंडस्ट्रीच्या प्रॉडक्ट मार्केटिंगचा अनुभव असेल तर त्याचा उपयोग नक्कीच तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी होतो असे त्यांनी त्यांच्या स्वानुभवातून सांगितले. औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी असलेल्या शासकीय संस्थांच्या भूमिकेबद्दलही त्यांनी विवेचन केले. कॉलेज मध्ये असतानाच उद्योजकतेची मुळे कशी रुजवावित याविषयी सांगताना त्यांनी “इनक्युबेशन सेंटर” निर्माण करण्याची आणि त्यासाठी लागणारा निधी कॉलेजच्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांकडून देणगी स्वरूपात जमा करण्याची  सूचना केली.

  या कार्यशाळेचे आयोजन उद्योजकता विकास विभागाच्या समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे व विभागप्रमुख  प्रा.अजित तातुगडे यांनी केले. समारोप प्रसंगी उद्योजकता विकास विभागप्रमुख  प्रा.अजित तातुगडे यांनी मार्गदर्शक श्री. राजेश पवार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . महेश भागवत व संस्थाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी माने यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment