Saturday, March 4, 2017

"ग्राहक जागरूकता आणि आर्थिक साक्षरता ” या विषयावर माने अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न ‼



  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅंड टेक्नॉलॉजी मध्ये ग्राहक जागरूकता आणि आर्थिक साक्षरता या विषयावर उद्योजकता विकास विभागातर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी श्री. विक्रांत जिंदाल आणि श्री. प्रफुल्ल पवार या मार्गदर्शकांची ओळख करून दिली. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी व सर्व अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. दिवसभराच्या तीन सत्रात या व्याख्यानाचा सुमारे २०० विद्यार्थी व ३५ प्राध्यापक यांनी लाभ घेतला.

  श्री. विक्रांत जिंदाल यांनी ग्राहक जागरूकता या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना आपल्या दैनंदिन खरेदीमध्ये ग्राहकांची होणारी फसवणूक, त्यावर ग्राहकांनी भारताची ‘ग्राहक मार्गदर्शन व तक्रार निवारण केंद्र’ यांच्याकडे तक्रार कशी करावी याचे विवेचन केले. श्री. प्रफुल्ल पवार यांनी भारताची डिजीटल इंडिया कडे होणारी वाटचाल व त्यासाठीची आवश्यक कॅशलेस अर्थव्यवस्था, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असणारी स्मार्ट गुंतवणुकीची गरज, आर्थिक साक्षरता हे विषय आकर्षक व्हिडिओजद्वारे, विविध उदाहरणांसहीत उत्तमप्रकारे मांडले.
 
  या कार्यशाळेचे आयोजन उद्योजकता विकास विभागाचे विभागप्रमुख  प्रा.अजित तातुगडे व  समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी केले. समारोप प्रसंगी उद्योजकता विकास विभागप्रमुख  प्रा.अजित तातुगडे यांनी मार्गदर्शक श्री.विक्रांत जिंदाल आणि श्री.प्रफुल्ल पवार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत व संस्थाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी माने यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.







No comments:

Post a Comment