Friday, March 3, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पाईपिंग व एच.व्ही.ए.सी. क्षेत्रातील संधीविषयी मार्गदर्शन!!!




आंबव(देवरुख)येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातर्फे बी.ई.(मेकॅनिकाल)व बी.ई.(ऑटोमोबाईल) विद्द्यार्थ्यांसाठी पाईपिंग इंजिनिअरिंग व एच.व्ही.ए.सी. या   क्षेत्रातील  नोकरीविषयक संधी व त्यासाठी लागणारी  किमान कौशल्य पात्रता याविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
  यावेळी मुंबईच्या प्रथितयश ‘सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे’ व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक श्री.वसंत मेस्त्री तसेच पाईपिंग इंजिनिअरिंगचे समन्वयक श्री.नितीन म्हस्के हे मान्यवर वक्ते उपस्थित होते. श्री.वसंत मेस्त्री हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून त्यांच्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे  पाईपिंग तेल शुद्धीकरण व उर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये त्यांचे बहुमोल मार्गदर्शन भारतातील तसेच भारताबाहेरील संस्थांना नेहमीच मिळत आले आहे.
   विद्द्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. मेस्त्री यांनी उद्योग जगताकडून अपेक्षित कौशल्य कशी आत्मसात करावी याचे विवेचन केले.जगभरातील उद्योगधंद्यांच्या बदलत्या धोरणांविषयी बोलताना त्यांनी २०३५ चा औद्योगिक विकास आराखडा विद्द्यार्थ्यांना अवगत करून दिला. पाईपिंग इंजिनिअरिंग या क्षेत्राची तेल व वायू शुद्धीकरण, वीजनीर्मिती,औषधनिर्माण,रासायनिक इ. विविध औद्योगिक क्षेत्रामध्ये असणारी उपयुक्तता यावेळी विद्द्यार्थ्यांना अवगत करून देण्यात आली.
   याखेरीज हिटींग,व्हेंटीलेशन व एअरकंडीशानिंग(एच.व्ही.ए.सी.) या क्षेत्राची झपाट्याने होणारी वाढ व त्यामुळे निर्माण होणा-या प्रचंड रोजगाराच्या संधी याविषयी श्री.वसंत मेस्त्री यांनी विद्द्यार्थ्यांना माहिती पुरवली.या मार्गदर्शन सत्रासाठी मेसा समन्वयक प्रा.राहुल दंडगे व मेसा अध्यक्ष शुभम कराडे व सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
   विभागप्रमुख प्रा.संजय भंडारी व प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी श्री.वसंत मेस्त्री यांचे विशेष आभार मानले व भाविष्यकाळातही सुविद्या इन्स्टिट्यूट व राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या परस्पर सहकार्याने विद्द्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. 


No comments:

Post a Comment