Friday, March 3, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणविषयक मार्गदर्शन!!!!


आंबव(देवरुख) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातर्फे द्वितीय वर्ष यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर तंत्राशिक्षाणाविषयी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
  या मार्गदर्शन सत्रामध्ये श्री. इंद्रनील नाईक यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. श्री. इंद्रनील नाईक हे राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागाचे माजी विद्यार्थी असून पदवी नंतर एन. आय.टी. त्रिची येथून पदव्युत्तर अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे. श्री. इंद्रनील यांनी टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरिंग,बंगळूरू व एल.जी इलेक्ट्रोनिक्स ,पुणे येथे डिझाईन इंजिनिअर यापदावर काम केले असून नुकतीच आय.आय.टी. मुंबई येथे प्रकल्प संशोधन अभियंता म्हणून त्यांची निवड झाली आहे.
    या मार्गदर्शन सत्रासाठी द्वितीय वर्ष (यंत्र) चे ७० विद्यार्थी उपस्थित होते. या सत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असणा-या गेट परीक्षेविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करताना अभ्यासक्रमातील  विषयांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले.
   या प्रवेश प्रक्रियेचा अभ्यास कसा करावा तसेच त्यानंतर कोणकोणत्या नामांकित संस्थांमध्ये कोणत्या पदव्युत्तर विद्याशाखा उपलब्ध होतात या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.पदवीनंतर रोजगारक्षम  अभियंता बनण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे तसेच उद्योग जगताच्या अभियंत्याकडून असणा-या किमान अपेक्षा याविषयी विद्यार्थ्यांना बहुमुल्य मार्गदर्शन करण्यात आले.
   या मार्गदर्शन सत्रासाठी मेसा समन्वयक प्रा. राहुल दंडगे व प्रा आशिष सुवारे यांनी परिश्रम घेतले. विभागप्रमुख प्रा. संजय भंडारी व प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी या मार्गदर्शन सत्रासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.





No comments:

Post a Comment