Thursday, January 31, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी कार्यशाळा संपन्न

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अणूविद्युत व दूरसंचार शाखेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. चार दिवसांच्या या कार्यशाळेमध्ये या शाखेतील विद्यार्थ्यांना पी एल सी - स्काडा या विषयी तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
आजच्या काळात अणूविद्युत व दूरसंचार शाखेमध्ये ऑटोमेशन, स्काडा अप्लिकेशन तसेच पी एल सी प्रोग्रामिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामुळे या शाखेतून पदवी घेणा-या अंतिम वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनीना त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण कालावधीमध्येच याची माहिती व ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे येथील प्रोलीफिक सिस्टीम्स अॅंड टेक्नोलॉजी प्रा. लि. या नामांकित कंपनीशी महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे. सदर कार्यशाळेमध्ये या कंपनीचे ऑटोमेशन इंजिनीअर श्री. अद्वितिय साहा तसेच इनस्टॉलेशन इंजिनिअर श्री. किशोर बेलहेकर यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ऑटोमेशन, स्काडा अप्लिकेशन तसेच पी एल सी प्रोग्रामिंग यासारख्या विषयांवर प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती दिली. सहभागी झालेल्या अंतिम विद्यार्थी विद्यार्थिनीनि समारोपप्रसंगी कार्याशाळेदरम्यान
मिळालेले ज्ञान व अनुभव उपयुक्त होते असे सांगितले.या कार्यशाळेचे नियोजन विभागप्रमुख प्रा. अजित तातुगडे यांनी केले. तर प्रा. पूनम क्षीरसागर यांनी समन्वयक म्हणून काम पहिले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच व्यवस्थापनाचे यासाठी मार्गदर्शन व पाठबळ लाभले.
फोटो: कार्याशाळेमधील सह्भागी विद्यार्थी विद्यार्थ्याना सूचना देताना तज्ञ मार्गदर्शक.

No comments:

Post a Comment