Thursday, January 31, 2019

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील “सिंटीला २k१९” परिषदेचे भव्य आयोजन!!

देवरुख वार्ताहर:
आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तंत्रनिकेतनच्या
विद्यार्थ्यांसाठी “सिंटीला २k१९” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. इंजिनीअरिंग
क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून वाढत्या अपेक्षा लक्षात घेता त्यांच्या सुप्त कल्पना विकसित व्हाव्यात, व त्या प्रदर्शित
करण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय मागील काही वर्षे “सिंटीला” चे
राष्ट्रीय स्तरावर आयोजन करते. यामध्ये विविध जिल्ह्यातील तंत्रनिकेतनचे विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी
होत असतात.
२४ ते २५ जानेवारी दरम्यान महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात विविध स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये प्रोजेक्ट
प्रेझेंटेशन,कॅलसी वॉर, गेमिंग,प्रोग्रामिंग,फुट्साल, क्विझ,रोबो फाईट, ग्रीन टेक्नोमॉडेल,स्पॉट फोटोग्राफी, निओन फूटबॉल
यासारख्या विविध स्पर्धांचा समावेश होता. परिषदेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी माने यांच्या शुभहस्ते
तसेच कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, प्रमुख पाहुणे व जे एस डब्लू एनर्जी
रत्नागिरीचे सी एस आर प्रमुख अनिल दधीच, संयोजक प्रा. मुश्ताक गडकरी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक
व सहभागी स्पर्धक विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या उपस्थितीत पार पडले.
सर्वप्रथम दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर
संयोजक प्रा. मुश्ताक गडकरी यांनी प्रास्ताविक करताना परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य डॉ.महेश
भागवत यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाने स्थापनेची २० वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे सांगून या
कालखंडातील महाविद्यालयाच्या ठळक कामगिरीचा आलेख मांडला तसेच विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांना
शुभेच्छा दिल्या.
यानंतर प्रा. प्रल्हाद गमरे यांनी प्रमुख पाहुणे अनिल दधीच यांची ओळख करून दिली. त्यानंतर श्री. दधीच
यांनी सभेला मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, कारखानदारी व शैक्षणिक संस्था यातील दरी कमी
होण्यासाठी विद्यार्थ्यांमधून जास्तीतजास्त उद्योजक तयार व्हायला हवेत. तसेच या परिषदेअन्तर्गत
आयोजित केलेल्या स्पर्धा त्यासाठी विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरतील. मा.श्री.रवींद्रजी माने आपल्या
अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत, स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडावे व
त्यामध्ये भरारी घ्यावी. हा उपक्रम त्यासाठी दिशा दर्शक असून सहभागी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील
वाटचालीतून याचे फलित दिसावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यानंतर दोन दिवस विविध स्पर्धांच्या फे–या पार पडल्या. पुणे, कोल्हापूर, मालवण, रत्नागिरी, सावर्डे, आंबव,
येथील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग लाभला. समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या
स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी
माने, कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने, प्राचार्य डॉ.महेश भागवत, डीझाइन अँड एक्सलन्स कंपनीचे संस्थापक
श्री. प्रकाश भानुशाली यांची उपस्थिती लाभली.
“जनरल चॅंम्पियनशिप” ट्रॉफी स्पर्धेचे विशेष आकर्षण होते. यावर्षी जनरल चॅंम्पियनशिपची ट्रॉफी रत्नागिरीच्या
शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी पटकावली. सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात कॉलेजचा निसर्गरम्य
परिसर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे सहकार्य यामुळे प्रभावित झाल्याचे सांगितले.

आभारप्रदर्शन प्रा. गीतांजली सावंत यांनी केले. परिषदेचे व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कॉम्पुटर
विभागाने केले. समन्वयक म्हणून प्रा. गीतांजली सावंत व प्रा. प्रल्हाद गमरे यांनी काम पाहिले. सूत्र

संचालन रजत गजने व नेहा मोहिते यांनी केले. परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व विभागांचे
प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी प्रमुख प्रथमेश वेंगुर्लेकर, व विद्यार्थ्यांनी प्रतिनिधींनीचे सहकार्य लाभले
.
विजेत्या संघाला “सिंटीला २k१९ जनरल चॅंम्पियनशिप ट्रॉफी” वितरीत करताना संस्थाध्यक्ष मा. रवींद्र माने, सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत.

No comments:

Post a Comment