Wednesday, February 27, 2019

“सत्यं वद धर्मं चर” - डॉ. सुभाष देव यांचा पदवीधरांना संदेश राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित आंबव येथिल राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झाला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या  १७ व्या पदवीधर तुकडीला यावेळी शिक्षणतज्ञ डॉ. सुभाष देव यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्ष सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, सौ. देव आदी मान्यवरांच्या व्यासपीठावरील उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व बहुसंख्य स्नातक याप्रसंगी  उपस्थित होते
दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने समारंभाला सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाची ही १७ वि स्नातक तुकडी बाहेर पडत असून महाविद्यालयामध्ये साजरा होत असलेला हा पाचवा पदवीदान समारंभ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी अंतिम वर्षाच्या निकालांचे विश्लेषण सादर केले. यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी पदवीधारक विद्यार्थ्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात ज्ञान, कौशल्य, आणि सदवृत्ती याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली.
मुख्य अतिथी व शिक्षणतज्ञ डॉ. सुभाष देव यांनी यानंतर स्नातकांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनि मिळालेल्या पदवीचे महत्व ओळखावे. आजचे उपलब्ध जॉब पारंपारिक स्वरूपाचे राहिले नसून त्यामध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. तसेच त्यामध्ये असणारी जागतिक स्पर्धा व सतत बदलणारे तंत्रज्ञान लक्षात घेता  पदवीधरानी नैपुण्य वाढविणे, अष्टपैलू बनणे, व्यवस्थापकीय ज्ञान वाढविणे, नवीननवीन ज्ञान आत्मसात करणे यासारख्या गोष्टी क्रमप्राप्त झाल्या आहेत. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना पथदर्शी ठरेल अशा सत्यं वद धर्मं चरया संस्कृत सुभाषिताचा उल्लेख करून त्याप्रमाणे प्रमाणे सर्वांचे आचरण असावे असा संदेश दिला.
संस्थेचे अध्यक्ष मा. रवींद्र माने यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आयुष्यातील एक मुख्य टप्पा पार केला आहे मात्र एवढ्यावर समाधानी न राहता त्यांनी मोठी मजल गाठण्याची इच्छा ठेवावी अशी मनोकामना व्यक्त केली.
यानंतर उपस्थित सर्व स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. सोनिया मापुसकर यांनी केले तर प्रा. स्नेहल मांगले यांनी आभार प्रदर्शन केले. महाविद्यालयाच्या सर्व विभागप्रमुखांनी यानंतर विद्यार्थ्यांची विभागवार सभा घेऊन हितगुज केले. रोजगारप्राप्त व पुढील उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनीही यावेळी आपले अनुभव कथन केले. स्नेह्भोजानानंतर समारभाची सांगता झाली




No comments:

Post a Comment