Wednesday, October 25, 2017

राजेंद्र माने आभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागामध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न!


फोटो: वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध ग्रंथांचे वाचन करताना महाविद्यालयातील विद्यार्थी

     डॉ. ए .पी .जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राजेंद्र माने आभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ग्रंथालय व व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .यानिमित्त ग्रंथालय विभागामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. महावीर साळवी, ग्रंथालय प्रमुख प्रा. जितेंद्र खैरनार, प्रा.मिलिंद शिंदे, प्रा.सीमा भुरवणे, ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. जाधव सर , ग्रंथालय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  
    विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त ग्रंथालयात उपलब्ध असलेले साहित्य जसे की संदर्भ पुस्तके,ई-बुक्स,ई-रिसोर्सेस,व्यक्तिमत्त्व विकास विषयक पुस्तके,नियतकालिके आदींचा जास्तीत जास्त वापर करावा व वाचनासाठी वेळ द्यावा हा वाचन प्रेरणा दिनाचा प्रमुख उद्देश होता.  यावेळी बोलतांना महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रमुख प्रा. जितेंद्र खैरनार म्हणाले की विद्यार्थ्यांनी ग्रंथ व डिजीटल साहित्य या माध्यमातून वाचनाचा दिवसातून कमीतकमी एक तास लाभ घ्यावा. यानंतर व्यवस्थापन विभागाची विद्यार्थीनी कोमल जाधव हिने डॉ.ए .पी .जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला . तसेच ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. जाधव सर यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे सुचवले .

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सीमा भुरवणे यांनी केले . या कार्यक्रमासाठी प्रा.मिलिंद शिंदे व ग्रंथालय कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .

No comments:

Post a Comment