Wednesday, October 25, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “पीसीबी डिझाईनींग युझिंग डीप ट्रेस अँड अल्टीयम सॉफ्टवेअर ”या विषयावर व्याख्यान संपन्न‼



फोटो:- डावीकडून अनुक्रमे समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे, मार्गदर्शक श्री. प्रकाश भानुशाली (टेक्निकल हेड, डिझाईन फॉर एक्सलंस, मुंबई),विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे, प्रा.संदीप भंडारे व अंतिम वर्षाचे विद्यार्थी

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागातर्फेपीसीबी डिझाईनींग युझिंग डीप ट्रेस अँड अल्टीयम सॉफ्टवेअर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.व्याख्यानाच्या उद्घाटनप्रसंगीविभागप्रमुखप्रा.अजित तातुगडेयांनी सांगितले की नवीनसॉफ्टवेअरची विद्यार्थ्यांना ओळख निर्माण व्हावी व इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट गॅप भरून काढावी यासाठी विविध व्याख्यानांचे व कार्यशाळांचे आयोजन करण्यासाठी आपला विभागनेहमीचकार्यरत असतो.

याप्रसंगी बोलतानाइलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागाच्या समन्वयक प्रा. स्वाती बिर्जेयांनीसर्वप्रथम मार्गदर्शक श्री.प्रकाश भानुशाली यांची ओळख करून दिली.श्री.प्रकाश भानुशाली हे याच महाविद्यालयाच्याइलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागाचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांच्याकडून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणे ही अभिमानाची गोष्ट आहे असेही त्या म्हणाल्या.लायसन्स सॉफ्टवेअर बरोबरच ओपन सोर्स सॉफ्टवेअरबद्दलही मुलांना ज्ञान अवगत व्हावे हा व्याख्यान आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू होता असेत्यांनी सांगितले.

हे व्याख्यान तृतीय वर्ष व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.मार्गदर्शक श्री.प्रकाश भानुशाली यांनी डीप ट्रेस अल्टीयम सॉफ्टवेअर वापरून सिंगल लेअर तसेच मल्टिलेअर पीसीबी डिझाईनींग करण्याच्या प्रोसिजरविषयी मार्गदर्शन केले.

   या व्याख्यानाचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागप्रमुखप्रा.अजित तातुगडे, समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी केले.समारोप प्रसंगी प्रा. अनिकेत जोशी यांनी मार्गदर्शक श्री.प्रकाश भानुशाली, संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.



No comments:

Post a Comment