Wednesday, October 25, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात नेचर क्लबतर्फे सेमिनारचे आयोजन


 आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नेचर क्लबतर्फे विविध विषयांवर मान्यवरांचे सेमिनार आयोजित करण्यात आले. मान्यवरांची ओळख व प्रास्ताविक नेचर क्लब प्रमुख प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी केले.कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या नेचर क्लब,एन एस एस या विभागांचे समन्वयक व विद्यार्थी, विद्यार्थीनींना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
  कार्यक्रमाला लांजा येथील आर्टस,कॉमर्स व सायन्स कॉलेजचे डॉ.विक्रांत बेर्डे यांनी ग्रीन ऑडीट यासंदर्भात विस्तृत माहिती दिली.त्यानंतर इको स्पेस ग्रीन,पुणे कंपनीचे डायरेक्टर डॉ.श्रीनाथ कवडे यांनी पर्यावरण जागृती वरील आपल्या सेमिनारमध्ये मानवनिर्मित घडामोडींमुळे होणारी पर्यावरणाची हानीची सर्वांना जाणीव करून दिली व टी टाळण्यासाठीच्या विविध उपायांची सखोल माहिती दिली.बेंगलोर येथील हिमालया कंपनीचे सीएसआर श्री.अनुप महाजण यांनी निसर्गाला गुरु मानून माणसाने मेडिकल व तंत्रज्ञान क्षेत्रात कसे प्रयोग केले व नाविन्यपूर्ण वस्तू तयार केल्या याचे विवेचन केले.सर्व मान्यवरांनी आपल्या संदेशामध्ये निसर्गावरील मानवाचे अवलंबीत्त्व स्पष्ट करून त्याचे संगोपन व संवर्धन करण्याचा बहुमोल सल्ला दिला.तसेच शाश्वत प्रगतीचा सल्ला उपस्थितांना दिला.
  कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाला प्रा.वैभव डोंगरे,प्रा.ओंकार गद्रे,प्रा.गणेश वाफेलकर व नेचर क्लब तसेच एन एस एस चे बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांचे आयोजनासाठी प्रोत्साहन लाभले.


No comments:

Post a Comment