Wednesday, October 25, 2017

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात निसर्ग सहलीचे आयोजन!!

  आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नेचर क्लबने विद्यार्थ्यांसाठी निसर्ग सहल आयोजीत केली होती. विद्यार्थ्यांना निसर्गातील वनस्पती,पशुपक्षी यांची माहिती व्हावी,मानवनिर्मित प्रदूषण व इतर गोष्टींमुळे निसर्गाची होणारी हानी लक्षात यावी तसेच त्यांच्यात निसर्ग संगोपन व संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी महाविद्यालयाचा नेचर क्लब अशा प्रकारचे उपक्रम व मान्यवरांचे सेमिनार आयोजित करतो.
  याअंतर्गत आंबाघाट ते विशालगड दरम्यान जंगलातील निवडक वनस्पती व पशुपक्ष्यांची मुलांना माहिती करून देण्यात आली तसेच याच  रस्त्यावरील शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या पावनखिंडीला विद्यार्थ्यांनी भेट दिली व त्याचा इतिहास माहित करून घेतला. त्यानंतर माणोली धारण व तिथून जवळपास ३० किमी वरील कोल्हापूर जिल्ह्यातील  प्रसिद्ध बरकी येथे ट्रेकिंगचा अनुभव घेतला व तेथील धबधब्याचा मनमुराद आनंद लुटला.

  या  सहलीचे सर्व आयोजन नेचर क्लबप्रमुख प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी केले.सहल यशस्वीतेसाठी सुशांत धारवट,हर्षाली माकडे, हर्शल मोचेमाडकर,दत्तप्रसाद निर्मल,स्वराज सावंत,श्रेया जंगम या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.प्रा.संदेश रसाळ यांचेही सहकार्य लाभले. यामध्ये  एकूण पन्नास विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ.महेश भागवत यांचे याकामी प्रोत्साहन मिळाले.

No comments:

Post a Comment