Wednesday, October 25, 2017

माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागातर्फे द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत!



फोटो:व्यासपीठावर डावीकडून अनुक्रमे इलाइट विद्यार्थी प्रतिनिधी कु.श्रेया जंगम, विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे,इलाइट स्टाफ इनचार्ज प्रा. स्वाती बिर्जे व मार्गदर्शनपर भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत




देवरुख: प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम विभागातर्फे द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडला.या स्वागतसोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,विभागप्रमुख प्रा.अजित तातुगडे,इलाइट स्टाफ इनचार्ज प्रा. स्वाती बिर्जे व इलाइट विद्यार्थी प्रतिनिधी कु.श्रेया जंगम उपस्थित होते.

सर्वप्रथमइलाइट स्टाफ इनचार्ज प्रा. स्वाती बिर्जे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.त्याचबरोबर इलाइटस्टुडंट असोसिएशनच्या कार्यकालाबद्द्ल व यशस्वीतेबद्दल विवेचन करत विद्यार्थ्यांचा असलेला वाटा त्यांनी अधोरेखित केला.यानंतरअभियंता दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.तसेच द्वितीय वर्षात प्रवेश केलेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

विभागप्रमुखप्रा.अजित तातुगडे यांनी आपल्या मल्टीमिडिया प्रेझेंटेशनद्वारे विभागाचे व्हिजन व मिशन तसेच मागील वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेत नुकत्याच येणाऱ्या नॅक कमिटीसंदर्भात  उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉममध्ये भविष्यातील उपलब्ध असणा-या गव्हर्न्मेंट व प्रायव्हेट सेक्टरमधील संधीविषयीहीत्यांनी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी सर्वप्रथम द्वितीय वर्षामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणातबोलताना त्यांनीविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालय करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.याचबरोबर विद्यार्थ्यांकडूनही त्यांनी कठोर परिश्रमांची अपेक्षा व्यक्त केली.कोणताही विषय हाताळताना विद्यार्थ्यांनी त्या विषयाच्या मुलभूत संकल्पना व सखोल ज्ञान अवगत करावे असे आवाहन त्यांनी केले.महाविद्यालयात असणा-या शैक्षणिक सुविधांचा आपण पुरेपूर वापर करावा व आपल्या शंकांचे वेळोवेळी निरसन करून घ्यावे असे विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले.

याप्रसंगी विद्यार्थी प्रातिनिधी श्रुतिका गझने व साद नगरजी यांनी सूत्रसंचालन केले.द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले गेले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.आभार प्रदर्शन इलाइट स्टाफ इनचार्ज प्रा. स्वाती बिजें यांनी केले.

No comments:

Post a Comment