Wednesday, February 27, 2019

राजेंद्र माने एम एम एस मध्ये “एक्सप्लोअर – 2 के 19” महोत्सवाचे आयोजन

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने महाविद्यालयामधील एम.एम.एस विभागाचा
“एक्सप्लोअर – 2 के 19” हा वार्षिक युथ फेस्टिवल दिमाखात संपन्न झाला. रत्नागीरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
विविध पदवी महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बेस्ट परसोना स्पर्धा व जनरल चॅम्पियनशिप सारखी मुख्य आकर्षण असणा-या या दोन दिवसीय युथ फेस्टिवलमध्ये ट्रेझर हंट, बिझीनेस क्विझ, बिझिनेस प्लान, अॅडमॅड जुनून, बेस्ट आउट ऑफ वेस्ट, रंगोली, फोटोग्राफी यासारख्या विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या. दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ३२ महाविद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक श्री. रविंद्रजी माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व गद्रे मरीन रत्नागिरीचे एक्सपोर्ट सेल्स मॅनेजर मंदार भागवत, कोलते कॉम्पुटर रत्नागिरीचे संतोष कोलते, प्राचार्य डॉ.महेश भागवत, एम एम एस विभागप्रमुख प्रा. सुदर्शन जाधव, महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख तसेच विवध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीर येथे नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या
भारतीय जवानांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आली. यानंतर प्रथेप्रमाणे दीपप्रज्वलन तसेच मान्यवराचे स्वागत
करण्यात आले. एक्सप्लोअरचे संयोजक प्रा. सुदर्शन जाधव यांनी प्रास्ताविक करताना फेस्टिवल आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवर व स्पर्धक विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना परिसरातील पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये विकसित व्हावीत व त्यांचा सर्वंकष विकास व्हावा यासाठी माने महाविद्यालयाने उचललेले हे एक पाउल असल्याचे सांगितले.
यानंतर संतोष कोलते म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाकडे पुढे स्वतः उद्योग उभारण्याच्या दृष्टीकोनातून
पहायला हवे. तसेच यासाठी संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व या दोन्ही बाबीही यासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत.प्रमुख पाहुणे मंदार भागवत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यवस्थापकिय शिक्षण व रोजगार यावर विशेष मार्गदर्शन केले.त्यांनी अशाप्रकारच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग फार महत्वाचा असल्याचे सांगितले.
माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र माने यानी प्रथम सीमेवरील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी उद्योग धंद्यामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापकीय ज्ञान उपयुक्त असल्याचे सांगून इच्छाशक्ती,आत्मविश्वास, मेहनतीपणा यासारख्या गुणांकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे असे सांगितले.
यानंतर सलग दोन दिवस विविध प्रकारच्या स्पर्धा पार पडल्या. विशेषत्वाने दिव्यांच्या प्रकाशझोतात महाविद्यालयाच्या भव्य व हिरव्यागार प्रांगणात बेस्ट परसोना स्पर्धा रात्रीचे वातावरण धुंद करून गेली. कोकण फिल्म इंस्टीट्युट चिपळूणचे सत्येंद्र राजे आणि एल अॅड टी फायनान्स कोल्हापूरचे योगेश कुंभार यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. यामध्ये मिस्टर आणि मिस एक्सप्लोअर निवडण्यात आले. डीबीजेचा स्टीफन अलवी मिस्टर एक्सप्लोअर तर बाईंग कॉलेज लांजाची सविता पुजारी मिस एक्सप्लोअर ठरली.
प्रामुख्याने आठल्ये सप्रे महाविद्यालय देवरुख, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी, डी.बी.जे महाविद्यालय
चिपळूण, बी.एच.बाईग महाविद्यालय लांजा, , एस आर एम कॉलेज कुडाळ, डी एस जि कॉलेज सावंतवाडी, केळकर कॉलेज देवगड च्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये आपली छांप पडली. स्पर्धेचा सांगता समारंभ गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या कॉमर्स विभाग उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
आपल्या भाषणात त्यानी अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाची गरज असून त्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला. सहभागी स्पर्धकांनीही या फेस्टिवलमधील सहभाग व महाविद्यालय परिसरातील दोन दिवस एक सुंदर अनुभव होता असे सांगितले. मा. रवींद्र माने, प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ महेश भागवत, विभागप्रमुख प्रा. सुदर्शन जाधव आणि मान्यवराच्या हस्ते विजेत्यां विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. देवरूखच्या आठल्ये सप्रे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विजेतेपदे मिळवत एक्सप्लोअर २ k १९ जनरल चॅम्पियनशिप पटकाविली.
ज्योत्स्ना यादव, पूर्वा पटेल, सुमित आम्रे यांनी सूत्रसंचालन केले. या संपूर्ण स्पर्धा महोत्सवाचे समन्वयक म्हणून प्रा.
मासुमा पागारकर यांनी काम पाहिले. तर नियोजनामध्ये एम एम एस विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी व इतर कर्मचा-यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

फोटो: १) मिस्टर आणि मिस एक्सप्लोअर आणि मान्यवर परीक्षक
२) विजेत्या महाविद्यालयाला “एक्सप्लोअर २ k १९ जनरल चॅम्पियनशिप” प्रदान करताना संस्थाध्यक्ष मा.
रवींद्र माने, प्रमुख पाहुण्या डॉ. यास्मिन आवटी, प्राचार्य डॉ. महेश भागवत.




No comments:

Post a Comment