Sunday, May 13, 2018

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात आय-स्पार्क(i-Spark) २०१८ उत्साहात संपन्न!


फोटो:-विजेत्यांना सन्मान-चिन्हे आणि प्रशस्तीपत्रक देताना विभागप्रमुख प्रा.श्री. मुश्ताक गडकरी, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहाजी माने,श्री.प्रद्युम्न माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, एस(ACE) शिक्षकप्रमुख प्रा. विशाल पारकर

  वार्षिक स्पर्धा-श्रुंखलांच्या वातावरणात राजेंद्र माने अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये नुकताच एक अनोखा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. संगणक अभियांत्रिकी शाखेच्या असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग(ACE) च्या अंतर्गत हा उपक्रम आय-स्पार्क(i-Spark) २०१८ या नावाने आयोजित करण्यात आला. या उपक्रमामध्ये महाविद्यालयीन गटासोबत शालेय गटालाही समाविष्ट करण्यात आले होते.
  विद्यालयीन गटामध्ये मीनाताई ठाकरे साडवली, न्यू इंग्लिश स्कूल देवरुख, . .पाध्ये स्कूल, सावित्रीबाई फुले महाविद्यालय कांजीवरा, श्री. शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब, लोकविद्यालय तुळसणी, निवे आश्रमशाळा, इत्यादी विद्यालयांचा समावेश केला गेला. स्पर्धेसाठी अंदाजे ३०० विद्यार्थ्यानी सहभाग दर्शविला.
  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहाजी माने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या दिवशी पाचवी ते सातवी या गटासाठी नकाशाभरणे, शब्दकोडे, चित्रकला आणि विज्ञान प्रकल्पप्रदर्शन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . यातील नकाशाभरणे या स्पर्धेत मीनाताई ठाकरे - साडवली महाविद्यालयाच्या कु. तेजस जौरत व कु. आशिष खांडेकर यांनी तर शब्दकोडे या स्पर्धेत इंग्लिश स्कूलमधील कु. मृण्मयी सोलकर व कु. सृष्टी कोरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेचचित्रकलाया स्पर्धेत कु. मंदार साळवी याने तर विज्ञान-प्रकल्प प्रदर्शनामध्ये . .पाध्ये स्कूलच्या कु. सिद्धार्थ डोने, कु. जान्हवी वेलवणकर , कु. आर्यन वेलवणकर या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
  महाविद्यालयीन गटामध्ये राजेंद्र माने तंत्रनिकेतन व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या दिवशी सी-प्रोग्रॅमिंग, प्रश्नमंजुषा(क्विझ), लॅन गेमींग एन.एफ.एस व काउन्टर स्ट्राईक या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच इयत्ता ११ वीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी पी.सी. असेम्ब्ली आणि वर्च्यूअल लॅब या विषयांवर संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी यांनी मोफत कार्यशाळा घेतली. सर्व स्पर्धांमध्ये राजेंद्र माने तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवून स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. सातवी ते नववी तसेच ११ वीच्या विध्यार्थ्यांसाठी सकाळी अल्पोपहाराची व निवे आश्रमशाळेमधील ३० विद्यार्थ्यांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था देखील एस(ACE) तर्फे करण्यात आली होती.
   विजेत्यांना सन्मान-चिन्हे आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.या स्पर्धांसाठी परिक्षक म्हणून राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामधील प्रा.सचिन वाघमारे, प्रा.. अजित तातुकडे, श्री. प्रशिल अणेराव आणि प्रा.अनिकेत जोशी यांनी जबाबदारी सांभाळली. आय-स्पार्क(i-Spark) २०१८ हा उपक्रम संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. मुश्ताक गडकरी, एस(ACE) शिक्षकप्रमुख प्रा. विशाल पारकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
   हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी एस(ACE) विद्यार्थीप्रमुख कु.दिपक निकट आणि सर्व एस(ACE) सभासदांनी परिश्रम घेतले. आय-स्पार्क कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक दानशूर व्यक्तींकडून देणग्या प्राप्त झाल्या होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या उत्साहवर्धक पाठींब्यामुळे हा उपक्रम यशस्वी होण्यास खूप मदत झाली.


No comments:

Post a Comment