Sunday, May 13, 2018

‘माने अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे सोलर प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न’! “संस्थेचा सामाजिक बांधिलकी उपक्रम”!!




                 
फोटो:- “मोबाईल अॅपद्वारे संचालित सोलर स्ट्रीट लाईट” या प्रोजेक्टच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थित मान्यवर छ.शिवाजी सार्वजनिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.नंदकुमार सुर्वे,खजिनदार श्री.शशिकांत सुर्वे,सचिव श्री.प्रमोद आगरे, प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने, प्राचार्य डॉ.महेश भागवत, ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये, प्रोजेक्टचे मार्गदर्शक प्रा.सुमित सुर्वे
  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑटोमोबाईल विभागाच्या दोन विद्यार्थीनिंनी बनवलेला “मोबाईल अॅपद्वारे संचालित सोलर स्ट्रीट लाईट” या प्रोजेक्टचा लोकविद्यालय तुलसणी येथे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत पार पडलेल्या या सोहळ्याला छ.शिवाजी सार्वजनिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.नंदकुमार सुर्वे,खजिनदार श्री.शशिकांत सुर्वे,सचिव श्री.प्रमोद आगरे, प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने, प्राचार्य डॉ.महेश भागवत, ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये तसेच सदर प्रोजेक्टचे मार्गदर्शक प्रा.सुमित सुर्वे उपस्थित होते.
  सर्वप्रथम छ.शि.सा.शि. मंडळाचे अध्यक्षांच्या हस्ते प्रोजेक्ट करणाऱ्या विद्यार्थीनी कु.स्नेहा सोनावणे व कु.अश्विनी कदम यांचा तसेच मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.प्रा. सुमित सुर्वे यांनी प्रास्ताविक करताना समारंभाचा उद्देश स्पष्ट केला.
  याप्रसंगी बोलताना विभागप्रमुख प्रा.राहुल राजोपाध्ये यांनी संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने यांनी घालून दिलेल्या सामाजिक बांधिलकीच्या मार्गावरती ऑटोमोबाईल विभागाची वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत अभियांत्रिकीच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा या उद्देशाने अशाप्रकारचे विविध उपक्रम महाविद्यालय राबवीत असते.यापुढेही महाविद्यालय अशा सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली.सचिव श्री.प्रमोद आगरे यांनी महाविद्यालयाला धन्यवाद देताना अभियांत्रिकी महाविद्यालयाची समाजाशी असलेली नाळ अधिक सुद्रुढ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
  याप्रसंगी बोलताना संस्थेचे खजिनदार श्री.शशिकांत सुर्वे यांनी प्रा. सुमित सुर्वे व विद्यार्थीनिंनी दाखवलेल्या सामाजिक कृतज्ञतेबद्दल त्यांचे कौतुक केले. संस्थाध्यक्ष श्री.नंदकुमार सुर्वे यांनी महाविद्यालयाने कोणताही मोबदला न घेता हा प्रकल्प प्रदान केल्याचे विशेषत्त्वाने नमूद घेले.
  अध्यक्षीय भाषणात मा. श्री.रविंद्रजी माने म्हणाले की सध्याच्या युगामध्ये सामाजिक जाणीवा प्रगल्भ होण्याची नितांत आवश्यकता आहे.या जाणीवा विस्तारण्यासाठी प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था कोकणवासीयांसाठी कायम अग्रेसर राहील.याप्रसंगी सदर प्रोजेक्टच्या श्रेयनामावली फलकाचे अनावरण रिमोट कंट्रोलद्वारे मा.श्री. रविंद्रजी माने यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोहन काळे सर यांनी केले.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक प्रा.सुमित सुर्वे,संदीप प्रजापती,हर्षल मोचेमाडकर,सिद्धेश कोल्थटकर यांनी परिश्रम घेतले.   


No comments:

Post a Comment