Sunday, January 21, 2018

माने इंजिनीअरींग कॉलेजला “ बेस्ट कॅंम्पस अॅवॉर्ड ” प्राप्त ‼






फोटो: प्रमुख अतिथी डॉ.बुटा सिंग,डीन,पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटी तसेच सन्माननीय अतिथी आयएसटीई, न्यू दिल्लीचे अध्यक्ष प्रा.प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते “ बेस्ट कॅंम्पस अॅवॉर्ड ” स्विकारताना संस्था प्रतिनिधी श्री.प्रद्युम्न माने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत, MSBTE चे संचालक डॉ.मोहितकर, संदीप फौंडेशन चे अध्यक्ष डॉ.संदीप झा,तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.नंदनवार आदी मान्यवर
   आंबव, देवरुख येथील प्रथितयश अशा प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने  इंजिनीअरींग कॉलेजच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला असून नुकताच इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई) या संस्थेकडून २०१७-१८ वर्षाचा महाराष्ट्र व गोवा विभागासाठीचा ‘बेस्ट इंजिनीअरिंग कॅंम्पस’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.हा पुरस्कार संदीप फौंडेशन चे संदीप पॉलिटेक्निक,त्रिंबकरोड नाशिक येथे १५ व्या आय.एस.टी.ई  महाराष्ट्र व गोव्याच्या राज्यस्तरीय स्टुडंट कनव्हेन्शनवेळी प्रदान करण्यात आला.
   उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बुटा सिंग,डीन,पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटी तसेच सन्माननीय अतिथी म्हणून आयएसटीई, न्यू दिल्लीचे अध्यक्ष प्रा.प्रतापसिंह देसाई,MSBTE चे संचालक डॉ.मोहितकर, संदीप फौंडेशन चे अध्यक्ष डॉ.संदीप झा,तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.नंदनवार उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार महाविद्यालयास प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार संस्था प्रतिनिधी म्हणून श्री.प्रद्युम्न माने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी स्विकारला.
  कॉलेजचा परिसर हा ३१.५ एकरामध्ये व्यापलेला हरित परिसर असून पर्यावरण पूरक असे वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लांट,सोलार दिवे व रेन वॉटर हार्व्हेस्टिंग प्लांट यांसारखे विविध प्रकल्प येथे राबविण्यात आले आहेत. विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारच्या इनडोअर व आउट डोअर स्पोर्ट्स सुविधा,जिम्नॅशियम,होस्टेल,मेस व कॅंटीनची उत्तम सोय तसेच मेडिकल फॅसिलीटी,२४*७ अॅंब्युलंस,बँक ATM तसेच अभ्यासासाठी रात्री १२ पर्यंत लायब्ररी सुविधा देण्यात आल्या आहेत.विद्यार्थांसाठी येथे ८० एमबीपीएस ची ब्रॉडबॅंड सेवा तसेच वायफाय ची इंटरनेट सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. महाविद्यालय हे टीसीएस या नामांकित कंपनीचे अधिकृत ऑनलाइन परीक्षेचे केंद्र असून याअंतर्गत गेट, आरआरबी, एमपीएससी, महाजेन्को, बीएसएनएल, आयबीपीएस यांसारख्या स्पर्धापरीक्षांचे केंद्र असून संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो परीक्षार्थी येथे परीक्षेसाठी येत असतात. गेल्या दोन वर्षांपासून 'व्हर्चुअल लॅब' साठी या महाविद्यालयाला भारतीय प्रोद्योगिकी संस्थान(आय.आय.टी) बॉम्बे या प्रथितयश संस्थेचे नोडल सेन्टर म्हणून मान्यता मिळाली आहे.या विषयाच्या अनेक कार्यशाळा यापूर्वीही महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांसाठी घेण्यात आलेल्या आहेत.

  महाविद्यालयाला नुकतीच नॅक मानांकनाची ‘बी प्लस’ हि श्रेणी ‘२.६२’ गुणांसह प्राप्त झाली आहे. तसेच महाविद्यालयाला ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (ए.आय.सि.टी.इ),सि.आय.आय सर्व्हेमध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णश्रेणी प्राप्त झाली आहे. महाविद्याच्या कॅंम्पसमधील सोयी सुविधा व महाविद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांमुळे हे महाविद्यालय इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई)च्या मूल्यांकनाच्या निकषांमध्ये पात्र ठरून या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष श्री.रविंद्रजी माने यांनी प्राचार्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment