Tuesday, February 16, 2016

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “एक्सप्लोर 2k16” चे भव्य आयोजन!!

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात एक्सप्लोर 2k16 चे भव्य आयोजन!!

 व्यासपीठावर संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुखटणकरराजेंद्र माने            अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत तसेच विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी
 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे  एक्सप्लोर 2k16 चे आयोजन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने,गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुखटणकरराजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवत तसेच विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी उपस्थित होते.
  याप्रसंगी प्रा. साळवी यांनी स्वागतपर भाषणामध्ये उपक्रम आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवतयांनी अशा उपक्रमातून सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला हातभार लागतो आणि  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीच हे व्यासपीठ असल्याचे सांगितले.प्रमुख पाहुणे डॉ.सुखटणकर यांनी ओसाड रानामध्ये महाविद्यालयाच्या रूपाने नंदनवन फुलवण्याच्या माने साहेबांच्या कर्तृत्व शैलीचे विवेचन करून विद्यार्थ्यांना पदवीनंतरच्या आयुष्याबाबत मार्गदर्शन केले.बाहेरच्या जगात मार्क्स आणि पदवी याबरोबरच विद्यार्थ्यांकडे नाविन्यपूर्ण विचार हवेत.त्यांनी विद्यार्थ्यांना असेही सांगितले की तुमच्या ज्ञानाचा उपयोग हा समाजातील घटकांना उपयोगी ठरावयास हवा .
  संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने यांनी सांगितले की आयुष्याची जडण घडण होण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असते, इच्छा असेल तर या जगात काहीच अशक्य नाही. श्री. रवींद्र माने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले आत्मविश्वास असलेले व आत्मविश्वास नसलेले तसेच गोंधळलेले या तीन प्रकारामध्ये गोंधळलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मनाशी निर्धार करावयास हवा.
  दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात अॅड मॅड जुनून,बिझनेस प्लॅनबिझनेस क्विझ,रंगोली, बेस्ट आउट ऑफ वेस्ट,फोटोग्राफी,फेस पेंटिंग यासारख्या स्पर्धांचा समावेश होता. या युवा महोत्सवात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५० स्पर्धक सहभागी झाले होते.या उपक्रमाला देवरुख येथील ‘प्रॉपर्टी इन कोकण’ मुख्य प्रायोजक होते.
  यामध्ये सर्वसाधारण विजेतेपद बी.एच.बाईंग महाविद्यालय शिपोशीच्या स्पर्धक समुहाने पटकावले.बक्षीस वितरण प्रॉपर्टी इन कोकण चे श्री.गणेश खामकर, डॉ. एस.आर.भोसले यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा.सिद्धार्थ पाटील,प्रा.रोहित माळगी, प्रा.हर्षदा दुतोंडकर यांनी नियोजन केले.



No comments:

Post a Comment