Saturday, February 20, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष !!

राजेंद्र  माने  अभियांत्रिकी  महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष !!

  न भूतो न भविष्यती या एकमेव उक्तीने वर्णन करता येईल असा शिवजयंतीचा  सोहळा आज येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.
  शिवप्रतिष्ठान आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गेली अनेक वर्षमहाविद्यालयातील शिवप्रतिष्ठानतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.या प्रसंगी संस्थाध्यक्ष मा.श्री. रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ.नेहा माने,सचिव श्री. दिलीप जाधव,कार्यक्रमाचे आयोजक प्रा.राहुल राजोपाध्ये, प्रा.राहुल बेळेकर उपोस्थित होते.
 तत्पूर्वी शिवप्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी रत्नदुर्ग किल्ला भगवती मंदिर येथून शिवज्योत आणली. पन्नास कि.मी.च्या या शिवज्योत दौडीमध्ये शंभर विध्यार्थ्यासह प्रा.राहुल राजोपाध्ये, प्रा.राहुल बेळेकर,प्रा.अच्युत राउत, प्रा.राहुल पोवार, प्रा.माणिक पवार,अनिकेत सुर्वे, दीपक जंगम यांनी भाग घेतला.पहाटे पाच वाजता शिवज्योत प्रज्वलित करून शिवज्योत दौडीला प्रारंभ करण्यात आला. सहा तासांच्या प्रवासानंतर अकरा वाजता तिचे महाविद्यालय प्रांगणात संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने यांनी स्वागत केले.त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात छत्रपतींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. लक्षवेधी ठरलेल्या या मिरवणूकीत कोकणातील पारंपारिक पालखीनृत्य तसेच विविध मुखवटे सहभागी झाले होते.
 मिरवणूकीनंतर श्री.माने यांचे हस्ते शिवज्योतीची स्थापना तसेच शिवप्रतिमा पूजन करण्यात आले.या प्रसंगीमहाविद्यालयाच्या ड्रामा क्लबच्या विध्यार्थ्यानी स्वरचित नाटक सादर केले.सायंकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध श्री. विक्रम एडके यांचे दिल्ली आणि मराठी साम्राज्य याविषयावर माहितीपूर्ण व्याख्यान झाले.
 श्री. सोमनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.संपूर्ण दिवसभरातील शिवजयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठान तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. यामध्ये सोमनाथ पाटील,रोहित कदम,दळवी,प्रसाद शिंदे यांचा समावेश होता.  

No comments:

Post a Comment