Thursday, March 24, 2022

राजेंद्र माने महाविद्यालय देवरूख येथील एमबीए विभागातील विद्यार्थ्यांची स्कॉलर्स कट्टा पुणे कंपनीमध्ये निवड

 राजेंद्र माने महाविद्यालय देवरूख येथील एमबीए  विभागातील विद्यार्थ्यांची स्कॉलर्स कट्टा पुणे कंपनीमध्ये निव

स्कॉलर्स कट्टा पुणे या ई लर्निंग सॉफ्टवेअर कंपनीने महाविद्यालयाच्या एम बी ए विभागातील नऊ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. विविध निवड चाचण्यांमधून एकूण  27 विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी यशस्वी झाले त्यामधील सात विद्यार्थ्यांना मार्केटिंग मॅनेजर पदावर रुजू करण्यात आले व दोन विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. अश्विनी मोहिते कु. धनश्री साळवी कु. मानसी अणेराव, कु अंकिता पिंपळकरकु जुईली हिरवे,  कु पूजा गुरवकु. सानिया वास्ता, शैलेश गुरव, ऋषिकेश खानविलकर यांचा समावेश आहे.

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय देवरुख येथे 2010 सालापासून एम बी ए विभाग कार्यरत आहे. आज या विभागातून अनेकानेक विद्यार्थी व्यवस्थापन शास्त्र या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपली कारकीर्द यशस्वीपणे पुढे नेत आहेत. या विभागातून आतपर्यंत दहा बॅचेस यशस्वी होऊन बाहेर पडल्या आहेत. व्यवस्थापन शास्त्र हे एक नुसते शिक्षण नसून विद्यार्थ्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी एक अविभाज्य घटक आहे. या विभागातर्फे व्यवस्थापन शास्त्र त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये याचे संपूर्ण ज्ञान तज्ञ  प्राध्यापकांकडून महाविद्यालय सातत्याने देत आहे. महाविद्यालयाचा एम बी ए विभाग मुंबई विद्यापीठाशी सलग्न असून यास ए आय सी टी ई नवी दिल्ली ची मान्यता आहे. तसेच संपूर्ण अभ्यासक्रम अद्ययावत मार्केटशी संलग्नित आहे. या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञानाबरोबरच रिसर्च प्रोजेक्टचे सुद्धा ज्ञान दिले जाते. हे रिसर्च प्रोजेक्ट विद्यार्थ्यांची सर्व कौशले आणि विद्वत्ता यांचा एक समर्पक संगम आहे. 

हे महाविद्यालय व एमबीए विभाग नुसते शिक्षण देऊन थांबत नाही तर विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनवणे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्नशील असते. यासाठी विविध शासकीय व निमशासकीय आस्थापनांची मदत मिळत असते. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर यशस्वीपणे एखाद्या कंपनीमध्ये निवड होणे अनिवार्य असते आणि यासाठी सातत्याने कंपन्यांशी संपर्क साधणे इ. काम अविरतपणे चालू असते. याचेच फलित म्हणून अनेक नामवंत कंपन्या विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आपल्या कंपनीमध्ये विविध पदांवर घेण्यासाठी इच्छुक आहेत.

या प्लेसमेंट ड्राइव्ह साठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर व विभाग प्रमुख प्रा. मोहन गोसावी तसेच इतर सहकारी प्राध्यापक यांचे प्रयत्न विशेष कारणीभूत ठरले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा. श्री.  रवींद्र माने तसेच प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी अभिनंदन केले.

 

 

Photo: सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो सोबत जोडले आहेत











No comments:

Post a Comment