Thursday, March 24, 2022

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्याची इन्फोजेन लॅब्ज कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड

 राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्याची इन्फोजेन लॅब्ज कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड

देवरुख येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील 11 विद्यार्थ्यांची इन्फोजेन लॅब्जपुणे येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये यशस्वी निवड झाली आहे . ही कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सॉफ्टवेअर क्षेत्रात नामांकित म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या प्रामुख्याने कॅलिफोर्निया तसेच यु.के. या ठिकाणी शाखा आहेत. भारतातील शाखा पुणे येथे आहे.

या कंपनीसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह दिनांक २६ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. करोनाचे सर्व बंधनकारक नियम यावेळी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी कटाक्षाने पाळण्यात आले. या प्लेसमेंट प्रोसेस मध्ये  लेखी बुद्धीमत्ता चाचणी सहित टेक्निकल इंटरव्यू तसेच एच आर इंटरव्यू घेण्यात आले. या सर्व प्रोसेससाठी एकूण ६३  विद्यार्थी प्रवेशित झाले होते. ही निवड प्रक्रिया मेकॅनिकल ,ऑटोमोबाईलइलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या सर्व शाखांसाठी घेण्यात आली.

एकूण निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विषयाचे ज्ञान व इतर कौशल्यांचा कस लागला. या कठीण प्रक्रियेनंतर एकूण अकरा विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली.

 

यामध्ये कॉम्प्युटर विभागातील संकेत धुरीवैष्णवी आचरेकरकामाक्षी प्रभू आजगावकरशीतल गुरवविनय भोलेपूर्वा पवारसुरज कुंभारराहुल गुप्ता हे विद्यार्थी तसेच ऑटोमोबाईल विभागातील सागर रेडकर व अनिकेत बने आणि मेकॅनिकल विभागातील प्रथमेश भूरवणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

संस्थाध्यक्ष मा. श्री रवींद्र माने यांचा अथक प्रयत्न परिश्रमातून बावीस वर्षांपूर्वी उदयास आलेल्या या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबत इतर सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या उज्वल भवितव्याचा हा समर्पक पर्याय ठरला आहे. उच्चशिक्षित शिक्षक वर्गअद्ययावत प्रयोगशाळावर्कशॉपसर्व सोयींनी युक्त निवास व्यवस्था आणि अभ्यासासाठी अद्ययावत ग्रंथालयाची उपलब्धता हे सर्व घटक विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूरक प्रगतीस हातभार लावतात. एकूण ३५ एकर निसर्गरम्य परिसरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनमुंबई विद्यापीठ व ए आय सी टी ई या शासकीय संस्थाशी संलग्नीकरण यामुळे  संस्था प्रगतीपथावर यशस्वी मार्गाक्रमण करीत आहे. यासाठी प्राचार्य तसेच प्राध्यापक सक्षमपणे कार्यरत आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवडले जात असून काही शिक्षण पूर्ण होण्याआधीच कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेद्वारे आपल्या करिअरमध्ये प्रवेशित होत आहेत .

या प्लेसमेंट प्रक्रियेसाठी कंपनीतर्फे श्री संकेत प्रभू, डायरेक्टर, इन्फोजेन लॅब्ज तसेच एच आर मॅनेजर व अन्य तज्ञांची समिती उपस्थित होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री रवींद्र माने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी विशेष कौतुक केले आहे. ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहन गोसावी तसेच प्रा. स्नेहल मांगले व महाविद्यालयाची प्लेसमेंट टीम यांचे अथक  परिश्रम कारणीभूत ठरले या सर्वांतर्फे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Photo Caption: इन्फोजेन लॅब्ज या कंपनीमध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य डॉमहेश भागवतसंकेत प्रभूप्रामोहन गोसावी  कंपनीचे इतर अधिकारी.



No comments:

Post a Comment