Friday, July 19, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकीची टीम MH-08 रेसिंग युके ला रवाना अभियांत्रिकी डीझाइन इव्हेंट (फॉर्मुला स्टूडंट २०१९) स्पर्धेमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व


रत्नागिरी जिल्ह्यातील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविदयालयाची टीम एम एच ०८ रेसिंग नुकतीच सिल्वरस्टोन सर्किट, युके ला रवाना झाली आहे. अभियांत्रिकी डीझाइन इव्हेंट म्हणजेच फॉर्मुला स्टूडंट २०१९ या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या या  टीममध्ये एकूण बारा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  
इंग्लंड येथे होणा-या जगातील सर्वात प्रतिष्ठीत अभियांत्रिकी डीझाइन इव्हेंट म्हणजेच फॉर्मुला स्टूडंट २०१९ या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या या टीमची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण कामगिरी बजावत या टीमने महाविद्यालयाच्या व राष्ट्राच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
सन १९९८ पासून कार्यरत असणा-या आय मेक फॉर्मुला स्टूडंट या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारा आयोजित होणा-या फॉर्मुला स्टूडंट इव्हेंट मध्ये दरवर्षी शेकडो दिग्गज आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सहभागी होतात. ही स्पर्धा फॉर्मुला १ दुनियेमधील बहुचर्चित असणा-या सिल्वरस्टोन सर्किट, युके येथे घेतली जाते. या स्पर्धेत निवड होण्यासाठी विशेष चाचण्या घेतल्या जातात. या चाचणीमध्ये कमालीचे यश मिळवत या टीमने भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त केली आहे.
कोकणातील या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सलग ४ वर्षांपासून अत्युच्च क्षमतेच्या फॉर्मुला स्टूडंट रेस कारची निर्मिती करीत आहेत. या टीमने सलग दोनवेळा बेस्ट डिझाईन रेस कार ऑफ इंडियाकिताब पटकावून राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर या रेस कारची निर्मिती केली आहे.
संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने, कार्यकारी अध्यक्ष सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत यानी तसेच तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी टीमचा कप्तान प्रणीत वाटवे व इतर सर्व टीम सदस्यांना स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो: स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेली कार सोबत टीम MH-08 रेसिंग



No comments:

Post a Comment