Saturday, September 12, 2015

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ विक्री व विपणन ’ उपक्रम साजरा !!






 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एम.एम. एस. विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांतर्फेविक्री विपणन उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमाचे उद्घाटन संस्थाध्याक्ष श्री.रविंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, विभाग प्रमुख प्रा.महावीर साळवी,प्रा.अजय राजधान, कार्यक्रम समन्वयक प्रा.रोहित माळगी, प्रा.सिद्धार्थ पाटील, प्रा.हर्षला दुतोंडकर(शेलार)उपस्थित होते.
              विद्यार्थ्यांमध्ये विपणनशास्त्र तसेच विक्रीकला कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये व्यवस्थापन विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला सर्व विद्यार्थ्यांनी एकूण सहा ग्रुपपमध्ये विभागण्यात आले यातील प्रत्येक ग्रुपने विविध वस्तू खाद्यपदार्थ विक्री करून हा उपक्रम यशस्वी केला.
             या उपक्रमामुळे विद्द्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील मुलभूत संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मदत मिळाली.भांडवल,किंमत,नफातोटा,ताळेबंद,ग्राहकवर्तणूक,विक्रीकला,विपणनशास्त्र,जाहिरातकला,यासारख्या अभ्यासक्रमातील संकल्पना आत्तापर्यंत फक्त पुस्तकी ज्ञानामध्येच बंदिस्त राहिल्या होत्या.या उपक्रमामुळे या पुस्तकी ज्ञानाला व्यवहार ज्ञानाची जोड मिळून विद्द्यार्थ्यांसाठी ज्ञानाची नवी कवाडे उघडण्यास मदत मिळाली.
        या उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने  विद्द्यार्थ्यांकडूनइंडियन असोसिएशन फॉर ब्लाईडया संस्थेकरिता निधी संकलन करण्यात आले.या निधी संकलनाला महाविद्यालयातील सर्व विभागाअंतर्गत विद्यर्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. संस्थाध्याक्ष श्री.रविंद्र माने यांच्या प्रेरणेने, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या प्रोत्साहनाने, विभाग प्रमुख प्रा.महावीर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा.अजय राजधान यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी ठरला.

No comments:

Post a Comment