Tuesday, April 6, 2021

* राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एम एम एस च्या विद्यार्थ्यांची अॅपेक्स कंपनीमध्ये यशस्वी निवड *

 

 देवरुख आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्ह मध्ये एम एम एस या पदव्युत्तर विभागातील पाच विद्यार्थ्यांची अॅपेक्स अॅक्टसॉफ्ट या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. यामध्ये या विभागातील संदेश परशराम, ऋतुजा पेवेकर, तस्मिया मुजावर, अनघा टिकेकर व प्रतीक्षा सामंत हे विद्यार्थी निवडीत पात्र ठरले आहेत.

यासोबत कम्प्युटर शाखेतील  पूजा रुके व सोनाली शिंदे तर मेकॅनिकल विभागातील संकेत जाधव व रोहन करंडे या विद्यार्थ्यांनीही या कंपनीची निवड चाचणी यशस्वीपणे पार केली आहे. निवड प्रक्रियेत ग्रुप डीसकशन, बुद्धिमत्ता परीक्षा, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यू यासारख्या चाचण्या घेतल्या गेल्या. या सर्व फेर्‍यांमधून महाविद्यालयाच्या एकूण नऊ विद्यार्थ्यांची कंपनीने निवड केली आहे .

याचबरोबर २२ मार्च रोजी पार पडलेल्या वदिनी इन्फोसेंटर या बहुराष्ट्रीय आय.टी. कंपनीच्या रिक्रुटमेंट ड्राईव्ह मध्ये महाविद्यालयाच्या कम्प्युटर शाखेतील अनिकेत झेपले, प्रतीक्षा पांचाळ, राज सुर्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधील तेजल राव या आणखी चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या कंपनीचे ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स पुणे येथे असून मुख्यालय अमेरिकेमध्ये आहे, या कंपनीच्या विविध शाखा यु.एस.ए आणि यु.के. मध्ये कार्यरत असून ही कंपनी ग्राहकांना प्रभावी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मदत करते.

 

 प्र. शि. प्र. संस्थेचे राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय मागील बावीस वर्षापासून मुलभूत शिक्षणाबरोबरच व्यावसायाभिमुख प्रशिक्षण देते आहे. महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यासारखे पदवी अभ्यासक्रम असून एमबीए हा पदव्युत्तर विभाग आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना नियमितपणे अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट ग्रुप, डिस्कशन आणि इंटरव्ह्यूचे प्रशिक्षण नियमितपणे दिले जाते.  तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य प्रशिक्षणावर भर देऊन त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी सक्षम बनविण्याचे प्रयत्न केले जाते. त्यामुळे महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि महाविद्यालयामध्ये शिकत असणारे विद्यार्थीही  प्लेसमेंटमध्येही  घवघवीत यश संपादन करीत आहेत. 

चालू शैक्षणिक वर्षांत कोव्हीड- 19 ही महामारी आणि लॉकडाऊन या परिस्थितीमध्येही  टी सी एस , अॅसेंच्युअर, विप्रो, अॅपेक्स अॅक्टसॉफ्ट, वादिनी इन्फोसेन्टर यासारख्या ख्यातनाम कंपन्यांमध्ये जवळपास ४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. अॅपेक्स अॅक्टसॉफ्ट कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची निवड होण्यामागे प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. मोहन गोसावी, समन्वयक प्रा. स्नेहल मांगले, प्रा. आशिष सुवारे यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले.

संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉ. महेश भागवत  यांनी निवड झालेले विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक  यांचे विशेष अभिनंदन केले.











Saturday, August 15, 2020

“कोविड – १९ प्रॉडक्ट आयडियाथॉन” या स्पर्धेमध्ये राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या प्रतिक महाडिकचे यश

 देवरुख : दि०९/०८/२०२०

नुकत्याच रत्नागिरी येथे झालेल्या “कोविड – १९ प्रॉडक्ट आयडियाथॉन” या स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा  विद्यार्थी प्रतिक महाडिक याने पदवी व पदव्युत्तर गटात विजेतेपद पटकाविले आहे.

सध्या संपूर्ण जग कोविड – १९ महामारीच्या संकटाने त्रस्त आहे. यामध्ये वापरण्यात येणारी अनेक प्रचलित उत्पादने व उपचार पद्धती तितक्याशा उपयोगी ठरताना दिसत नाहीत. त्यामुळे या संकटातील अडचणींवर मात करता येईल अशा आयडिया व त्याआधारित उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी विविध गटातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये वरील गटात महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅँड टेलीकम्युनिकेशन  शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी प्रतिक महाडिक याने सादर केलेल्या रोबो कार्टला प्रथम क्रमांक देण्यात आला.

ही एक बॅटरीवर चालणारी कार्ट असून त्याद्वारे ३० मीटरपर्यंत आणि जवळपास ५० किलो पर्यंतच्या वजनाची सामग्रीची ने आण करणे शक्य होतेरिमोट कंट्रोलने चालणाऱ्या या कार्टचा रुग्णांना अन्न व औषधी देण्याचे काम करताना प्रत्यक्ष वापर करता येऊ शकेल व त्यायोगे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क टाळून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता मिळते.

फिनोलेक्स अकॅडेमी रत्नागिरी तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रतिक महाडिक यास प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्राइसाक शिकलगार यांचे याकामी त्याला मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेतील यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष  माजी पालकमंत्री श्रीरवींद्रजी माने , कार्याध्यक्षा सौनेहा माने ,  प्राचार्य डॉ.  महेश भागवत यांनी अभिनंदन केले आहे



Wednesday, August 7, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकीचे एनपीटीइएलमध्ये यश

राजेंद्र माने अभियांत्रिकीचे एनपीटीइएलमध्ये यश

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय आणि आयआयटीतर्फे घेतल्या जाणा-या स्वयम (एनपीटीइएल) लोकल चॅप्टर
उपक्रमांतर्गत आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामधील विविध शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या
विषयांमधील ऑनलाईन कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केले.
जानेवारी ते एप्रिल २०१९ पर्यंत घेतलेल्या ऑनलाईन कोर्समध्ये महाविद्यालयाच्या ११ प्राध्यापक व ९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
यामध्ये कॉम्पुटर विभागातील रफिक गडकरी व पूजा शेळके यांनी सुवर्ण, डॉ. राहुल दंडगे, प्रा. पूनम क्षीरसागर, श्रुती तिखे व दत्तात्रय
करकरे यांनी रौप्य श्रेणी मध्ये तर इतर ९ जणांनी विशेष प्रविण्याण्यासह यश संपादन केले आहे.
जुलै ते डिसेंबर २०१८ च्या सत्रामध्ये महाविद्यालयाच्या एकूण ४८ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एनपीटीइएलचे विविध विषयातील
ऑनलाईन कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यामध्ये प्रा. मुश्ताक गडकरी व प्रा. आशिष सुवारे हे सुवर्ण श्रेणीमध्ये अव्वल ठरले. तर प्रा.
पूनम क्षीरसागर यांनी रौप्य श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकाविले. प्रा. सुदर्शन जाधव, प्रा. गीतांजली सावंत, प्रा. सुरेश कोळेकर, प्रा.
शहाजी देठे, केतन चव्हाण, आशुतोष गावडे, प्रीती सालीम, पल्लवी निवळकर, राज सुर्वे, अभी मेस्त्री यांनीही रौप्य पदक मिळविले.
इतर १५ जणांनी विशेष प्राविण्यासह कोर्स पूर्ण केला.
महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन कोर्स फार उपयुक्त ठरत असून त्यासाठी सर्वाना प्रोत्साहित करण्यात येते.
यासाठी महाविद्यामध्ये स्वतंत्र सेल देखील स्थापन करण्यात आला आहे. सर्व यशस्वी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. महेश भागवत व सर्व विभागप्रमुखांनी अभिनंदन केले आहे.
फोटो: यशस्वी प्राध्यापक व विद्यार्थी











राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात मुंबई विद्यापिठाचा ५२ वा युवा महोत्सव उत्साहात संपन्न

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात मुंबई विद्यापिठाचा ५२ वा युवा महोत्सव

उत्साहात संपन्न

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाचा ५2 वा युवा महोत्सव अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी, मुंबई विद्यापीठाचे अधिकारी,महाराष्ट्राच्या कला व सांस्कुतिक क्षेत्रातील नामवंत अभिनेते व कलाकार, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या महोत्सवाने महाविद्यालयाचे संपूर्ण वातावरण चैतन्यमय बनून गेले होते.
महोत्सवाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर विद्यापीठ गीत गायन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव दिलीप जाधव, प्राचार्य डॉ. महेश भागवत, मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. निलेश सावे, जिल्हा समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, प्रा. महेश देशमुख, तसेच परीक्षक उपेंद्र दाते, दिगंबर राणे, राहुल वैद्य, प्रणीत मावळे उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे संस्थेतर्फे यथोचित स्वागत करणेत आले.
यानंतर प्रास्ताविक करताना प्रा. आंबेकर म्हणाले कि, युवा महोत्सव हा स्पर्धा व व्यवस्थापन यांचा संगम असून यामध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असते. सर्व स्पर्धक व त्यांच्या मार्गदर्शकांचे त्यांनी यावेळी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या भाषणात महाविद्यालातर्फे सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या महोत्सवामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय
वाढत असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. प्रा. सावे यांनी हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी वेगळी पर्वणी असून सर्वागीण विकास घडविणारा उपक्रम असल्याचे सांगून आयोजकांचे विशेष आभार मानले. प्रा. देशमुख यांनी हा महोत्सव कला व सांस्कृतिक क्षेत्रात दिग्गज घडविणारा असल्याचे सांगितले.
मा. माने साहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले कि, हे महाविदयालय आपल्या मागील २१ वर्षांच्या यशस्वी वाटचालीतून व अशा महोत्सवाच्या आयोजनातून विशेषत: कोकणातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नरत आहे. भाषणाच्या शेवटी सर्वाना सुयश मिळावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. शेवटी महाविदयालय समन्वयक प्रा. गणेश जागुष्टे यांनी आभार प्रदर्शन केले.
त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सहभागी स्पर्धकांच्याशास्त्रीय नृत्य, स्केचीग, पेंटिंग, क्ले मॉडेलिंग, कोलाज, मेहंदी, रांगोळी, कथाकथन, एकपात्री नाटक, हास्यप्रधान कथानक, वक्तृत्व यासारख्या १५ विवीध कला व सांस्कृतिक प्रकारांच्या प्राथमिक फेरीतील स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये दक्षिण रत्नागीरीया प्रादेशिक विभागातील लांजा, राजापूर, रत्नागीरी, संगमेश्वर या चार तालुक्यातील १७ महाविद्यालयामधून जवळपास ४७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व स्पर्धांचे परीक्षण विद्यापीठ नियुक्त परीक्षकांनी केले. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते प्रदीप कबरे, संजय क्षेमकल्याणी, हेमंत भालेकर, उपेद्र दाते, दिग्दर्शक दिगंबर राणे, नृत्य दिग्दर्शक देवेंद्र शेलार, तसेच दीपक बिडकर, विजय जाधव, हनुमंता रवाडे, प्रकाश राजेशिर्के, मनोज भडांगे, समीर बुटाला, प्रकाश नारकर, रवींद्र सोमोशी यासारख्या टेलेव्हिजनच्या विविध वाहिन्यांवरील मालिका व कार्यक्रमामधील अभिनेते व कलाकारांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

- महाराष्ट्राच्या कला व सांस्कुतिक क्षेत्रातील नामवंत अभिनेते,गायक व कलाकारांची परीक्षक म्हणून उपस्थिती
- १७ महाविद्यालयातील जवळपास ४७० विद्यार्थ्यांचा सहभाग सायंकाळच्या शेवटच्या सत्रात, महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात, दिव्यांच्या प्रकाशझोतात व सर्वांच्या उपस्थितीत तरुणाईच्या
आवडत्या अशा लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सहभागी विद्यार्थी गटांनी विविध लोकगीतांवर बहारदार व मनमोहक नृत्ये सदर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
यानंतर झालेल्या समारोपप्रसंगी मा. माने साहेब व विद्यापीठाच्या पदाधिका-यांच्या हस्ते सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात केली. तसेच इतर विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. गोगटे जोगळेकर महाविदयालय रत्नागीरीच्या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त विजेतेपदांसह विभागीय जेतेपद पटकाविले. देवरूखच्या आठल्ये सप्रे महाविदयालयाने एकूण दहा तर फिनोलेक्स अकॅडेमी व भारत शिक्षण मंडळ वरिष्ठ महावियालयाने एकूण आठ, लांजा महाविद्यालयाने एकूण पाच
प्रकारामध्ये यश मिळविले.
राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या सिद्धेश शेट्येने क्ले मोडेलिंग मध्ये प्रथम, मिमिक्री व वकृत्वमध्ये ओमकार कुलकर्णीने अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळविला तर कौस्तुभ आंबेकरने कार्टुनिंग मध्ये तृतीय क्रमांक मिळविला.विद्यापीठाच्या पदाधिका-यानी महाविद्यालयाचा परिसर रमणीय व निसर्गरम्य असल्याचे यावेळी नमूद केले तसेच महाविद्यालयाने केलेल्या या महोत्सवाच्या उत्तम नियोजनाबद्दल महाविदयालय व्यवस्थापन, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी प्रतिनिधींचे आभार मानले.मा. माने साहेबांनी आजचा भारत हा तरुणाईचा देश असल्याचे आज खंरोखरीच अनुभवल्याचे सांगून अशा कार्यक्रमांसाठी
महाविदयालय यापुढेही सहकार्य करेल असे सांगितले. महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. गणेश जागुष्टे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी महोत्सवाच्या
यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ओमकार कुलकर्णी याने महोत्सवाचा विद्यार्थी समन्वयक म्हणून काम पहिले.

फोटो:
1. मा. रविन्द्रजी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत व मान्यवर परीक्षकांसमवेत विद्यार्थी
2. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. रविन्द्रजी माने, समवेत डावीकडून प्राचार्य डॉ. महेश भागवत, सहसचिव
दिलीप जाधव, प्रा. आनंद आंबेकर, प्रा. निलेश सावे, प्रा. महेश देशमुख (पाठीमागील रांगेत परीक्षक)
3. युवा महोत्सवाच्या लोकनृत्य स्पर्धेमधील एक प्रसंग




Friday, July 19, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकीची टीम MH-08 रेसिंग युके ला रवाना अभियांत्रिकी डीझाइन इव्हेंट (फॉर्मुला स्टूडंट २०१९) स्पर्धेमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व


रत्नागिरी जिल्ह्यातील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविदयालयाची टीम एम एच ०८ रेसिंग नुकतीच सिल्वरस्टोन सर्किट, युके ला रवाना झाली आहे. अभियांत्रिकी डीझाइन इव्हेंट म्हणजेच फॉर्मुला स्टूडंट २०१९ या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या या  टीममध्ये एकूण बारा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  
इंग्लंड येथे होणा-या जगातील सर्वात प्रतिष्ठीत अभियांत्रिकी डीझाइन इव्हेंट म्हणजेच फॉर्मुला स्टूडंट २०१९ या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या या टीमची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण कामगिरी बजावत या टीमने महाविद्यालयाच्या व राष्ट्राच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
सन १९९८ पासून कार्यरत असणा-या आय मेक फॉर्मुला स्टूडंट या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारा आयोजित होणा-या फॉर्मुला स्टूडंट इव्हेंट मध्ये दरवर्षी शेकडो दिग्गज आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सहभागी होतात. ही स्पर्धा फॉर्मुला १ दुनियेमधील बहुचर्चित असणा-या सिल्वरस्टोन सर्किट, युके येथे घेतली जाते. या स्पर्धेत निवड होण्यासाठी विशेष चाचण्या घेतल्या जातात. या चाचणीमध्ये कमालीचे यश मिळवत या टीमने भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त केली आहे.
कोकणातील या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सलग ४ वर्षांपासून अत्युच्च क्षमतेच्या फॉर्मुला स्टूडंट रेस कारची निर्मिती करीत आहेत. या टीमने सलग दोनवेळा बेस्ट डिझाईन रेस कार ऑफ इंडियाकिताब पटकावून राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर या रेस कारची निर्मिती केली आहे.
संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने, कार्यकारी अध्यक्ष सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत यानी तसेच तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी टीमचा कप्तान प्रणीत वाटवे व इतर सर्व टीम सदस्यांना स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो: स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेली कार सोबत टीम MH-08 रेसिंग



राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षेत सुयश

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रम पदवीच्या अंतिम परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी यंदाही कायम राखली आहे.
महाविद्यालयाच्या पाच विभागांपैकी ऑटोमोबाईल विभागाचा अदनान होडेकर याने ८.७६ पॅाइंट मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर चिन्मय तेंडूलकर व दत्तप्रसाद भूरवणे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. या शाखेचा निकाल ९४.८३ टक्के इतका लागला आहे.
महाविद्यालयाच्या संगणक विभागाचा एकूण निकाल ७५.६८ टक्के लागला असून त्यामध्ये सानिया हर्चीरकर हिने ७.८६ पॅाइंटसह प्रथम येण्याचा मान मिळवला. तर स्वप्नाली कांगणे व सलीना बोदले या विद्यार्थीनिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त  केले.
मेकॅनिकल विभागामधून तौसीफ मापारी याने ९.०५ पॅाइंटसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर अरबाझ नाकाडे व करिष्मा कदम यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला आहे. या शाखेचा एकत्रित निकाल ९३.२४ टक्के आहे.
अणूविद्युत व दूरसंचार शाखेचा विद्यापीठाचा निकाल ९०.२४ टक्के आहे तर महाविद्यालयाचा निकाल ९४.७४ टक्के लागला आहे. या शाखेमधील जागृती काटे ही ९.०१ पॅाइंटसह  महाविद्यालयात प्रथम आली आहे. या शाखेतील चिन्मय शिंदे व ईश्वरी नाईक यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय  क्रमांक प्राप्त केला.
महाविद्यालयाच्या एम एम एस या पदव्युत्तर अभ्यासक्रम शाखेचा निकाल ८३.७२ असून सुमित आंब्रे हा विद्यार्थी ९.३३ पॅाइंटसह  महाविद्यालयात प्रथम आला आहे. तर भक्ती कुलकर्णी व वैभव गवंडी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय  क्रमांक प्राप्त केला.
महाविद्यालयाच्या सर्व शाखांमधून   २६९  विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३४  विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर  १०१   विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थाध्यक्ष मा. श्री. रवींद्र माने, कार्याध्यक्ष सौ. नेहा माने, जान्हवी माने, उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे, सचिव श्री. चंद्रकांत यादव, सहसचिव श्री. दिलीप जाधव, प्राचार्य डॉ. महेश भागवत, परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी व प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे