Tuesday, August 30, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात निसर्ग सहलीचे आयोजन!!

देवरुख: अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांची निसर्गासोबत असलेली नाळ तुटू नये आणि त्यांच्यात निसर्गासोबत आत्मियता निर्माण व्हावी या उदात्त हेतूने राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील नेचर क्लब तर्फे विद्यार्थ्यांसाठी निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले.
  “ एक दिवस - निसर्गाच्या सानिध्यात ” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना नेचर क्लब तर्फे विशाळगड महादरवाजा,अहिल्याबाई होळकर समाधी,वाघदरा,बर्की धबधबा हि  निसर्ग सहल आयोजित करण्यात आली.सदर सहलीमध्ये ५५ विद्यार्थ्यांसह तीन प्राध्यापक सहभागी झाले होते.
  या  निसर्ग सहलीचा उद्देश स्पष्ट करताना नेचर क्लबचे इनचार्ज व सहल समन्वयक प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी शिवरायांच्या पराक्रमाने पवित्र झालेल्या व बाजी प्रभूंच्या रक्ताने पावन झालेल्या विशाळगड व पावनखिंडीची माहिती दिली. गड किल्ले,ऐतिहासिक ठिकाणांची माहिती व प्रत्यक्ष दर्शन तसेच निसर्गाच्या सानिध्यात चार निवांत क्षण व्यतीत करत असतानाच निसर्गाची उपयुक्तता विद्यार्थ्यांना जाणवावी या उद्देशाने नेचर क्लब कार्यरत आहे.
  आजपर्यंत निसर्ग सहलीचे बरेचसे उपक्रम या क्लब तर्फे करण्यात आले असून वृक्षारोपणासारख्या सामाजिक बांधिलकीचे उपक्रमही पार पडलेले आहेत.या  निसर्ग सहलीमध्ये विद्यार्थ्यांना विशाळगड महादरवाजा,अहिल्याबाई होळकर समाधी,वाघदरा,बर्की धबधबा, महादेव मंदिर ,राजवाडा, मलिक रेहान दर्गा, पावनखिंड इ. ठिकाणांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.

  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत यांच्या प्रोत्साहनातून पार पडलेलता या निसर्ग सहलीमध्ये समन्वयक प्रा. मंगेश प्रभावळकर तसेच  प्रा. राहुल पोवार, प्रा. माणिक पवार सहभागी झाले होते.सहल अविस्मारणीय बनवण्यासाठी हर्शल मोचेमाडकर,सुशांत धारवट,योगिता ढमके,मनीष वारणे,अनिकेत लाखण,हर्षाली,अक्षता,स्वराज सावंत यांनी परिश्रम घेतले. 

Thursday, August 25, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘‘रेन वॉटर हार्वेस्टिंगवर’’ व्याख्यान !!



फोटो:- “ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाची उपयुक्तता” या विषयावर व्याख्यान देताना जलवर्धिनी या अशासकीय सामाजिक संस्थेचे श्री.उल्हास परांजपे

देवरुख वार्ताहर:
  महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्यामध्ये मानवाचाही वाटा आहे पण हा दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यासाठीही आपण खारीचा वाटा कसा उचलू शकतो हे समजून घेणे उपयुक्त ठरेल.कमी अधिक प्रमाणात पाऊस सर्वत्र पडतो पण हा सर्वत्र पडणारा पाऊस बहुतांशीवेळी वाया जातो. म्हणूनच उपलब्ध पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संधारण याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.अशा प्रकारच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.निमित्त होते ते प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडलेल्या एकदिवशीय कार्यशाळेचे!
  “ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाची उपयुक्तता” याविषयावर पार पडलेल्या या कार्यशाळेत उपहारानंतरच्या सत्रामध्ये व्याख्यान देताना जलवर्धिनी या अशासकीय सामाजिक संस्थेचे श्री.उल्हास परांजपे यांनी हे मत व्यक्त केले.व्याख्यानासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा सौ.नेहाजी माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते.सुरवातीला प्राचार्य डॉ.भागवत यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली.
   आपल्या व्याख्यानामध्ये श्री. परांजपे यांनी शास्त्रीयदृष्ट्या पावसाच्या पाण्याचे संधारण या संदर्भात माहिती देताना पावसाचे पाणी गोळा करणे,साठवणे,जमिनीखालील पाण्याच्या साठ्याची पातळी वाढवणे यासारख्या असंख्य मुद्द्यांचा परामर्श घेतला. तसेच त्यांनी उपेक्षित असलेल्या अत्यंत कमी खर्चिक फेरोसिमेंटिंग तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण विकासासाठी जास्तीत जास्त कसा करता येऊ शकतो यासंदर्भात मार्गदर्शन केले व या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मूर्त स्वरुपात साकारलेल्या विविध प्रकल्पांचीही छायाचित्रांसह माहिती दिली.

  राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास करून जलसंधारणाबाबत त्यांनी सुयोग्य मार्गदर्शन केले व कृती आराखडाही तयार करून दिला. व्याख्यात्यांचे आभार व्यक्त करताना प्राचार्य डॉ.भागवत यांनी श्री.परांजपे यांच्या ज्ञानाचा उपयोग करून महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे काही प्रकल्प सामाजिक उपयोगितेचे भान ठेवून करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.भोपळे सर,प्रा.डिके व प्रा.भंडारी यांचे सहकार्य लाभले.

Wednesday, August 17, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी मध्ये श्री.रविंद्र माने यांचा वाढदिवस साजरा





 आंबव येथील प्रथितयश प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचा १८ वा वर्धापनदिन व संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री श्री.रविंद्र माने यांचा ५८ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  या प्रसंगी  व्यासपीठावर संस्थाध्यक्ष श्री. रविंद्र माने यांचेसह कार्याध्यक्षा सौ.नेहा माने, सचिव श्री. चंद्रकांत यादव,सहसचिव श्री.दिलीप जाधव, संचालिका जान्हवी माने,प्रद्युम्न माने, सौ.जयश्री दळवी, प्राचार्य डॉ. महेश भागवत,माजी प्राचार्य डॉ. सुरेंद्र कुमार, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.सुहास पाटील, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांतर्फे शुभेच्छा दिल्या.यानंतर माजी प्राचार्य डॉ. सुरेंद्र कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून साहेबांच्या हस्ते केक कापण्यात आला.शुभेच्छाला उत्तर देताना श्री. रविंद्र माने हा आपल्या आयुष्यातील भावनाप्रधान दिवस असल्याचे सांगितले.आपल्या माणसांच्या शुभेच्छांच्या जोरावर संस्थेची प्रगती होत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
  या प्रसंगी राजेंद्र माने तंत्रनिकेतनचे प्रा.वाकडे यांच्या “स्माईल विथ लाईफ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व नेचर क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे श्री.सत्यनारायण महापुजा प्रा. कोळेकर नवदांपत्याच्या हस्ते करण्यात आली. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.

  श्री. गोसावी सर,भोम यांनी श्री.रविंद्र माने यांची रेखाटलेली रांगोळी यावर्षी उपस्थितांमध्ये लक्षवेधी धरली . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.मनोज सादळे यांनी केले.

Monday, July 25, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “इंडस्ट्रीयल ऑटोमेशन प्रोडक्ट” वर कार्यशाळा संपन्न !!




देवरुख: आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  अणुविद्युत व दूरसंचार विभागातर्फे “इंडस्ट्रीयल ऑटोमेशन प्रोडक्ट” या विषयांतर्गत नुकतीच एका आठवड्याची कार्यशाळा संपन्न झाली.हि कार्यशाळा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली व त्याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.
  कार्याशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, विभागप्रमुख प्रा.सुनिल अडूरे,कार्यशाळा समन्वयक प्रा. अजित तातुगडे तसेच विभागातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.याप्रसंगी कार्यशाळा समन्वयक प्रा. अजित तातुगडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेचा उद्देश विभागप्रमुख प्रा. सुनिल अडूरे यांनी विषद केला. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितले की नवीन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते. अशा कार्यशाळांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले कौशल्य वाढवावे असे आवाहन त्यांनी केले.
    या कार्याशाळेला श्री.रमेश वाकचौरे(सिनिअर प्रोजेक्ट इंजीनिअर,प्रोलिफिक सिस्टिम्स अॅण्ड टेक्नॉलॉजी प्रा.लि.,पुणे) व इतर तीन सहाय्यक तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.हि कार्यशाळा “इंडस्ट्रीयल ऑटोमेशन प्रोडक्ट-अॅलन ब्रॅडली पिएलसी सिस्टिम्स व स्काडा सॉफ्टवेअर” विषयाचे सखोल ज्ञान,त्याची व्याप्ती विद्यार्थ्यांना समजावी तसेच त्याविषयीच्या कौशल्याची त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित केली होती. कार्याशाळेमध्ये प्रात्यक्षिक करण्यावर जास्त भर देण्यात आला.
  या कार्याशाळेमध्ये पिएलसी प्रोग्रॅमिंग लॉजिक द्वारे एखादे ऑटोमेशन प्रोडक्ट/मोडेल कसे बनवावे, स्काडा सॉफ्टवेअर वापरून एखादे डिव्हाइस कसे जोडावे तसेच पिएलसीचे ट्रबलशुटींग व डायग्नोसीस कसे करावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी केले. त्यामुळे या साधनांचा प्रत्यक्ष वापर करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
  एका आठवड्याच्या कार्यशाळेनंतर सदर कार्यशाळेचा समारोप सोहळा पार पडला.याप्रसंगी कार्यशाळा मार्गदर्शक श्री.रमेश वाकचौरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांप्रती गौरवोद्गार काढले. आभारप्रदर्शन कार्यशाळा समन्वयक प्रा. अजित तातुगडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यशाळा समन्वयक प्रा. अजित तातुगडे,विभागप्रमुख प्रा.सुनिल अडूरे व अन्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Saturday, April 30, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ संपन्न !!!

देवरुख वार्ताहर
    आंबव-देवरुख येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ नुकताच महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ. नेहाजी माने, विश्वस्त श्री.दिलीप जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
   याप्रसंगी विविध विभागाच्या विद्यार्थी प्रातिनिधींनी आपले ह्द्य मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचा त्यांच्या जडणघडणीत  असलेल्या महत्वाच्या वाट्याचा विशेषत्वाने उल्लेख केला.विविध विभागप्रमुखांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
   याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये या उपक्रमांचे महत्व विषद केले. गेट परीक्षेत मिळालेले विशेष प्राविण्य तसेच नामांकित इंडस्ट्रीजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट द्वारे विद्यार्थ्यांची झालेली निवड यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.रविंद्रजी माने यांनी विद्यार्थ्यांना जिद्द बाळगण्याचे आवाहन केले.
   अभियंता झाल्यानंतर आपण आपल्या समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेऊन विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपले कर्तव्य बजावयास हवे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग हा आपल्या देशासाठी  करावयास हवा. महाविद्यालयातील प्लेसमेंट बद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल प्राचार्यांचे विशेष अभिनंदन केले.
  यावर्षी पहिल्यांदाच गेट परीक्षेमध्ये महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तर प्लेसमेंटमधील ब-याच आव्हानांचा सामना खाजगी महाविद्यालये करत असताना देखील या महाविद्यालयातून १३ विद्यार्थ्यांची  नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे याप्रसंगी व्यवस्थापनाकडून कौतुक करण्यात आले.

  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा.गणेश जागुष्टे, प्रा.राहुल राजोपाध्ये, प्रा.मंगेश गोसावी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सादळे यांनी केले.


गेट परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या सात विद्यार्थ्यांसमवेत संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ. नेहाजी माने, विश्वस्त श्री.दिलीप जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत


नामांकित इंडस्ट्रीजमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झालेल्या तेरा विद्यार्थ्यांसमवेत संस्थाध्यक्ष मा.श्री.रविंद्रजी माने, कार्याध्यक्षा सौ. नेहाजी माने, विश्वस्त श्री.दिलीप जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच ट्रेनिंग-प्लेसमेंट इंचार्ज प्रा.अतुल यादव

Wednesday, April 6, 2016

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “क्लाउड कॉम्प्युटिंग” विषयावर कार्यशाळा संपन्न!!


देवरुख: राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागामध्ये “दोन दिवसांची “क्लाउड कॉम्प्युटिंग”वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील गिक्स लॅबचे तज्ञ प्रशिक्षक श्री. मिथीलेश पांडे यांचेसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत,विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण नाईक, समन्वयक प्रा.विकास मोरे,सह समन्वयक प्रा.मनिष प्रभू उपस्थित होते.
   कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा.विकास मोरे यांनी कार्यशाळेची उपयुक्तता विषद केली. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.महेश भागवत यांनी गिक्स लॅब बरोबर महाविद्यालयाने केलेल्या सामंजस्य कराराची माहिती देऊन विद्यार्थ्यांना या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
  लोकल सर्व्हर किंवा वैयक्तिक संगणकामध्ये माहितीचा साठा, संकलन किंवा प्रक्रिया करण्यापेक्षा याच गोष्टी क्लाउड कॉम्प्युटिंगद्वारे इन्टरनेटच्या महाजालामध्ये स्थापित रिमोट सर्व्हरच्या माध्यमातून करता येऊ शकतात.या संदर्भातील अशा सुविधा पुरवणारे प्रोव्हायडरस्,त्यांची इत्यंभूत माहिती या कार्याशाळेमध्ये  देण्यात आली.
  या कार्याशाळेचा लाभ द्वितीय व तृतीय वर्षाच्या ३६ विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन महाविद्यालयातर्फे नेहमीच करण्यात येते.

   हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी  प्रा.विकास मोरे, प्रा.मनिष प्रभू,प्रा. मंगेश गोसावी,संकेत गडदे,संतोष पाटील यांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.विकास मोरे यांनी केले.

Thursday, March 24, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेत सुयश !!



राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेत सुयश !!
 भरत देवरुखकर               दिगंबर मोहिते                मनोज ढेबे                ओंकार गोमले
 

 



सुभाषचंद्र जोशी                     झिलू राणे                      अभय गावडे
 आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी व संगणक विभागाच्या सात विद्यार्थ्यांनी तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक यांनी २०१६ च्या अभियांत्रिकी “गेट” परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवले. अभियांत्रिकीमधल्या उच्च शिक्षणाकरीता प्रवेश परीक्षा म्हणून दरवर्षी “गेट” परीक्षा आयोजित करण्यात येते. अभियांत्रिकीमधिल उच्च काठीण्य पातळी असलेल्या या परीक्षेसाठी देशभरातून अभियांत्रिकीचे विद्यार्थी आपले ज्ञानकौशल्य आजमावतात.
 या वर्षी झालेल्या या परीक्षेमध्ये  माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रा. एस.एस. कोळेकर, यांत्रिकी विभागातून भरत देवरुखकर,ओंकार गोमले,मनोज ढेबे,दिगंबर मोहिते तसेच संगणक विभागातून झिलू राणे, सुभाषचंद्र जोशी व अभय गावडे या  विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले.
 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी
‘गेट फोरम’ स्थापन करण्यात आले होते. या गेट फोरमच्या  मार्गदर्शनाचा उपरोक्त विद्यार्थ्यांना फायदा झाला.या परीक्षेतील उज्वल यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री.रवींद्रजी माने यांनी कौतुक व्यक्त करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आनंद व्यक्त करून भविष्यातही महाविद्यालयामध्ये गेट फोरम सारखे उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. यांत्रिकी विभागप्रमुख
प्रा. श्री. संजय भंडारी, संगणक विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण नाईक  यांचे प्रोत्साहन व गेट फोरमचे
प्रा. श्री.शैलेश खांडेकर व प्रा.जी.एन.सावंत यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.