Tuesday, February 16, 2016

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “एक्सप्लोर 2k16” चे भव्य आयोजन!!

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात एक्सप्लोर 2k16 चे भव्य आयोजन!!

 व्यासपीठावर संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुखटणकरराजेंद्र माने            अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश भागवत तसेच विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी
 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे  एक्सप्लोर 2k16 चे आयोजन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने,गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुखटणकरराजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवत तसेच विभागप्रमुख प्रा. महावीर साळवी उपस्थित होते.
  याप्रसंगी प्रा. साळवी यांनी स्वागतपर भाषणामध्ये उपक्रम आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉमहेश भागवतयांनी अशा उपक्रमातून सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला हातभार लागतो आणि  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीच हे व्यासपीठ असल्याचे सांगितले.प्रमुख पाहुणे डॉ.सुखटणकर यांनी ओसाड रानामध्ये महाविद्यालयाच्या रूपाने नंदनवन फुलवण्याच्या माने साहेबांच्या कर्तृत्व शैलीचे विवेचन करून विद्यार्थ्यांना पदवीनंतरच्या आयुष्याबाबत मार्गदर्शन केले.बाहेरच्या जगात मार्क्स आणि पदवी याबरोबरच विद्यार्थ्यांकडे नाविन्यपूर्ण विचार हवेत.त्यांनी विद्यार्थ्यांना असेही सांगितले की तुमच्या ज्ञानाचा उपयोग हा समाजातील घटकांना उपयोगी ठरावयास हवा .
  संस्थाध्यक्ष श्री. रवींद्र माने यांनी सांगितले की आयुष्याची जडण घडण होण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असते, इच्छा असेल तर या जगात काहीच अशक्य नाही. श्री. रवींद्र माने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले आत्मविश्वास असलेले व आत्मविश्वास नसलेले तसेच गोंधळलेले या तीन प्रकारामध्ये गोंधळलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मनाशी निर्धार करावयास हवा.
  दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात अॅड मॅड जुनून,बिझनेस प्लॅनबिझनेस क्विझ,रंगोली, बेस्ट आउट ऑफ वेस्ट,फोटोग्राफी,फेस पेंटिंग यासारख्या स्पर्धांचा समावेश होता. या युवा महोत्सवात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५० स्पर्धक सहभागी झाले होते.या उपक्रमाला देवरुख येथील ‘प्रॉपर्टी इन कोकण’ मुख्य प्रायोजक होते.
  यामध्ये सर्वसाधारण विजेतेपद बी.एच.बाईंग महाविद्यालय शिपोशीच्या स्पर्धक समुहाने पटकावले.बक्षीस वितरण प्रॉपर्टी इन कोकण चे श्री.गणेश खामकर, डॉ. एस.आर.भोसले यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा.सिद्धार्थ पाटील,प्रा.रोहित माळगी, प्रा.हर्षदा दुतोंडकर यांनी नियोजन केले.



Monday, February 15, 2016

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या “आरोहन २०१६” चे शानदार उदघाटन !!

राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या आरोहन  २०१६ चे शानदार उदघाटन !!
 प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आरोहन २०१६या    वार्षिक कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उदघाटन करण्यात आले. संस्थाध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री. रवींद्रजी माने यांच्या शुभहस्ते पार पडलेल्या या उदघाटन प्रसंगी  संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉमहेश भागवत, महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, आरोहनचे क्रीडा समन्वयक प्रा. सचिन वाघमारे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. प्रल्हाद गमरे व्यासपीठावर उपस्थित होते.
  महोत्सवाची सुरुवात इशस्तवनाच्या  मंगल सुरांमध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे महाविद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आरोहनची क्रीडाज्योत श्री कालीश्री मंदिरात प्रज्वलित करून मिरवणुकीने क्रीडांगणामध्ये आणण्यात आली.  या क्रीडाज्योतीची मा. श्री. रवींद्रजी माने यांच्या हस्ते क्रीडांगणामध्ये स्थापना करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विभागवार सुरेख व शिस्तबद्ध संचालन करून मान्यवरांना मानवंदना दिली. याप्रसंगी विद्यार्थी क्रीडाप्रमुखाने  सहभागी विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्ती व निष्ठेची शपथ दिली
  प्राचार्य डॉमहेश भागवत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना खेळामध्ये खिलाडूवृत्तीचे महत्त्व विषद केले व पुढील दहा दिवस चालणा-या विविध  कला व क्रीडा प्रकारांमधील स्पर्धांमध्ये त्याची जोपासना करावी असे सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना या वार्षिक महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले की संचालनासारखी शिस्त ही सर्व स्पर्धांमध्ये आवश्यक आहे.इंजिनियरिंगचे विद्यार्थी आज इतरही क्षेत्रात चमकताना दिसत आहेत त्याचप्रमाणे आपल्यामहाविद्यालयाचे विद्यार्थीही इतर क्षेत्रात आपले ज्ञान व कौशल्य वापरून स्वत:चा व समाजाचा उत्कर्ष घडवू शकतात.
  या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या संचलन प्रकारचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यामध्ये ऑटोमोबाईल प्रथम,मेकॅनिकल द्वितीय व कॉम्प्युटर विभागाने तृतीय क्रमांक पटकाविला.या क्रीडाप्रकाराचे परीक्षण प्रा.काळे यांनी केले.२१ फेब्रुवारी पर्यंत चालणा-या या महोत्सवामध्ये क्रिकेट,व्हॉलीबॉल,फुटबॉल,टेनिस यांसारख्या मैदानी खेळांबरोबरच कॅरम,पेंटिंग,कविता लेखन,व्यंगचित्रकला यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश असणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी केतन चव्हाण व अनुजा बांदे यांनी केले. क्रीडा विभागप्रमुख प्रा. सचिन वाघमारे यांनी मान्यवर व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Sunday, February 7, 2016

माने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी फुलवले आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य !

माने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी फुलवले आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या
चेह-यावर हास्य ! 


 कुतूहल मिश्रित नजरा, चेह-यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि या आनंदमिश्रित हास्यात तरळणारे निरागस भाव, भावनांच्या या हिंदोळ्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या मनाचाही ठाव घेतला. निमित्त होते ते निवे येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे.आंबव येथील राजेंद्र  माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी आज एक वेगळेच भावनाविश्व अनुभवले.आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना या मुलांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि अशातच नवरात्रीसारख्या काही कार्यक्रमातून शिल्लक ठेवलेल्या पैशाचा विनियोग समाजोपयोगी कार्यासाठी व्हावा अशी अपेक्षा विभागप्रमुख प्रा.निमेष ढोले यांनी व्यक्त केल्यानंतर ऑटोट्रेंडस या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून इनचार्ज प्रा. राहुल राजोपाध्ये व विभागप्रमुख प्रा.निमेष ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी या कार्याला मूर्त स्वरूप दिले.
  निवे येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना या प्रसंगी त्यांना उपयुक्त  ठरेल असे शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.या प्रसंगी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. यु.बी. चव्हाण, विभागप्रमुख प्रा.निमेष ढोले, विद्यार्थी संघाचे प्रमुख प्रा. राहुल राजोपाध्ये, प्रा.सुमित सुर्वे, प्रा.अमोल यादव,श्री. रोहित मुरकर उपस्थित होते.

  विद्यार्थ्यांच्या चेह-यावर शैक्षणिक साहित्य स्विकारताना जितका आनंद दिसत होता त्यापेक्षा जास्त आनंद अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या चेह-यावर दिसत होता. या प्रसंगी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रा. ढोले यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास करून मोठे होण्याचा सल्ला दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोमनाथ पाटील, सौरभ सुर्वे, रुपेश बाबर, आनंद हातपक्की यांचे सहकार्य लाभले.