Wednesday, March 23, 2016

माने महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत एक आठवडयाचे शिबीर संपन्न‼










  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत एक आठवडयाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. 

  विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार,बौद्धिकसंस्कार या गुणांची ओळख करून देऊन त्यांच्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एन.एस.एस. विभागाची स्थापना केली आहे. या अंतर्गत कष्टाची जाणीव विद्यार्थीदशेत होण्यासाठी श्रमदान संकल्पना रुजवली आहे. या शिबिरांतर्गत सकाळच्या सत्रामध्ये श्रमदानातून विविध समाजोपयोगी कामे करण्यात आली. यामध्ये आंबव येथे बंधारे बांधण्यात आले. त्याचप्रमाणे कालीश्री मंदिर,नागझरी,सिद्धेश्वर मंदिर,मारुती मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागझरी परिसरात पाण्याच्या स्त्रोतांची विशेष स्वच्छता करण्यात आली. 
 

   याचबरोबर निवे येथील प्राथमिक व माध्यमिक केंद्रीय आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या विविध संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच खाऊ वाटप करण्यात आले.दुपारच्या सत्रामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये अॅड.श्री.सोमण यांनी जमिनीविषयक आणि वाहनाविषयक कायदे तसेच प्रा.संजय भंडारी यांचे ‘भारत जोडो सायकल अभियान’ या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान झाले.तसेच अॅड. उमा प्रभावळकर यांनी ‘ महिला सबलीकरणाचे कायदे ’ या विषयावर आणि प्रा.प्रवीण जोशी यांनी ‘ ग्राहक संरक्षण कायदा ’ या विषयावर मार्गदर्शन केले.

   एक आठवडयाचे शिबीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.राहुल बेळेकर आणि सहसमन्वयक प्रा.गुरुप्रसाद बुर्शे यांनी उत्तमरित्या पार पाडले.याकरिता त्यांना प्रा.राहुल पोवार,प्रा.माणिक पवार तसेच समीर यादव,अक्षय दळवी,सत्यजित सपकाळ यांचे उत्तम सहकार्य लाभले.

Wednesday, March 16, 2016

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “सिंटीला 2k16”चे आयोजन!!

माने अभियांत्रिकी महाविद्यालयात सिंटीला 2k16चे आयोजन!!
  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात दि.१८ व १९ मार्च रोजी  सिंटीला 2k16 या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिषदेचे भव्य आयोजन होणार आहे.अभियांत्रिकीमधील या विज्ञान युगातील नवनवीन होणारे तांत्रिक बदल,त्यातील वैविध्यता व व्यापकता विद्यार्थ्यांना समजण्याची दूरदृष्टी निर्माण व्हावी हा या परिषदेमागचा उद्देश आहे. 
  दोन दिवस चालणा-या या परिषदेमध्ये “प्रबंध सादरीकरण व प्रकल्प सादरीकरण” या प्रमुख स्पर्धांबरोबरच ‘रोबोरेस,गेमिंग,प्रोग्रामिंग स्किल्स,टेक्निकल क्विझ तसेच ब्रिज बिल्डींग यासारख्या स्पर्धांचा समावेश असणार आहे. या परिषदेमहाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील सुमारे ४०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांकरता महाविद्यालयातच राहण्याची सोय करण्यात आली आहे. या परिषदेसाठी मलुष्टे प्रॉपर्टीस रत्नागिरी,प्रोलीफिक सिस्टिम्स पुणे,एसीसी सिमेंट वितरक श्री.रणजीत साने देवरुख,साईकृपा बिल्डर्स अॅंड कॉंट्रॅक्टर्स मुंबई,डीएम मॅनपॉवर सर्विसेस प्रा.लि.,वाशी,नवी मुंबई इ.मुख्य प्रायोजक आहेत.

Thursday, March 10, 2016

PCB workshop for EXTC Department

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात पिसीबी डिझाईनिंग वर कार्यशाळा संपन्न !!

  देवरुख : आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  अणुविद्युत व दूरसंचार विभागातर्फे पिसीबी डिझाईनिंग” या विषयांतर्गत नुकतीच दोन दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली. हि कार्यशाळा द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली व त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. एकूण ५3 विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.  
    या कार्याशाळेला कु.मेघानी कळसूलकर व कु.सायली राणे (एस्.एस्.ओ.आय.झेड. प्रा.लि.,पुणे) या तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. हि कार्यशाळा “पिसीबी डिझाईनिंग” विषयाचे सखोल ज्ञान,त्याची व्याप्ती विद्यार्थ्यांना समजावी तसेच त्याविषयीच्या कौशल्याची त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित केली होती.
  या कार्याशाळेमध्ये ‘प्रोटीस’ या सॉफ्टवेअर माध्यमाद्वारे विविध सर्किट्स बनवण्यावर भर देण्यात आला. यामध्ये पॉवर सप्लाय, फ्रिक्वेन्सी मीटर, डिसी मोटर इ. सर्किट्स विद्यार्थ्यांनी वरील साधनाचा प्रत्यक्ष वापर करून डिझाईन केली.
  कार्यशाळेच्या सुरुवातीला समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे यांनी तज्ञांची ओळख करून दिली. तसेच  याप्रसंगी विभागप्रमुख प्रा.अडूरे सर यांनी कार्यशाळेचा उद्देश विषद केला. हि कार्यशाळा संपन्न होण्यासाठी प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख प्रा. सुनिल अडूरे, समन्वयक प्रा. स्वाती बिर्जे व अन्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.