Friday, July 19, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकीची टीम MH-08 रेसिंग युके ला रवाना अभियांत्रिकी डीझाइन इव्हेंट (फॉर्मुला स्टूडंट २०१९) स्पर्धेमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व


रत्नागिरी जिल्ह्यातील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविदयालयाची टीम एम एच ०८ रेसिंग नुकतीच सिल्वरस्टोन सर्किट, युके ला रवाना झाली आहे. अभियांत्रिकी डीझाइन इव्हेंट म्हणजेच फॉर्मुला स्टूडंट २०१९ या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या या  टीममध्ये एकूण बारा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  
इंग्लंड येथे होणा-या जगातील सर्वात प्रतिष्ठीत अभियांत्रिकी डीझाइन इव्हेंट म्हणजेच फॉर्मुला स्टूडंट २०१९ या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या या टीमची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण कामगिरी बजावत या टीमने महाविद्यालयाच्या व राष्ट्राच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
सन १९९८ पासून कार्यरत असणा-या आय मेक फॉर्मुला स्टूडंट या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारा आयोजित होणा-या फॉर्मुला स्टूडंट इव्हेंट मध्ये दरवर्षी शेकडो दिग्गज आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सहभागी होतात. ही स्पर्धा फॉर्मुला १ दुनियेमधील बहुचर्चित असणा-या सिल्वरस्टोन सर्किट, युके येथे घेतली जाते. या स्पर्धेत निवड होण्यासाठी विशेष चाचण्या घेतल्या जातात. या चाचणीमध्ये कमालीचे यश मिळवत या टीमने भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त केली आहे.
कोकणातील या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सलग ४ वर्षांपासून अत्युच्च क्षमतेच्या फॉर्मुला स्टूडंट रेस कारची निर्मिती करीत आहेत. या टीमने सलग दोनवेळा बेस्ट डिझाईन रेस कार ऑफ इंडियाकिताब पटकावून राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर या रेस कारची निर्मिती केली आहे.
संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने, कार्यकारी अध्यक्ष सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत यानी तसेच तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी टीमचा कप्तान प्रणीत वाटवे व इतर सर्व टीम सदस्यांना स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो: स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेली कार सोबत टीम MH-08 रेसिंग



राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षेत सुयश

आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रम पदवीच्या अंतिम परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी यंदाही कायम राखली आहे.
महाविद्यालयाच्या पाच विभागांपैकी ऑटोमोबाईल विभागाचा अदनान होडेकर याने ८.७६ पॅाइंट मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर चिन्मय तेंडूलकर व दत्तप्रसाद भूरवणे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. या शाखेचा निकाल ९४.८३ टक्के इतका लागला आहे.
महाविद्यालयाच्या संगणक विभागाचा एकूण निकाल ७५.६८ टक्के लागला असून त्यामध्ये सानिया हर्चीरकर हिने ७.८६ पॅाइंटसह प्रथम येण्याचा मान मिळवला. तर स्वप्नाली कांगणे व सलीना बोदले या विद्यार्थीनिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त  केले.
मेकॅनिकल विभागामधून तौसीफ मापारी याने ९.०५ पॅाइंटसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर अरबाझ नाकाडे व करिष्मा कदम यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला आहे. या शाखेचा एकत्रित निकाल ९३.२४ टक्के आहे.
अणूविद्युत व दूरसंचार शाखेचा विद्यापीठाचा निकाल ९०.२४ टक्के आहे तर महाविद्यालयाचा निकाल ९४.७४ टक्के लागला आहे. या शाखेमधील जागृती काटे ही ९.०१ पॅाइंटसह  महाविद्यालयात प्रथम आली आहे. या शाखेतील चिन्मय शिंदे व ईश्वरी नाईक यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय  क्रमांक प्राप्त केला.
महाविद्यालयाच्या एम एम एस या पदव्युत्तर अभ्यासक्रम शाखेचा निकाल ८३.७२ असून सुमित आंब्रे हा विद्यार्थी ९.३३ पॅाइंटसह  महाविद्यालयात प्रथम आला आहे. तर भक्ती कुलकर्णी व वैभव गवंडी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय  क्रमांक प्राप्त केला.
महाविद्यालयाच्या सर्व शाखांमधून   २६९  विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३४  विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर  १०१   विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थाध्यक्ष मा. श्री. रवींद्र माने, कार्याध्यक्ष सौ. नेहा माने, जान्हवी माने, उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे, सचिव श्री. चंद्रकांत यादव, सहसचिव श्री. दिलीप जाधव, प्राचार्य डॉ. महेश भागवत, परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी व प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे


Monday, July 15, 2019

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांचे राष्ट्रीय पात्रता परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश

नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET 2019) निकालामध्ये आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) ने जुन २०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये महाविद्यालयाच्या प्रा. मुश्ताक गडकरी, प्रा. लक्ष्मण नाईक तसेच प्रा. सुरेश कोळेकर यांनी संगणक शास्त्र विषयामधून विशेष श्रेणी प्राप्त केली आहे.
ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर वर्षातून दोन वेळा घेतली जातेयावेळी तब्बल ४३,००० उमेदवारानी ही परीक्षा दिली व त्यामध्ये जवळपास सहा टक्के इतके उमेदवार उत्तीर्ण झाले. सदर परीक्षा यशस्वीपणे पूर्ण करून पात्र ठरलेले तिन्ही प्राध्यापक हे या महाविद्यालयाच्या  कॉम्पुटर विभागामध्ये कार्यरत आहेत.
या प्राध्यापकांच्या उज्ज्वल यशाबद्दल प्र. शि. प्र. संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री. मा. रविन्द्रजी माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकानी त्यांचे अभिनंदन केले.

                                                                               प्रा. मुश्ताक गडकरी


                                                                                प्रा. सुरेश कोळेकर


                                                                                     प्रा. लक्ष्मण नाईक