Monday, April 15, 2019

राजेंद्र माने इंजीनिरींगचा ओंकार कुलकर्णी मिस्टर युनिव्हर्सिटी उपविजेता

मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित युवा महोत्सवाच्या विद्यापीठस्तरीय अंतीम फेरीत जॅकपॉट स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करत आंबव येथील प्र. शि. प्र. संस्थेच्या राजेंद्र माने इंजिनीरिंग कॉलेजचा विद्यार्थि ओंकार कुलकर्णी याने  मिस्टर युनिव्हर्सिटी रनर अप (सिल्व्हर मेडल) हा किताब पटकावला आहे. त्याचबरोबर इंजिनीरिंग क्षेत्रामध्ये हा किताब पटकावणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे.
व्यवस्थापन, क्रीडा, सामान्य ज्ञान, संगीत, नृत्य, अभिनय अशा विविध कलांमधील कौशल्य यांच्या आधारे हि निवड केली जाते. ओंकार कुलकर्णी याने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये महाविद्यालयीन तसेच आंतरमहाविद्यालयीन गायन, मिमिक्री यासारख्या स्पर्धां व विविध कार्यक्रमांच्या व्यवस्थापन समितीमध्ये भाग घेऊन सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरी केली आहे.
त्याने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल प्र. शि. प्र. संस्थेचे अध्यक्ष मा. रवींद्रजी माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत व सर्व विभागप्रमुख  यांनी त्याचे अभिनंदन केले व भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. गणेश जागुष्टे यांचे त्याला या स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी केलेले सहकार्य व आई-वडिलांचा पाठींबा तसेच विविध स्पर्धा कार्यक्रमामधील आपला सहभाग यामुळे हे यश प्राप्त करता आल्याची भावना ओंकार कुलकर्णी याने यावेळी व्यक्त केली.
फोटो:
ओंकार कुलकर्णीचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच प्रा. गणेश जागुष्टे

No comments:

Post a Comment